Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

श्रीसंत शंकर महाराज

*भाविकांचे श्रद्धास्थान*  *श्री संत शंकर महाराज* ---------------------------------------- *स्वाती नरेश इंगळे* *मु.भांबोरा ता.तिवसा* *जि.अमरावती* *मोबाईल-८८८८७९७९८७* ----------------------------------------        महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.संत परंपरेचा वारसा हा  अमरावती जिल्याला सुद्धा लाभलेला आहे.महाभारत काळापासून तर आधुनिक काळापर्यंत अनेक संत/महात्मे याच भूमीत जन्मलेले आहे.अशा या संताच्या भूमीमध्ये पूर्वीचा तिवसा आणि विद्यमान धामणगाव रेल्वे तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळखुटा या लहानशा खेड्यामध्ये श्री संत शंकर महाराज यांचा १९४५ मध्ये गरीब व निरक्षर कुटुंबामध्ये हरितालिका या दिवशी जन्म झालेला आहे. बुधाजी नागपुरे व भागीरथीबाई नागपुरे हे त्यांचे माता-पिता.श्री संत शंकर महाराज हे त्यांचे सातवे रत्न.         बाबाचा जन्म तसा अत्यंत दारिद्र्यमध्ये व्यतीत करणाऱ्या भूमिहीन कुटुंबामध्ये झालेला आहे.त्यातच श्री संत शंकर महाराज त्यांच्या बंधू पैकी सर्वात ज्येष्ठ.गरिबीच्या परिस्थितीमध्ये कुटुंबाला आपला सुद्धा आर्थिक हातभार असावा म्हणू...