---- *आजही दुविधेतच* ----
----------------------------------------
प्रेमात सर्व काही क्षम्य असतं.प्रेमाचा साक्षात्कार झाला की,कोणतेही उद्दिष्ट पूर्णत्वास जाण्यास वेळ लागत नाही.इतकेच काय तर एखाद्या कुकर्मी डाकूचे सुद्धा हृदयपरिवर्तन होऊन त्यांच्या भावी जीवनाला निश्चित आकार मिळण्यास मदत होते.त्यातही आधुनिक वर्तमान युगात प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमाला युवावर्गात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.इतकेच नव्हे तर युवा अवस्थेत ही जीवनाची खरी गरज झाली आहे.पण खऱ्या प्रेमाची माणसाला जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र माणसाच्या कोमल मनात अस्थिरता निर्माण होऊन हृदयाच्या स्पंदनाचा वेग झपाट्याने वाढू लागतो.असाच प्रकार माझ्या जीवनात मला सुद्धा अनुभवाला मिळाला.
मी महाविद्यालयीन जीवन उपभोगले.पण कुणाच्या समोर प्रेमाचा हात पसरला नाही.मित्राचे अनुभव लक्षात घेऊन प्रेमापासून सदा दूर राहण्याचा प्रयत्न केला. इतरांप्रमाणे माझ्याही मनाला भूलविण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या युवावस्थेत प्रेमाची ज्योत जागविण्याचा प्रयत्न झाला असला तरी कुणालाही सकारात्मक होकार दिला नाही. पण शेवटी मी एक हाडामासाचा सर्वसामान्य युवक होतो.मला ही भावना होत्या.मन होते.एका मुलीला बघून माझ्या भावना जागृत झाल्या.खऱ्या प्रेमाची जाणीव झाली.युवावस्थेत प्रेमाचा पाझर फुटतो हे मला प्रत्यक्षात अनुभवास येऊ लागले.आपल्या विचाराला विचार मिळणारी मुलगी मिळाली म्हणजे भावना आपोआप जागृत होते.मला ज्या विचारांची सुंदरी आवश्यक होती त्या विचारांची मुलगी माझ्यासमोर होती.माझ्या जीवनात आशेचा किरण पडला.काळोखाला प्रकाश मिळाला.तिच्या नावाप्रमाणेच माझ्या जीवनात किरनोदय झाला.सुंदर,प्रफुल्लित,टवटवीत, नाजूक मनाची,मितभाषी कोकीळ स्वराची,निस्वार्थ,निरागस मन तथा आचार विचारांने प्रभावित झालो.प्रभावित झालो असलो तरी सोबत मात्र कसल्याही प्रकारचा संबंध नव्हता.तिच्या प्रेमाविषयी मी केवळ कल्पनेतील स्वप्नात रंगून गेलो होतो.वस्तुस्थिती पासून कोसो दूर होतो.तिला याबाबत कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती.माझें केवळ एकतर्फी प्रेम होते.एकतर्फी प्रेमामुळे मन विचलित होते.जोपर्यंत माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत केवळ कल्पनेतच रममाण व्हावे लागत असे.माझ्या भावना मी स्वतः तिच्यासमोर व्यक्त करण्यास असमर्थ होतो. याकरिता मला ईतराची मदत घेणे आवश्यक होते.तशा प्रकारची मला मदत सुद्धा मिळत गेली. किरण परगावी शिकायला होती. मी सुद्धा त्याच गावाला शिकायला होतो.पण प्रत्यक्ष भेटीत सुद्धा समन्वय नव्हता.तिचे वर्ग दुपारी तर माझे वर्ग सकाळी होत असे. केवळ तिचा चेहरा दिसावा, मनाला समाधान प्राप्ती, मन उल्हासित करून घ्यावे हे सुद्धा शक्य नव्हते.