" संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ " ---------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे मु.भांबोरा तालुका तिवसा जिल्हा अमरावती मोबाईल ९९७०९९१४६४ ---------------------------------------- जगभरातील विविध देशाच्या संविधाना पैकी भारतीय संविधान हे लोकशाही प्रधान असलेले सर्वश्रेष्ठ संविधान आहे.विविध जाती,धर्म,पंथ बोलीभाषा आणि रूढी,प्रथा,परंपरा असलेल्या भारतासारख्या विशालकाय देशातील समस्त नागरिकांना एका धाग्यात गुंफण्याची किमया ही भारतीय संविधानाने करून दाखवीली आहे.सात दशकांचा कालावधी उलटूनही भारतीय संविधान अबाधित आहे. घटनाकारांची दूरदृष्टी यासाठी कारणीभूत आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले बुद्धिकौशल्य पणाला लावून आणि अहोरात्र कष्ट उपसून ही सर्वसमावेशक अशी भारतीय राज्यघटना लिहिली.भारतीयासाठी ही एकप्रकारची अनमोल अशी देणगीच म्हणावे लागेल. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा विधिग्राह्य आणि नियमानुसार सुव्यवस्थितरित्या चालावा यासाठी भारतीय संविधानाचा अंगीकार करण्यात आला.भारती...