Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

अल्प-परिचय

*अल्प-परिचंय* *नाव:-* *प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे* *शिक्षण:-*              एम.ए.(अर्थशास्त्र)              बी.पी. एड.एम.फिल.                  पी.एच.डी. सेट (SET)              (बी.ए.संस्कृत, Addi.) *अर्थशास्त्र विभाग प्रमुख* श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय,पिंपळखुटा, ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती. *कार्यक्रम अधिकारी* राष्ट्रीय सेवा योजना (सन २००९-१० ते २०१४-१५) (दि.८ जानेवारी २०२१ पासून पुढे) *समन्वयक* विद्यार्थी विकास विभाग, श्री संत शंकर महाराज कला महाविद्यालय,पिंपळखुटा. *पत्रकार:-* सकाळ मीडिया ग्रुप *लेखन:-* विविध वृत्तपत्रात प्रबोधनात्मक,सामाजिक व अन्य विषयावर विविध लेख,पुस्तक समीक्षण, लघुकथा तसेच राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये विविध शोध निबंध प्रकाशित. *आयोजक* २६ व २७ मे २००१ ला ...

आशेचा किरण

*आशेचा किरण* काटेरी वाटेने जाताना काटा पायाला बोचत नाही तुझ्या त्या विरहाने कधी मन प्रसन्न होत नाही. क्षणातच असा वार केला रक्ताचा थेंब सुद्धा पडला नाही    तुझ्या त्या द...

शेतकऱ्यांचा कैवारी:-महात्मा फुले

*शेतकऱ्यांचे कैवारी:-महात्मा फुले* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *मु.भांबोरा,ता.तिवसा* *जि,अमरावती* *मोबा.९९७०९९१४६४* ----------------------------------------         १९ व्या शतकात भारतातील सामाजिक सुधारणा आणि परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या विविध समाज सुधारकांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले अर्थातच ज्योतीराव गोविंदराव फुले यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल.बहुजन समाजाची उन्नती आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. प्रस्थापितांच्या दडपणाखाली/वर्चस्वाखाली पिचत असलेला शेतकरी व बहुजन समाजाची होणारी पिळवणूक याबाबतीत त्यांनी परखडपणे विचार मांडले आहे.वास्तवतेची समीक्षा केली. बहुजनाची तसेच शेतकऱ्यांची केविलवाणी स्थिती तत्कालीन सरकारच्या निदर्शनास आणून दिली.       महात्मा फुलेनी घेतलेल्या व्यापक भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या "गुलामगिरी" "शेतकऱ्याचा आसूड"या ग्रंथात उमटलेले दिसते."गुलामगिरी", "शेतकऱ्याचा आसूड", "सार्वजनिक सत्यधर्म"(मरणोपरांत) हे त्यांचे प्रचंड गाजलेले ...

नागेश्वर मंदिर श्री क्षेत्र धामंत्री

प्राचीन कालीन नागेश्वर मंदिर श्री क्षेत्र धामंत्री --प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे ...

विफल प्रेमातही---------!

*विफल प्रेमातही* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *मु.भांबोरा ता.तिवसा* *जिल्हा.अमरावती* *मोबा.९९७०९९१४६४* ----------------------------------------       अरे वा! काय भुवन आज खूप मजेत दिसतोय,काय चमत्कार घडला.काही कळ...