*संक्षिप्त* ---- *आजही दुविधेतच* ---- ---------------------------------------- प्रेमात सर्व काही क्षम्य असतं.प्रेमाचा साक्षात्कार झाला की,कोणतेही उद्दिष्ट पूर्णत्वास जाण्यास वेळ लागत नाही.इतकेच काय तर एखाद्या कुकर्मी डाकूचे सुद्धा हृदयपरिवर्तन होऊन त्यांच्या भावी जीवनाला निश्चित आकार मिळण्यास मदत होते.त्यातही आधुनिक वर्तमान युगात प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमाला युवावर्गात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.इतकेच नव्हे तर युवा अवस्थेत ही जीवनाची खरी गरज झाली आहे.पण खऱ्या प्रेमाची माणसाला जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र माणसाच्या कोमल मनात अस्थिरता निर्माण होऊन हृदयाच्या स्पंदनाचा वेग झपाट्याने वाढू लागतो.असाच प्रकार माझ्या जीवनात मला सुद्धा अनुभवाला मिळाला. मी महाविद्यालयीन जीवन उपभोगले.पण कुणाच्या समोर प्रेमाचा हात पसरला नाही.मित्राचे अनुभव लक्षात घेऊन प्रेमापासून सदा दूर राहण्याचा प्रयत्न केला. इतरांप्रमाणे माझ्याही मनाला भूलविण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या युवावस्थेत प्रेमाची ज्...