*विदर्भ अर्थशास्त्र परिषदेमध्ये*
*प्रा.डॉ.नरेश इंगळे यांचा सत्कार*
----------------------------------------
मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे यांचा स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. निवृत्ती पिस्तुलकर यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयात आचार्य (पी. एच.डी.) पदवी प्राप्ती आणि यूजीसी निर्देशित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारा आयोजित राज्यस्तरीय पात्रता (सेट)परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे यांचा हा सत्कार करण्यात आला आहे.भारतीय महाविद्यालय,मोर्शी येथे हा भरगच्च कार्यक्रम झाला आहे.अध्यक्षस्थानी डॉ.मृणालिनी फडणवीस (कुलगुरू-अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर) तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले,डॉ. आर.वाय.माहोरे,डॉ.दि.व्य. जहागीरदार,डॉ.मुक्ता जहागीरदार,प्राचार्य,डॉ.सुरेश बिजवे,संगाबा अमरावती विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष कुटे,विदर्भ अर्थशास्त्र परिषद उपाध्यक्ष प्रा.डॉ.राजेश बुरंगे,नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.डॉ.विनोद गावंडे,उपाध्यक्ष प्रा.डॉ.प्राची पांडे,प्रा.डॉ.दिपक शृंगारे,डॉ.संदिप म.राऊत आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.सूत्रसंचालन परिषद सचिव प्रा.डॉ.विठ्ठल घिनमिने,व प्रा.डॉ. राजेश चव्हाण तर उपस्थिताचे आभार स्थानिक सचिव डॉ. लाजवंती टेंभुरणें यांनी मानलेत.कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,या तिन्ही विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयाचे प्राध्यापक,संशोधक विद्यार्थी बहुसंख्येने आवर्जून उपस्थित होते.
---------------
तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे- शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे. शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...
Comments
Post a Comment