म्हणूनच किरणच्या प्रेमाच्या प्राप्तिसाठी माझ्या मित्राच्या सर्व अडचणीवर मात करावी लागली.पर्यायाने तिच्या अप्रत्यक्ष भेटीचा प्रतिदिन सारांश मला मिळत असे.कारण तो प्रत्यक्ष बोलण्यास एकाएकी शक्य नव्हते.पण त्याचे संबंध तिच्या घरासोबत घरगुती होती.त्यामुळे क्षणिक समाधान लाभत असे. तरीसुद्धा तिच्यावर प्रेमाने झोप कधीचीच निघून गेली होती.क्षणा-क्षणाला तिच्या आठवणीने तिच्या सहवासासाठी मन गहिवरून येत असे.माझे सकाळी वर्ग असल्यामुळे मला दुपारी घरी राहावे लागत असे.पण किरणच्या भेटीसाठी तळमळत राहण्यापेक्षा तिच्या वेळेवर येण्यासाठी आवश्यकता नसताना सुद्धा ४ ते ५ वाजताच्या दरम्यान शिकवणी वर्गाला जाण्यास सुरुवात केली.त्यामुळे अप्रत्यक्ष का होईना तिची भेट होत असे.पण किरण याबाबत पुर्णतः अनभिज्ञ होती.याशिवाय शनिवार व रविवारला क्रिकेट खेळणे सुरू केले.मैदान तिच्या घरासमोर असल्यामुळे नजरेला-नजर मिळत होत्या.योगायोग म्हणजे मी जेव्हा तिथे खेळायला राहायचो तोपर्यंत ती सुद्धा राहायची.जेव्हा मी गैरहजर राहत असे नेमके त्याच वेळेला ती सुद्धा घराबाहेर पडत नसे.त्यामुळे माझं अन माझ्या मित्राचा परिपूर्ण विश्वास झाला होता की,तिच्याही मनात माझ्याविषयी आपुलकी,प्रेम वाटत असावे असा समज होणे सहाजिकच होते.अशा स्थितीत माझ्या निर्मळ मनावर १० एप्रिल १९९३ शनिवारला मित्राने आघात केला.क्षणात रंगीन सुखद स्वप्न क्षणातच धुळीस मिसळून टाकले. हा केवळ त्याचा डावपेच होता हे कालांतराने लक्षात आले.पण प्रेमाची सुरुवात होण्यापूर्वीच अंत करून टाकण्यासाठी त्याने गनिमीकावा तयार केला.खऱ्या प्रेमाचा अंत नसून ते अमर असते हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.म्हणूनच किरण सोबत प्रत्यक्ष प्रेम करण्याची संधी मिळाली नसली तरी अप्रत्यक्ष संधी कुणीही हिरावून घेऊ शकणार नव्हते.कारण तिच्या शरीरावर प्रेम नव्हते तर तिच्या सुस्वभावावर होते.तिला कल्पना नसतानाही तिच्यावर अप्रत्यक्ष प्रेम करायचे निश्चित केले.किरणच्या प्रेमाअभावी मन निराश,उदास आणि नैराश्यपूर्ण वाटत असे.जीवन निरर्थक वाटत असे.अप्रत्यक्ष का होईना सदा जनमानसाच्या पर्यायी तिच्या स्मरणात राहावे यासाठी काही वेगळ्या स्वरुपात राहण्याचा प्रयत्न केला.त्याच वर्षी माझी एस.वाय.जे.सी.ची परीक्षा होती. खूप मेहनत,परिश्रम तथा अभ्यास करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो.अन महाविद्यालयातुन दुसरा क्रमांक सुद्धा प्राप्त केला. याची परिणीती मी लोकांच्या आदरास पात्र ठरलो.लोकांनी कौतुक सुद्धा केले.किरणने सुद्धा माझे कौतुक केले.पण तिला प्रत्यक्ष प्रेमाची कसलीही कल्पना नव्हती.जर तिला अशी कल्पना असती तर------याशिवाय नैतिक आचरणाचा प्रभाव,सामाजिक बांधिलकी तथा दैनिक वृत्तपत्रलेखन आणि शैक्षणिक प्रगतीने जनमाणसात मानसन्मान मिळत गेला.
