Skip to main content

कर्तव्यतत्पर डी.आर.डेरे गुरुजी

कर्तव्यतत्पर/विद्यार्थीभिमूख
*श्री डी.आर.डेरे गुरुजी*
      एक उतुंग अन कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. डी. आर.डेरे गुरुजी यांच्या कर्तुत्वाची चुणूक मी श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा येथे रुजू होताच अनुभवास आली.कालांतराने त्यांच्यातील अनेकविध कार्यकर्तुत्वाचे पैलू उलगडत गेले. ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातील श्री डी.आर.डेरे गुरुजी यांचा जन्म स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर म्हणजे १५ ऑगस्ट १९६२ ला पिंपळखुटा या संतभूमीत झाला.पदवी व पदव्युत्तर परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर श्री संत शंकर बाबा यांच्या आज्ञेने *श्री ज्ञानेश्वर रामकृष्णजी  डेरे* हे श्रीसंत शंकर महाराज विद्यामंदिर पिंपळखुटा येथे गुरुजी म्हणून रुजू झाले.
         विशेष म्हणजे श्री.डेरे सर यांच्या पुढाकाराने तसेच सर्व भक्तांचे प्रयत्न आणि परमहंस श्रीसंत शंकर बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने सन १९८९ ला पिंपळखुटा या लहानशा गावात *श्री संत शंकर महाराज विद्यामंदिर* या नावाने शाळा सुरू करण्यात आली.सर्वप्रथम ८ वा वर्ग सुरू करून,त्याच नेतृत्व आदरणीय श्री डी.आर.डेरे गुरुजी यांच्या कडे सोपविण्यात आले होते.शाळेचे पहिले मुख्याध्यापक,शिक्षक,लिपिक, आणि चपराशी अशा चतुरस्त्र भूमिकेत त्यांनी शैक्षणिक कार्य सुरू केले.त्यावेळी  ८ व्या वर्गात केवळ १४ विध्यार्थी प्रवेशित होते.आज त्यांनी लावलेल्या या लहानशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे.सध्या स्थितीत या शाळेत जवळपास ६५० ते ७०० विध्यार्थी शिक्षण घेत आहे.याचे श्रेय श्री डेरे गुरुजी यांना जाते.
    कालांतराने श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट पिंपळखुटा च्या माध्यमातून श्री संत शंकर महाराज एम.सी.व्ही.सी.तसेच कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालय आणि श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास त्याचा सिहाचा वाटा कुणीच नाकारणार नाही.गावातील तसेच परिसरातील कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये अशी त्यांची कायम भूमिका राहिली व आहे.विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देत असताना ज्ञानदानाबरोबरच वास्तववादी विद्यार्थी घडविण्याकडे त्यांचा अधिक कल होता.आजचा विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे म्हणून एक सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून जडणघडण करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. जात,धर्म,पंथ,आणि वर्ण असा भेद न करता विद्यार्थ्यांतील गुणवत्ता हेरून त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देणे आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देण्याचा डेरे सरांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाला सामोरे जाण्याची जिद्द निर्माण करण्याचे कौशल्य सरांच्या अंगी होते. विद्यार्थ्यांत नकारात्मकतेचा लवलेशही असणार नाही आणि सकारात्मक दृष्टिकोन अधिकाधिक कसा पेरता येईल यासाठी सरांची धडपड राहिली आहे.त्या अनुषंगाने जे जे करता येईल ते ते सर्व प्रयत्न/उपाय त्यांनी अवलंबलेत.नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेत.विद्यार्थी/कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष देऊन त्यांचा सन्मान करणे ही योजना त्यांचीच देणगी आहे.चांगल्या अक्षराचे वळण हेही डेरे सरांची देणगी असल्याचे विद्यार्थी अभिमानाने आवर्जून सांगतात. अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाने सरांची कारकीर्द गाजली आहे.
     शासकीय नियमानुसार सर ऑगस्ट २०२० ला सेवानिवृत्त झाले आहे.मात्र त्याची कारकीर्द सर्वांसाठी अविस्मरणीय अशीच राहिली आहे.
      सर्व विद्यार्थ्यांत लोकप्रियतेसोबतच सर्वांचे आवडते आणि लाडके असलेल्या सराचा स्वभाव शांत,मितभाषी,निटनिटकेपणा, वक्तशीरपणा, काटकसर,कार्यतत्पर,कोणतेही काम आनंदाने आणि पूर्ण क्षमतेने करून  खऱ्या अर्थाने ते सर्वांचे प्रेरणास्रोत ठरले आहे.विशेष म्हणजे कठोर शिस्त प्रिय राहिले तरी ते सर्वांचेच आवडते राहिले आणि राहणार सुद्धा!!!!.
       शालेय अध्यापन कार्याबरोबरच परीक्षा विभाग,केंद्रसंचालक ,म्हणून त्यांनी लिलया आव्हान पेलले.पर्यावरण प्रेमी असलेल्या डेरे सर यांनी स्वतः झाडे लावून, नित्यक्रमाने रोज ते  विध्यार्थ्यांना रोपटे देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करीत असे.शाळेतील अन्य बाबतीतही त्यांनी अत्यंत मोलाचे कार्य केलेले आहे.
   शैक्षणिक कार्याबरोबरच  अध्यात्म त्याच्या आवडीचे क्षेत्र. धामणगाव रेल्वे येथील वास्तव्यास गेले असता तेथील विद्युत कॉलनीत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन परिसरातील लोकांना एकत्रित करून *श्री संत गजानन महाराज* मूर्ती प्रतिस्थापना आणि मंदिराची उभारणी करण्यास पुढाकार घेतला अन आगळेवेगळ्या वातावरणाची निर्मिती केली.पूर्वी सुनसान असलेल्या त्या कॉलनीत आता दर गुरूवारला  सर्व मंडळी एकत्रित येऊन महाप्रसाद सहभोजन करतात.आता तेथे भक्तिमय वातावरण झाले आहे. यासाठी तेथील नागरिक श्री डेरे गुरुजी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात.इतकेच नव्हे तर त्यांना भजन कीर्तनाची आवड आहे.आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी इतर सहकारी मंडळीना सोबत घेऊन *भजन मंडळ* स्थापन केले.भजनाच्या माध्यमातून सर घरा-घरात पोहचले आहे.त्यातही त्यांनी भजन हे सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेतच असावे असा त्यांनी  नियम घालून दिला आहे.विशेष म्हणजे ज्या गावात भजन असेल त्या गावात भजनी मंडळी ही स्वमालकीच्या चारचाकी गाडीबरोबरच पेट्रोल खर्चाची जबाबदारी सुद्धा स्वतःच गुरुजी उचलतात हे विशेष!!
   अशा प्रामाणिक,परखड, जिज्ञासू निस्वार्थी,निगर्वी,कर्तव्यतत्पर श्री डेरे गुरुजी यांचा १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस.त्यांची ही दैदिप्यमान वाटचाल निरामय स्वास्थासह सुखी समृद्ध,ऐश्वर्य संपन्न होवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच या वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक कोटी कोटी हार्दिक सदिच्छा!!!! 
----------------------------------------
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती.
९९७०९९१४६४
------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...