नवसमाज निर्मितीसाठी :- अलर्ट ---------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे मु.भांबोरा ता.तिवसा जिल्हा अमरावती मोबाईल- ९९७०९९१४६४ ---------------------------------------- नव्वदोत्तरीतील एक व्यासंगी,अभ्यासू चिकित्सक आणि उत्कृष्ट लेखक,समीक्षक म्हणून साहित्यक्षेत्रात ज्यांचा गौरवाने नामोल्लेख केला जातो असे कविवर्य प्रशांत नामदेवराव ढोले (देवळी) यांचा "अलर्ट" हा काव्यसंग्रह नुकताच प्राप्त झाला आणि अवलोकन केला.त्यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह असून सुधीर प्रकाशन वर्धा द्वारे प्रकाशित करण्यात आला.तत्पूर्वी सखोल अवलोकन आणि सूक्ष्म निरीक्षणातून "आंबेडकरी जाणीवाचा अक्षरप्रकाश" हा समीक्षाग्रंथ वाचकांच्या सेवेत दाखल झाला आहे.एक शिक्षक म्हणून सुसंस्कारित भावी पिढी घडविण्याची जबाबदारी पेलताना समाजमनही तितक्याच आत्मीयतेने अभ्यासले.कुठलाही आव न आणता किंवा कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात अकारण उभे न करता जे दृष्टीस पडले,अनुभवले तेच त्यांनी "अलर्ट" मध्ये मांडले. वर्तमानातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कायम असलेली आर्थिक-सामाजिक...