" *फिरस्ती* म्हणजे सर्वसामान्याची प्रातिनिधिक स्वरूपाची प्रतिक्रियाच"
----------------------------------------
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
मु.भांबोरा ता.तिवसा
मोबा.९९७०९९१४६४
----------------------------------------
दैनिक बहुजन सौरभ या वृत्तपत्रातील "फिरस्ती" या स्तंभलेखनातील प्रा.संदीप गायकवाड यांच्या लेखनाचा प्रपंच म्हणजे संपूर्ण देशातील सर्वसामान्य नागरिकांची प्रातिनिधिक स्वरूपाची प्रतिक्रियाच म्हणावी लागेल. फिरस्तीत प्रा गायकवाड संपूर्ण समाज जीवनाचे वास्तव चित्रच उभे करीत आहे.या स्तंभलेखनात जमीनी स्तरावर सर्वसामान्यांची होत असलेली होरपळ आणि कोरोना महामारी काळातील त्यांची हतबलता याचे प्रतिबिंबच फिरस्ती मध्ये उमटलेले दिसते. लेखकाची सामाजिक जाणीव आणि सर्वसामान्य प्रति असलेली आस्था/तळमळ यातून प्रकर्षाने जाणवते.दि १६ जून २०२१ रोजी "अस्वस्थ मनाची घालमेल" या मथळ्याखाली लेखात प्रा.संदीप गायकवाड यांनी महामारीच्या काळात सर्वसामान्यांची होणारी घालमेल आणि सरकारच्या तकलाटू धोरणाचा चांगलाच समाचार घेतलेला आहे.त्यात त्यांनी सर्वसामान्याच्या समस्या आणि वेदना दृष्टिपटलावर आणण्यास महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे असेच म्हणावे लागेल.
सध्या कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिक भयभीत झालेला आहे.भुकेने व्याकूळ झालेला आहे.आरोग्य यंत्रणा पुर्णतः खिळखिळी झालेली आहे.खासगी उपचार सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही.सर्वसामान्यांच्या आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांना महागडा औषधोपचार कसा करावा हा प्रश्न आहे.त्यातच पुरेशा उपचाराअभावी अनेकांना मृत्युला कवटाळण्याची वेळ येत आहे.पर्यायाने अनेकांचे कुटुंब उघड्यावर येत आहेत.थांबलेल्या अर्थव्यस्थेच्या चक्रात छोट्या-मोठ्या उद्योगधंद्याची वाट लागली आहे.अनेकांचे रोजगार गेले.नवे प्रकल्प कामगाराच्या जीवावर उठले आहेत.गरिबी-श्रीमंतीची दरी कमी होण्याऐवजी अधिकाधिक रुंदावत आहे.शिक्षण क्षेत्राचे तीन तेरा वाजत आहे.सरकार हतबल, नव्हे!कदाचित दुर्लक्षच करीत आहेत.देशातील मुख्य समस्येला बगल देऊन देशाचे कार्यकारी प्रमुख विश्वगुरुचे स्वप्न दाखवीत आहे.त्यात सर्वसामान्य शोषित-पीडित नागरिकांचे स्थान काय? या सभोवती प्रा.गायकवाड यांची "फिरस्ती" आहे.त्यांची ही फिरस्ती अभिनंदनिय आणि सर्वसामान्यांना न्याय देणारी ठरेल यात शंकाच नाही.त्याच्या जनहीतकारी पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा......!
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
मु.भांबोरा ता.तिवसा
जिल्हा अमरावती
मोबाईल- ९९७०९९१४६४
Comments
Post a Comment