स्व.राजीव गांधी यांना अभिवादन श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिन म्हणून साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवर यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे प्रा.डॉ.मेघा सावरकर, अमित मेश्राम ओमप्रकाश इंगोले सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.