*स्मृती दिनानिमित्त* *(३१डिसेंबर)* ---------------------------------------- *ग्रामीण दलित साहित्य चळवळीतील तेजोमय तारा म्हणजे* *:- अशोक परसरामजी ढोले:-* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *मु.भांबोरा ता. तिवसा* *जि.अमरावती* ---------------------------------------- विषमतावादी स्वभावाने केलेला अन्याय आणि या अन्यायाला प्रखरतेने लढा देणारे वैचारिक विद्यापीठ आणि ग्रामीण दलित साहित्य चळवळीतील तेजोमय तारा म्हणजेच कालकथित अशोक परसरामजी ढोले होय.एक बंडखोर आणि आंबेडकरी विचारांचा प्रचंड ऊर्जा/तळमळ असलेला कवी,साहित्यिक,आणि विचारवंत असलेला हा तारा वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१७ ला अचानक मावळला.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. समाजाप्रती प्रचंड आस्था असलेला आणि आंबेडकरी विचार नसानसात भिनलेले अशोक ढोले यांचे बालपण अगदी छोट्याशा गावात म्हणजेच तिवसा तालुक्यातील वरखेड या गावी गेले.अशोकराव यांचा जन्म हा साठच्या दशकातील.डॉ. बाबासाहेब आंबेडकरां...