*आशेचा किरण*
काटेरी वाटेने जाताना
काटा पायाला बोचत नाही
तुझ्या त्या विरहाने
कधी मन प्रसन्न होत नाही.
क्षणातच असा वार केला
रक्ताचा थेंब सुद्धा पडला नाही
तुझ्या त्या दुःखद वाराने
हृदयाचे तुकडे
झाल्याशिवाय राहिले नाही.
कर तू असे कितीही वार
काहीच तुला म्हणणार नाही
माझे प्रेम काल होते आज नाही
असे कधीच होणार नाही.
तू तर तुझे घरटे बसविले
घर माझे मला दिसत नाही
घर बसवावं तरी कसं
माझे मलाच सुचत नाही.
पुढे पाऊल टाकावं तरी कसं
मार्ग मला सुचत नाही
निराशेला आशा मानावे तरी
आशेचा किरण मात्र दिसत नाही.
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*
*मु.भांबोरा, ता.तिवसा*
*जि.अमरावती.*
*मोबा.९९७०९९१४६४*
----------------------------------------
Comments
Post a Comment