*कामगाराचे बाबासाहेब* ---------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे मु.भांबोरा ता.तिवसा जिल्हा अमरावती ९९७०९९१४६४ ------------------------------------------ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची विविध असे पैलू आहेत.गोरगरीब, कष्टकरी,शोषित,पीडित आणि वंचित घटकाच्या उद्धारासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.सामाजिक न्यायाची लढाई लढतानाच कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी सुद्धा तितक्याच ताकदीने/आत्मीयतेने ते लढलेत.कामगार चळवळीतील त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय असेच आहे.डॉ.आंबेडकराच्या कार्यकुशलतेने भारतीय कामगार चळवळीला योग्य दिशा प्राप्त झाली.नवा आयाम मिळाला.त्यांच्या जगण्याचा मार्ग सुकर झाला.कामगाराच्या वाट्याला आलेले दारिद्रय हे त्यांच्यातील अज्ञान,अंधश्रद्धा आणि असंघटित पणामुळे आलेले आहे याची जाणीव त्यांनी समस्त कामगार वर्गाला करून दिली. त्याच अनुषंगाने डॉ.आंबेडकरांनी कामगाराच्या समग्र विकासासाठी रणशिंग फुंकले होते.कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्या...