Skip to main content

निबंध स्पर्धा

*राज्यस्तरीय निबंध स्पर्धा.*
----------------------------------------

*श्रीसंत शंकर महाराज आश्रम ट्रष्ट पिंपळखुटा*
 द्वारा संचालित
----------------------------------------
 *श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय,पिंपळखुटा* 
ता.धामणगाव रेल्वे जिल्हा-अमरावती   
 या महाविद्दालायातील
----------------------------------------
 *'विद्यार्थी विकास विभागां'तर्गत*
----------------------------------------
*राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे*
 आयोजन करण्यात येत आहे. 
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त
----------------------------------------
 *“महिला सक्षमीकरणात :-सावित्रीबाई फुले यांचे योगदान”*
----------------------------------------
        या विषयावर स्वहस्ताक्षरात किंवा टंकलिखित निबंध  pdf स्वरूपात दि.१५ जानेवारी २०२१ पर्यंत
nareshingale83@gmail.com 
या ईमेल आयडीवर  पाठवावे.   
*नियमावलीः*
१) स्पर्धक विद्दार्थी हा वरिष्ठ महाविद्यालयाचा असावा तसेच शैक्षणिक सत्र २०२०-२१ 
 मध्ये प्रवेशित असावा.
२) निबंध विषयाला अनुसरून २५० ते ३०० शब्द मर्यादेत असावा.
३) निबंध सादर करताना विद्यार्थ्याचे नाव,महाविद्दालयाचे नाव, whats app क्रंमाक व ईमेल आयडी नमूद करणे अनिवार्य आहे.  
४)प्रत्येक सहभागी स्पर्धकांना *ई-प्रमाणपत्र* प्रदान करण्यात येईल.
६) अंतिम निर्णय स्पर्धेच्या परिक्षकांचा राहील.
*बक्षीस :*
*१)प्रथम बक्षीस-१००० रुपये*
 *प्रा.रामेश्वर विष्णूजी नागपुरे*
    यांचे कडून
(श्रीसंत बुधाजी महाराज आणि भागीरथी माता यांचे स्मृती प्रित्यर्थ)
*२)द्वितीय बक्षीस ७०० रुपये*
     *श्री पवन हनुमंतराव*
     *शिवणकर* 
        यांचे कडुन
(स्व.रामभाऊजी वायलूजी शिवणकर यांचे स्मृती प्रित्यर्थ)
*३)तृतीय बक्षीस ५०० रुपये
प्रा.राजीव भा.देशमुख*
      यांचे कडून
(स्व.भाऊरावजी नारायणराव देशमुख गावंडगाव यांचे स्मृती प्रित्यर्थ)
     तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना
 *ई-प्रमाणपत्र*
 देण्यात येईल.
*बक्षीस वितरण २६ जानेवारी २०२१ रोजी होईल.*
----------------------------------------
*विनित*
*डॉ.सुभाष एस.मुरे*
प्राचार्य, श्रीसंत शंकर महाराज कला महाविद्यालय,पिंपळखुटा.
९८६०७०३७३४
------------------------------------------------
*प्रा डॉ.नरेश शं.इंगळे*
विद्यार्थी विकास विभाग प्रमुख
 ९९७०९९१४६४
---------------------------------------------------

  *निबंध टपालेने सुध्दा पाठविता येईल*
*प्रत्यक्ष महाविद्यालयात सबमिट करता येईल
----------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...