पती-पत्नीचे नाते सात जन्माचे बंधन असते.देवाघरून हे बंधन बांधले असून अतूट अशा बंधनाला कुणीही विलग करू शकत नाही.प्रेमामुळे ते अधिक मजबूत होतात.अशाच प्रकारची समाजात रुढ म्हणी आहे.पण त्यात कितपत सत्यता आहे? ज्याप्रमाणे पती-पत्नीचे अतूट संबंध एका रेशमी धाग्यात बांधले जाते त्याचप्रमाणे प्रियकर-प्रेयसीचे नाते असावे. असाच साक्षात्कार *८ जानेवारी १९९४* ला अनुभवास आला असून माझे प्रेम पुनर्जीवित झाले. अचानक किरण अन तिची मैत्रीण माझ्या घरी येऊन प्रेमाची हिरवी झेंडी दाखविली.आकस्मिक होकार मिळाल्यामुळे यावर माझा विश्वास वाटत नव्हता.एकाएकी किरणचे मत परिवर्तन कसे झाले? माझ्या भावना तिच्याजवळ कोणी व्यक्त केल्या असाव्या? आकाशातील तारेप्रमाणे नानाविध प्रश्न उभे राहू लागले.प्रश्नाच्या भडीमारातच मन आनंदून किरणला स्वप्नात न्याहाळू लागलो.तो क्षण मला अविस्मरणीय वाटू लागला.पुन्हा दुसऱ्या भेटीची आतुरतेने प्रतीक्षा करीत होतो.एक रात्र कित्येक काळाची वाटत होती.घड्याळेचे काटे संथगतीने फिरत होते.बैचन मन उतावीळ होत होते.त्याच स्थितीत १७/ ०२/१९९४ ला लिहिलेले पहिले पत्र मला २२/०२/१९९४ ला प्राप्त होऊन लगेच भेट घडून आली.आमचे मधुरमिलन घडून आले.विचारांची देवाण-घेवाण,उत्तर,-प्रतिउत्तर एकमेकांना करू लागलो.आमचे मधुर मिलन घडुन आले.विचारांची देवाणघेवाण, उत्तर-प्रतिउत्तर एकमेकांना करू लागलो.प्रतीक्षेनंतरची भेट किती सुखद असते याचा अनुभव प्रथम चाखायला मिळाला.त्यात किती गोडवा असतो.कित्येक तास निघून गेले असले तरी वेळेचे भान अजिबात नव्हते.प्रेमाची फूलबाग बहरली.कुणाची दृष्ट लागावी आणि कुणाला प्रेरणादायी ठरावे अशा प्रेमाचा शुभारंभ झाला.एक एक क्षण आम्हाला दूर ठेवण्यास कमकुवत पडत असे.माझ्या प्रेमाचा एक प्रसंग तर मला नेहमीच आठवण करून देतो.एक वेळ मी आजारी असताना तिने सुद्धा आजाराचे रूप धारण करून अन्नसेवन करणे बंद केले होते.
