*--काव्यसंग्रह समीक्षण--* ---------------–----------------------- शोषितांच्या वेदनेचा हुंकार म्हणजे "एका आंबेडकरवाद्याच्या कविता" ---------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे मु.भांबोरा ता.तिवसा जिल्हा अमरावती. मोबाईल- ९९७०९९१४६४ ईमेल-- nareshingale83@gmail.com ---------------------------------------- प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने झपाटलेला साहित्यिक म्हणून सर्वदूर सुपरिचित असलेले कवी प्रा.इब्राहिम खान (मु.पो. ता.तिवसा जिल्हा अमरावती) यांचा "एका आंबेडकरवाद्याच्या कविता" हा काव्यसंग्रह म्हणजे आंबेडकरी चळवळीला ऊर्जावर्धक दिशा देणारा आणि शोषित,पीडित,वंचित बहुजन समाजातील दुर्बल घटकाच्या व्यथा वेदनांना वाट मोकळी करून देणारा हा काव्यसंग्रह आहे.आपल्या प्रगल्भ लेखणीने साहित्य क्षेत्रात विशिष्ट स्थान निर्माण करणाऱ्या कवी इब्राहिम खानचे तत्पूर्वी अस्तित्वरेषा,युद्धखोरी,प्रस्फोट, बहिणीच्या कविता हे काव्यसंग्रह तर गावाकडच्या कथा (कथासंग्रह) अक्षराच्या क्षितिजाआड (मुलाखत संग्रह) मुस्लिम महार (आत्मकथन) क्रांतीयोद्धा,या...