"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन " ---------------------------------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध असे पैलू आहेत.मानवाचा सर्वांगीण विकास आणि कल्याणाच्या दृष्टीने विविध विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण असे भाष्य केले.एकाच वेळी सामाजिक परिवर्तन आणि जातीय निर्मूलनाची लढाई लढताना त्यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाकडे येनकेन प्रकारे विसर पडल्यागत झाला.थोर समाजसुधारक,शिक्षणतज्ञ,उत्तम पत्रकार,भारतीय घटनेचे शिल्पकार,महिला व बहुजन समाजाचे उद्धारकाबरोबरच ते एक उत्तम अर्थशास्त्री सुद्धा होते.त्यांचा अर्थशास्त्रीय व्यासंग आणि अभ्यास व्यापक स्वरूपाचा होता.त्यांच्यातील अर्थशास्त्रीय दृष्टिकोन अतिशय सुस्पष्ट आणि भारताच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी पोषक स्वरूपाचा होता.डॉ.आंबेडकरांचे वित्तविषयक ज्ञान सखोल आणि उच्च दर्जाचे होते.मानवावाचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक परिवर्तनाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी वित्त विषयक केलेले मूलभूत लेखन त्यांचा दृष्ट्या वित्तविचाराचं महत्व अधोरेखित करणारं आहे. आंबेडकराच्या व्यक्तिमत्वा...
श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकर -------------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे भांबोरा ता.तिवसा जि.अमरावती मोबाईल- 9970991464 -------------------------------------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेकविध पैलू आहेत.विषमतावादी भारतीय समाजरचनेत डॉ.आंबेडकर सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी अखेरच्या क्षणापर्यंत निकराने लढलेत.भारतीय समाज त्यांच्या राजकीय,सामाजिक आणि धार्मिक विचाराबाबतीत जितका अवगत आहे तितका आर्थिक विचाराबाबत अवगत नाही. डॉ.आंबेडकरांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण अनं अतुलनीय आहे. डॉ.आंबेडकरांनी कृषी विकास,औद्योगीकरण, रोजगार निर्धारण, मजूर संघ, लोकसंख्या समस्या, आंतरराष्ट्रीय व्यापार, बँकिंग, विमाक्षेत्र, वित्तीय आणि मौद्रिक धोरण, केंद्र-राज्य वित्तीय संबंध इत्यादी बाबतीत सखोल असा अभ्यास व त्या अनुषंगाने वेळोवेळी अभ्यासपूर्ण केलेली मांडणी त्यांना जागतिक अर्थशास्त्रज्ञाच्या यादीत समाविष्ट करणारे आहेत. ...