*५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विशेष लेख* --------------------------------------------------- *विनावेतन शिक्षकासाठी नियमित वेतनाची तरतूद करता येत नसेल तर या शिक्षक दिनी सर्व विनावेतन शिक्षकांना शासन मान्य "वेठबिगारी"चे प्रमाणपत्र देऊन गौरव करावा अशी आर्त हाक या विनावेतन शिक्षकांची आहे !* -------------------------------------------------- *विनावेतन शिक्षकांची दैनावस्था* प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे ९९७०९९१४६४ --------------------------------------------------- व्यक्तिगत तसेच देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाचे अत्यंत मोलाचे असे स्थान आहे.देशासाठी आवश्यक तसेच योग्य आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्याची सोबतच संस्कारक्षम भावी पिढी घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकाच्या खांद्यावर आहे. शिक्षकही असे आवाहन तितक्याच जबाबदारीने पेलतो. परंतु शासनाची शिक्षकाप्रति उदासीन नीती तसेच सोईस्कर आणि तकलाटू धोरणाने समाजातील एका जबाबदार घटकाला अर्थात श...