*अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त* ---------------------------------------- "कृतिशील व्यक्तिमत्त्वाचे धनी:-पी.बी.इंगळे ---------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे मु.भांबोरा ता.तिवसा जिल्हा अमरावती मोबाईल- ९९७०९९१४६४ ---------------------------------------- एक उतुंग अन कृतिशील व्यक्तिमत्व म्हणून पांडुरंग बळीरामजी इंगळे यांच्या कर्तृत्वाबाबतीत महाविद्यालयीन जीवनापासूनच ऐकून होतो आणि कालांतराने त्यांच्यातील अनेकविध कार्यकर्तृत्वाचे पैलू उलगडत गेले.ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती ते शिक्षक आणि चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाची अनुभूती यायला लागली.शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक आणि पुरोगामी चळवळीतील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत.आपल्या कार्य कर्तुत्वाच्या भरवशावरच त्यांनी विविध क्षेत्रात स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली.तथागत भगवान गौतम बुद्ध,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले,संत कबीर,छत्रपती शाहू महाराज,प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थानी ठेव...