*सामाजिक वेदनेचा हुंकार म्हणजे- जीवन संघर्ष* ------------------------------ *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *मु.भांबोरा ता.तिवसा* *जि. अमरावती* ९९७०९९१४६४ dr-nareshingale.blogspot.com ----------------------------------------------- सामाजिक वेदना अन गरिबीच्या झळा सोसत उत्तरोत्तर प्रगती साधणार्या नवनाथ रणखांबे यांचा *जीवन संघर्ष* हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. जे भोगले, सोसले, अनुभवले, दृष्टीस पडले, परिस्थितीशी दोन हात केले तेच कवी नवनाथ रणखांबे यांनी अगदी बिनधास्तपणे आणि तितक्याच ताकदीने/तळमळतेने काव्य स्वरूपात व्यक्त केले. मानवी/समाज जीवनाच्या विविध अंगाचे/घटनांचे पैलू त्यांनी अत्यंत खुबीने अन तितक्याच उत्स्फूर्तपणे जीवन संघर्षात रेखाटले आहे. जीवनाच्या विविध घटनाचे निरीक्षणे अतिशय सूत्रबद्ध पणे गुंफले आहे. सामान्य माणसाची जीवन व्यवस्था आणि संघर्षमय जीवनाचा वेध घेणारा "जीवन संघर्ष" काव्यसंग्रह हा एक प्रकारे सामाजिक वेदनेचा हुंकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जीवन संघर्षात एकूण ४६ काव्यरचना आहे. प्रतिष्ठित 'शारदा प्रकाशन' ठाणे द्वारे ...