Skip to main content

Posts

Showing posts from September, 2023

मानवी कल्याणाचे ऊर्जास्रोत :-बुद्ध विहारे !!!

*"मानवी कल्याणाचे ऊर्जा स्त्रोत* *:--बुद्ध विहारे"* ---------------------------------------- प्रा. डॉ.नरेश शं.इंगळे अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती मोबाईल- ९९७०९९१४६४ ----------------------------------------         समग्र क्रांतीचे अग्रदूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली पवित्र अशा नागपूरच्या पवित्र भूमीवर पिढ्यानं-पिढ्या निपचित पडलेल्या लाखो अनुयायासह  बौद्ध धम्माचा अंगीकार केला. जगाच्या इतिहासातील "न भूतो न भविष्यती " अशी ही घटना म्हणावी लागेल.अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेला अन शिक्षणापासून कोसो दुर असलेला हा परिवर्तित; शोषित, पिडीत,वंचित,अस्पृश्य समाज बौद्ध तत्त्वज्ञानाबाबत तितकाच अनभिज्ञ होता.या सकल समाज घटकाचा सर्वंकष उद्धाराचा ध्यास घेतलेल्या डॉ.बाबासाहेबावरच्या अगाध आस्थेपोटी तत्कालीन अस्पृश्य समाज बुद्धाच्या चरणी नतमस्तक झाला.धर्मांतरानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अल्पावधीतच महापरिनिर्वाण झाले. परिणामतः डॉ.आंबेडकराना बुद्ध धम्माचा प्रचार व प...