इतके अतूट प्रेम असून सुद्धा कुणाची नजर लागून अल्पावधीतच आमची ताटातूट झाली.एप्रिल ते मे महिन्याचा कालावधी असावा.उन्हाळ्यात खूप उन्ह तापत असताना आमचे प्रेम सुद्धा खूपच तापू लागले.उन्ह अंगाला चटके देत असे.पण शरीरावर त्याचा शून्य परिणाम. एकाएकी भेटीगाठीला पूर्ण विराम बसला.पत्रव्यवहार बंद झाला. इतकेच काय तर एकमेकांच्या नजरेला नजर मिळविण्यास उभयंताकडून बंदी वाटत होती. माझी पडछाया तिला अभद्र वाटत होती.असे एक वर्ष निघून गेले तरी भेट नव्हती.अचानक असा प्रसंग का ओढवला?आपण कोणती चूक केली?आदी प्रश्नाचे उत्तराबाबत द्विधा स्थितीत पडलो.काही दिवसातच तिचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.पण माझी बाजू मला मांडण्याची संधी दिली नाही. एकाएकी माझ्या सहवासातून दूर का गेली?माझे प्रेम तिने का झिडकारले? तिने माझी चूक लक्षात का आणून दिली नाही? मला भेटण्याचे तिने का नाकारले? मला बाजू मांडण्याची संधी का दिली नाही?विवाहाला चार वर्ष होऊन आज सुद्धा का टाळत आहे? दुखावलेल्या अनं दुरावलेल्या प्रियकराची आठवण सतावत नाही का?आदी प्रश्नांचे कोडे आजही माझ्यासमोर आहे. समर्पक उत्तर अभावी माझे मन आजही दुविधेतच आहे.
----------------------------------------
*दैनिक देशोन्नती (विरंगुळा)*
*शुक्रवार दि.०५/०२/१९९९*
----------------------------------------
*काही निवडक प्रसंग*
१)बुधवार दिनांक १५ मे १९९१ रोजी मारडा या गावी एका लग्नप्रसंगी सूर्या किरणकडे आकर्षित झाला आणि त्याचवेळी तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडला.
२)शनिवार दिनांक १० एप्रिल १९९३ या दिवसापासून हेमंतने सूर्या-किरणबाबतीत (एकतर्फी प्रेम असताना) उलट सुलट चर्चा घडवून आणली.हेमंतने सुर्याचा विश्वासघात केला.
३) ८ जानेवारी १९९४ या दिवशी किरण आणि तिची मैत्रीण सानिया अचानकपणे सूर्याच्या घराच्या दिशेने आल्यात.मध्येच रामेश्वररावच्या घरी गेल्यात अनं लगेच सानिया कडून किरणचा प्रेमास होकार असल्याचा निरोप मिळाला.त्यावेळी किरणने कथिया रंगाचा स्कर्ट व हिरवट कलरचा ब्लाऊज (टाफ) परिधान केले होते.
४) १७ फेब्रुवारी १९९४ रोजी लिहिलेले पहिले प्रेमपत्र २२ फेब्रुवारी १९९४ रोजी प्राप्त झाले. त्यावेळी किरण सोबत सानिया सुद्धा होती.किरणने आकाशी रंगाचे ब्लाऊज (टॉप) काळ्या रंगाचे स्कर्ट व त्यावर ठिपक्या ठिपक्याच्या बारीक बारीक चांदण्या होत्या असा ड्रेस परिधान केला होता.
५) तत्पूर्वी २२ फेब्रुवारी १९९४ रोजी सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे सुर्यगंगा नदीवर भेट झाली.तिचे कडून तिचा फोटो प्राप्त झाला.
६) २५ फेब्रुवारी १९९४ च्या दरम्यान सूर्याच्या तब्येतीत बिघाड झाला असता ती त्याच्या घरी भेटीसाठी आली होती.विचारपूस केली. तिने सुद्धा जेवण केले नसल्याचे सांगितले.
७) २० मे ते २५ मे १९९४ चे दरम्यान सूर्या त्याचे मामाच्या गावी लग्नासाठी गेला होता. त्याच्या पश्चात हेमंतने सूर्या-किरणच्या प्रेम प्रकरणाची संपूर्ण गावात उलट-सुलट चर्चा घडवून आणली होती.तिच्या वडिलांच्या कानावर सुद्धा ही माहिती पोहचली होती.
८) १५ सप्टेंबर १९९४ रोजी सूर्यगंगा नदीवर किरण नजरेत (इ/एस च्या) पडली.त्यावेळी ती अत्यंत कृश/ अशक्त दिसत होती.
