*सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता* :- *जगावे एक पाऊल पुढे* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा जिल्हा अमरावती. भ्रमणध्वनी :- ९९७०९९१४६४ ---------------------------------------- काविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे.यात मुख्यतः छंदोबद्ध अन् रसबद्ध काव्यरचनेचा समावेश असतो. काव्यातून मानवी जीवन कळते, समजते अन उमगते. काव्यरचनेच्या माध्यमातूनच मानवी मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनस्थिती व्यक्त करता येते.मानवी मनातील वेदना माणसापर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण साधन म्हणजे काविता म्हणावे लागेल.ज्यांच्या लेखन कौशल्यातून सभोवतील वा समाजातील व्यथा,वेदना,आनंद, दुःख,अन्याय,अत्याचार,संघर्ष, वाताहत याबाबतचे वास्तव ज्यांच्या साहित्यात खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित होते तोच खरा साहित्यिक होय.त्याच धाटणीतील मानव कल्याण ही बाब केंद्रस्थानी ठेवून व्यक्त होणाऱ्या कवी पैकी एक म्हणजे वैद्यकीय व्यवसायातील पण सामाजिक जाण अन भान असलेला कवी डॉ.कमल राऊत एक आहेत.त्यांच्या ठायी असणारी सामाजिक कणव,सूक्ष्म निरीक्षण आणि ...