पत्रकार संघाचे वतीने प्रा.डॉ.नरेश इंगळे यांचा सत्कार
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती ची आचार्य पदवी (पीएचडी) प्राप्ती आणि यु.जी.सी.निर्देशित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा द्वारा आयोजित राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट परीक्षा) उत्तीर्ण केल्याबद्दल पत्रकार प्रा. डॉ.नरेश शंकरराव इंगळे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्रीक्षेत्र जहागीरपूर येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने आयोजित महामेळाव्यात हा सत्कार करण्यात आला यावेळी केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने,केंद्रीय सचिव अशोक पवार,केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे युसूफ खान,सलगार समिती अध्यक्ष अनिल जोशी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख,जिल्हा अध्यक्ष प्रा रविंद्र मेंढे,केंद्रीय महिला मंच अध्यक्ष सुनीता कसबे जयश्री पंडागरे नियोजन समितीचे अध्यक्ष अशोक राठी तिवसा तालुका अध्यक्ष सूरज दाहाट माजी अध्यक्ष जानराव मनोहर सह आदी उपस्थित होते कार्यक्रमात राज्यातील शेकडो पत्रकार सहभागी झाले होते.
तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे- शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे. शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...
Comments
Post a Comment