९) १० नोव्हेंबर १९९४ (गुरुवार) ला सूर्यगंगा नदीवर सूर्या आणि किरणची भेट झाली.सर्व बदनामीचे खापर तिने सूर्याच्या डोक्यावर फोडले आणि पुढे कसलेही संबंध ठेवण्यास नकार दिला.त्यावेळी किरणने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने शेवाळी रंगाचा पॅन्ट व हिरव्या रंगाचे शर्ट परिधान केले होते
१०) ०४ नोव्हेंबर१९९५ रोजी दुपारी १.३० वाजता शाळेजवळील वॉटर सप्लाय जवळ किरणची समीर सोबत अचानक भेट झाली.त्यावेळी तिने सूर्यासोबत बोलण्याची/भेटीची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. तसेच सूर्या प्रति सहानुभूती दाखविली होती.
११) २ मे १९९५ रोजी गावाचे बसस्टैंडवर दूर वरून किरण सूर्या एकमेकांसमोर आलेत पण त्यांच्यात अबोला होता.तिचे सोबत कृतिका(अजयची बहीण) होती.सूर्या व किरण यांच्यात तसा अबोलाच होता.त्याच दिवशी सूर्याचा बीए भाग दोन राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता.पेपर सुटल्यानंतर १.४७ वाजता तालुक्याच्या बसस्टॉपवर सूर्या आला किरण बसस्टॉपवर बसली होतीच.त्याचवेळी गजाहु व सूर्या यांची (साईनाथ पान टपरीवर) गाठभेट झाली व त्यांने किरण-अजयच्या प्रेमप्रकरणाविषयी सविस्तर अशी माहिती सांगितली व सूर्याची समजूत सुद्धा काढली.पण सूर्याचा त्यांच्या म्हणण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता.त्यावेळी किरणने कथिया रंगाचा पंजाबी सलवार सुट तर सूर्याने हिरव्या रंगाचा पॅन्ट गुलाबी रंगाचे शर्ट परिधान केले होते.
१२)१८ फेब्रुवारी १९९६ रोजी सूर्या जिल्ह्याच्या ठिकाणावरून आजाराची तपासणी करून गावी परत येत असतानाच किरणच्या लग्नाविषयी माहिती कानावर पडली.विवाह सुद्धा वादग्रस्त ठरला होता.नंतर समेट झाला.
१३) २३ किंवा २४ फेब्रुवारी १९९६ (शुक्रवार किंवा शनिवार) रोजी किरणचा विवाह संपन्न झाला.
१४) २ मार्च १९९६ रोजी (शनिवार) प्रीतीभोज कार्यक्रम संपन्न.त्यादिवशी सूर्या हा आजारीच होता.लोक ही बातमी मुद्दाम सूर्याला सांगत होते.
१५)२६ जून १९९९ (शनिवार) वेळ दुपारी ४.३५ वाजता किरणची वर्गमैत्रीण सुप्रियाच्या लग्नप्रसंगी (तालुक्याचे ठिकाण वरील मंदिर) कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरची भेट झाली.अल्प वेळ पण बरीच बिनधास्त चर्चा झाली.समाधान वाटले.
१६) २४ मार्च २००५ गुरुवार रोजी ११.३५ वाजता सूर्या मोठं धाडस करून किरणच्या घरी पोहचला व त्यांने त्याच्या लग्नाची पत्रिका किरणला दिली.सोबतच जपणूक करून ठेवलेले पहिले प्रेमपत्र व फोटो तिच्याकडे सुपूर्द केला.लग्नांला येण्याचा आग्रह केला.जड अंतकरणाने निरोप घेतला.
