Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

विद्यार्थीभिमुख श्री डी.आर.डेरे.

कर्तव्यतत्पर/विद्यार्थीभिमूख *श्री डी.आर.डेरे सर*     पिंपळखुटा येथील श्रीसंत शंकर महाराज विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री *ज्ञानेश्वर रामकृष्णजी  डेरे* हे ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा श्रीसंत शंकर महाराज विद्यामंदिर आणि कनिष्ट महाविद्यालयाचे वतीने सपत्नीक सत्कार शासन व आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन करून संपन्न झाला.      श्री.डेरे सर यांच्या पुढाकाराने तसेच सर्व भक्तांचे प्रयत्न आणि परमहंस श्रीसंत शंकर बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने १९८९  ला पिंपळखुटा या लहानशा गावात *श्री संत शंकर महाराज विद्यामंदिर* या नावाने शाळा सुरू करण्यात आली. सर्वप्रथम ८ वा वर्ग सुरू करून,त्याच नेतृत्व आदरणीय श्री डी.आर.डेरे सर यांच्या कडे सोपविण्यात आले होते.   शाळेचे पहिले मुख्याध्यापक,लिपिक,शिक्षक आणि चपराशी अशा चतुरस्त्र भूमिकेत त्यांनी शैक्षणिक कार्य सुरू केले.त्यावेळी  ८ व्या वर्गात केवळ १४ विध्यार्थी प्रवेशित होते.आज त्यांनी लावलेल्या या लहानशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे.सध्या स्थितीत या ...