---पुस्तक परिचय--- समाजमनाचा वेध घेणारा :- "आरंभबिंदू" ---------------------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे मु.भांबोरा ता.तिवसा जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर :- ९९७०९९१४६४ ------------------------------------------------------ एक कसदार,दमदार अन तितक्याच दिलदार मनाचा असलेला कवी प्रा.डॉ.अजय कृष्णराव खडसे (अमरावती) यांचा "आरंभबिंदू" हा काव्यसंग्रह साहित्याक्षर प्रकाशन संगमनेर, जिल्हा अहमदनगर द्वारा नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ.अजय खडसेचे हे पहिलेच साहित्यिक अपत्य असून "गुलदस्ता" काव्यसंग्रह तसेच "मराठी समीक्षा : वाटा आणि वळणे" हा समीक्षाग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे.आरंभबिंदूत कवींनी साहित्यिक,शैक्षणिक,सांस्कृतिक राजकीय यासह समाजातील वैविध्यपूर्ण अंगांना स्पर्श करीत समाजमनाचा अचूकपणे वेध घेतला आहे.अर्थात मानवी जीवनाविषयीच्या विविध पैलूचा उलगडाच त्यांनी या काव्यसंग्रहातून केला आहे. डॉ.अजय खडसे हे नाव साहित्यक्षेत्रासाठी नक्कीच...