-----------------------------------
*निवडक अप्रत्यक्ष भेटी*
किरण कडून सूर्या किरणचे प्रेम प्रकरण जवळपास संपुष्टात आल्यागत होते.किरण ही सूर्याला भेटण्यास वा बोलण्यास पूर्णतः नकारार्थी होती.तरीही सूर्या किरण प्रति आस लावून बसला होता.आज ना उद्या तिचे मतपरिवर्तन होईल असे त्याला वाटत होते.म्हणून ती त्याला प्रत्यक्ष भेटत नसली तरी तो तिला भेटण्याचा वा तिला दूरवरून बघण्याचा प्रयत्न करीत असे. तसा त्याचा तो नित्यक्रम होता. त्याला तिला बघितल्याशिवाय अजिबात करमत नव्हते.म्हणून तो मिळेल त्या वेळेत तिच्या घराच्या आसपास किंवा ती ज्या परिसरात असेल तेथे जाऊ लागला.दूरवरून बघण्याचा प्रयत्न करू लागला.
त्यातील काही निवडक अप्रत्यक्ष भेटी पुढील प्रमाणे आहेत.
१) १४ नोव्हेंबर १९९४ (सोमवार) चार वाजता किरण ही तिच्या आईसोबत तिच्या मामाच्या गावाला जात होत्या (अंदाजे). त्यावेळी किरणने मिक्स कलरचा पंजाबी सलवार सूट तर सूर्याने शेवाळी पॅन्ट आणि हिरव्या रंगाचं शर्ट परिधान केलं होतं.
२) १४ नोव्हेंबर १९९५ रोजी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी ती प्रणिताच्या घराकडे जात असताना नजरेत पडली.त्यावेळी तिने आकाशी रंगाचे गाऊन तर सूर्याने हिरवा रंगाचा पॅन्ट आणि बन शर्ट परिधान केला होता.
३)१८ नोव्हेंबर १९९४ शुक्रवार दहा वाजून ३५ मिनिटांनी ती गावाच्या शाळेजवळ दूरवरून दृष्टीत पडली.त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने भुरकट रंगाचा पॅन्ट बन शर्ट परिधान केले होते.
४) २१ नोव्हेंबर सोमवार ५.५५ वाजता ती गावातील शाळेजवळ दृष्टीत पडली.ती डेहणी रस्त्याने जात होती.त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने शेवाळी रंगाचा पॅन्ट व गुलाबी रंगाचे शर्ट परिधान केले होते.
५) २१ नोव्हेंबर १९९४ च्या मध्यरात्री ती स्वप्नात आली.तिला त्याने प्रणिताच्या घरी बघितले होते.
६) २३ नोव्हेंबर १९९४ बुधवार सकाळी ८.४० वाजता ती एकटी शाळेजवळ दिसली.त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने लाल रंगाचे स्वेटर आणि लुंगी परिधान केली होती
७) २५ नोव्हेंबर १९९४ शुक्रवार सकाळी ८.२० वाजता वॉटर सप्लाय जवळ पाणी भरते वेळी दिसली.त्यावेळी किरणने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने हिरव्या रंगाचे शर्ट आणि लाल रंगाची लुंगी परिधान केली होती.
८) २६ नोव्हेंबर १९९४ शनिवार सकाळी ११:२० वाजता तिची आई आणि काही महिला सोबत ती गावच्या बस स्टॉपवर जात होते.त्यावेळी तिने साडी (त्यावर स्टार्स) तर सूर्याने आकाशी रंगाचा पॅंट आणि पांढऱ्या रंगाचे शर्ट परिधान केले होते.
९) २८ नोव्हेंबर १९९४ सोमवार १०:५० वाजता ती प्रणिताच्या घराशेजारी दिसली. त्यावेळी तिने आकाशी रंगाचे गाऊन तर सूर्याने लाल रंगाचे शर्ट खाकी पॅंट त्याच दिवशी किरण सूर्यगंगा नदीवर लहान मुलांना सोबत घेऊन कपडे धुवायला नदीवर जात होती. तेव्हा सूर्या हा तिच्या घराशेजारील शाळेत तिची वाट पाहत बसला होता आणि ती घरातून बाहेर आली आणि सरळ सूर्यगंगा नदीवर गेली.त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने लाल रंगाचे शर्ट आणि खाकी पॅन्ट परिधान केला होता.
