*आजही दुविधेतच* *भाग-चार* कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर किरण कडून पहिलं प्रेमपत्र (चिठ्ठी) प्राप्त झालं अनं सूर्या कधी नव्हे इतका आनंदी झाला.जणू सर्व काही सुख त्याच्या पदरी पडलं,नव्हे सर्व जग आपल्या मुठीत आलं असंच काहीसं त्याला वाटू लागलं.अखेर त्याचे प्रयत्न फळाला आले.काही दिवसातच सूर्या आणि किरण या दोघांची प्रत्यक्ष भेट घडून आली.तदनंतरही भेटीगाठी होत राहिल्या.विचारांची देवाण-घेवाण सुरू झाली.काही गोष्टी प्रत्यक्ष भेटीतही सविस्तरपणे व्यक्त करता येत नव्हत्या.म्हणून त्याने त्याच्या मनातील किरण विषयी असलेली प्रचंड आस्था,प्रेम,जिव्हाळा अनं उदात्त भावना प्रेमपत्राद्वारे (चिठ्ठी)व्यक्त केले.म्हणून किरण त्यांचे पत्र वाचून नेहमी म्हणायची की, "तुमचे प्रेमपत्र (चिठ्ठी) वाचून इतका आनंद वाटतो की,ते पत्र एक वेळा वाचून माझं काही समाधान होत नाही.म्हणून मला ते प्रेमपत्र ( चिठ्ठी) दोन-तीन वेळा वाचून काढावं लागतं." "मला नेहमीच असं वाटतय की,तुमचं पत्र हे कायमस्वरुपी संग्रही ठेवावं.अनेकदा किरण सूर्याला म्हणायची की,तुम्ही खरोखर पत्...