Skip to main content

शिवजयंती- सत्कार 06 मार्च 2026


छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टी असलेले राजे 
        -प्रा.डॉ.नरेश इंगळे 
शिवजयंती - मान्यवराचा सत्कार 
        छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्षांपूर्वीच भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेऊन त्यासाठी तयारी केली होती.नौदलाची स्थापना,किल्ल्यांची सुरक्षा, संरक्षण व्यवस्था,प्रशासकीय व्यवस्था, लष्करी शिस्त,आर्थिक विकास इत्यादी बाबी आधुनिक काळातही थक्क करणाऱ्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि अद्वितीय नेतृत्व क्षमता आजही भारतीयांना/युवकांना प्रेरणादायी आहे असे मत प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे यांनी व्यक्त केले आहे.
             अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजना माहुरे येथील मानवता मंदिर परिसरात आयोजित शिवजयंती महोत्सव कार्यक्रम प्रसंगी उपस्थितीताना मार्गदर्शन करताना केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत मुख्याध्यापक गुणवंतराव देवतारे तर प्रमुख पाहुणे म्हणून तिवसा पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव माहुरे, बालकीर्तनकार अभिजित बेलूरकर,खरेदी विक्री संघ तिवसाचे सभापती सुरेशराव मेटकर, श्री संत शंकर महाराज कला वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे,प्रा. डॉ. शीतल माहुरे,नागपूर मनपाच्या स्थापत्य अभियंता कु. हर्षदा श्याम मंजूरकर,शिवसेना तालुका प्रमुख दिलीपराव केणेकर, शहर प्रमुख देविदासजी निकाळजे,गुरुदेव सेवा मंडळ पिंपळखुटाचे प्रा.प्रशांत टांगले,खरेदी विक्री संघ तिवसाचे संचालक आकाश उर्फ बंटी माहुरे,सरपंच आशिष माहुरे, उपसरपंच गौरी आमले, माजी उपसरपंच प्रदीप माहुरे आदी मान्यवर उपस्थितीत होते.शिवजयंती पर्वावर विविध क्षेत्रातील कर्तृतवान व गुणवत्ता प्राप्त मान्यवराचा सत्कार करण्यात आला. त्यात बालकीर्तनकार अभिजित बेलूरकर, प्रा. डॉ. नरेश इंगळे, प्रा. डॉ.शीतल माहुरे, कु. हर्षदा शाम मजूरकर आदीचा समावेश आहे.
          विलासराव माहुरे यांचे पुढाकारातून गत 46 वर्षापासून हा शिवजयंती महोत्सव आयोजित केला जातो.हा महोत्सव अविरत कायम राहिला पाहिजे त्यासाठी नवयुवकानी पुढे येण्याची अपेक्षा तिवसा पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव माहुरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून अपेक्षा व्यक्त केली आहे.याप्रसंगी उपस्थिती मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृतवार प्रकाश टाकला.
     प्रास्ताविक विलासराव माहुरे, सूत्रसंचालन धनराज मनवरे तर आभार प्रदर्शन कु.राधा हर्षल माहुरे हिने केले.कार्यक्रमाला
देवेंद्र आमले सुनील तालन जानराव मनवरे संजय निगोट, योगेश गुमळे, शाम मंजूरकर किसनराव माहुरे संदीप माहुरे दादाराव काळे किसनराव इंगोले जयकांत माहोरे महेश माहोरे संजय माहोरे अशोक माहोरे अमोल माहोरे प्रेरणा माहुरे सीमा माहुरे लता माहुरेबाई कोंडेकर रवी माहुरे राज माहुरे किसना काळे निलेश आमले महादेव देवतारे रामदास समरीत रामचंद्र देवतारे सुरेश हरणे धनराज मनवरे यांचेसह शिवजयंती महोत्सव समिती पदाधिकारी व गावकरी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...

संत गाडगेबाबा आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

*संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा,जि.अमरावती. भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४ ----------------------------------------         विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत,कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दीनदलित,पीडित,वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत.बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते.कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक,राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते.त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.संत गाडगेबाबा हे डॉ.आंबे...