*श्रीसंत अच्युत महाराज संस्थान* चे वतीने
*प्रा.डॉ.नरेश इंगळे यांचा सत्कार*
श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार येथील श्री संत अच्युत महाराज संस्थान मध्ये आयोजित दत्त जयंती च्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये भांबोरा येथील निवासी प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती ची आचार्य पदवी (पीएचडी) प्राप्ती आणि यु.जी.सी.निर्देशित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा द्वारा आयोजित राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट परीक्षा) उत्तीर्ण केल्याबद्दल प्रा. डॉ.नरेश शंकरराव इंगळे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर अनिलपंत सावरकर अध्यक्ष श्री संत अच्युत महाराज संस्थान व अध्यक्ष हार्ट हॉस्पिटल अमरावती यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला आहे.डॉ. नरेश इंगळे हे श्री संत शंकर महाराज कला महाविद्यालय,पिंपळखुटा येथे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापनासाठी कार्यरत आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ.प.सचिन महाराज देव. ह-भ-प. साहेबराव कनेरकर महाराज, डॉ. मुरलीधर वाडेकर,रायजीप्रभू शेलोटकर,गोपालपंत देवळे,योग तज्ञ डॉ.अरुण खोडस्कर, शुभदा पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय देवळे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थांचे सर्व पदाधिकारी यांच्यासह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.
Comments
Post a Comment