*मध्ययुगातील समाजवादी अर्थतज्ञ :- महात्मा बसवेश्वर* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *मु.भांबोरा ता.तिवसा* *जिल्हा अमरावती* *भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४* ---------------------------------------- मध्ययुगात (बाराव्या शतकात) भारतातील सामाजिक सुधारणा आणि परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या विविध समाज सुधारकांमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल.मानवतावादी समाजाची उभारणी आणि समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. समाजातील अनिष्ट प्रथा,रूढी, परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांना मूठमाती देण्यासाठी त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला होता.प्रस्थापितांच्या विरोधातील हेच बंड तद्दनंतरच्या काळातील समाज सुधारकासाठी प्रेरणास्त्रोत आणि पथदर्शक ठरले आहे.अगदी बालपणापासून सुधारणेचा वसा आणि परिवर्तनाची कास उराशी बाळगणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावी अक्षयतृतीयेच्या दिवशी (२६ एप्रिल ला जयंती साजरी केली जाते) झाला.मादलांबीका आणि मादीराज हे त्यांचे माता-पित...