१०) ३ डिसेंबर १९९४ दुपारी १.५५ वाजता गावच्या बस स्टॉप वरुन सूर्या परत येत असताना सूर्य गंगा नदीवर इतर मुली सोबत किरण ही सुद्धा कपडे धुवायला आली होती. त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने हिरव्या रंगाचा पॅन्ट आणि गुलाबी रंगाचे शर्ट परिधान केले होते.
११) ६ डिसेंबर १९९४ गुरुवार पाच -सहा वाजता डेहनी रस्त्याने जात होती.सोबत दोन मुली होत्या. त्यावेळी किरणने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने हिरव्या रंगाचे शर्ट परिधान केले होते. त्याच दिवशी सकाळी दहा वाजून ४७ मिनिटांनी दोन मुलींसोबत बस स्टँड कडे येत होत्या. त्यावेळी तिने हिरव्या रंगाचा पंजाबी सलवार सूट तर सूर्याने आकाशी रंगाचा पॅन्ट आणि हिरव्या रंगाचे शर्ट परिधान केले होते.
१२) ७ डिसेंबर १९९४ बुधवार सकाळी १०.५७ वाजता किरण ही तिच्या घराकडून सूर्यगंगा नदीवर कपडे धुवायला येत होती. त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने खाकीसारखा पॅंट परिधान केला होता.
१३)०८ डिसेंबर १९९४ गुरुवारला ती डेहनी रस्त्याने जात होती.तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने हिरव्या रंगाचा पॅन्ट व शर्ट परिधान केले होते.
१४) ११ डिसेंबर १९९४ च्या मध्यरात्री ती स्वप्नात आली होती. ती प्रणिताच्या घराकडे ये जा करीत होती तर सूर्या हा शाळेजवळ उभा होता.यावेळी तिने पंजाबी सलवार सूट परिधान केला होता.
१५) १२ डिसेंबर १९९४ सोमवारला किरण ही तिच्या आई सोबत गावच्या स्टॅन्डकडे जात होती. सोबत काही मुली सुद्धा होत्या.सूर्या तेथून परत आला व लगेच ११:२० वाजता गावच्या स्टैंडवर पोहोचला. ११.२० ते ११. ४३ वाजता पर्यंत स्टॅन्डवरच थांबला.११.४३ वाजता एम डब्ल्यू क्यू ६१३२ क्रमांकाचे बस मध्ये किरण आणि इतर मंडळी बसने तालुक्याच्या ठिकानाकडे निघून गेलीत.हतबल/निराश सूर्या मात्र त्या बसमध्ये गेला नाही तर बसस्टॉपवरच थांबला.त्यावेळी किरणने पंजाबी सलवार ड्रेस तर सूर्याने हिरवा शर्ट आणि शेवाळी रंगाचा पॅन्ट परिधान केला होता.
१६) १३ डिसेंबर १९९४ मंगळवार रोजी सकाळी ११.०७ वाजता सूर्यगंगा नदीवर ती एकटीच कपडे धुवत होती. त्यावेळी तिने मिक्स पंजाबी सलवार सूट (त्यावर ठिपके टिपके) परिधान केला होता तर सूर्याने हिरव्या रंगाचे शर्ट, आकाशी रंगाचा पॅन्ट परिधान केला होता.
१७) २१ डिसेंबर १९९४ बुधवार दुपारी २.४७ वाजता किरण ही सूर्यगंगा नदीवर एकटीच कपडे धुवायला येत होती.त्यावेळी सूर्याने लाल रंगाचा शर्ट हिरव्या रंगाचा पॅन्ट तर किरणने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.त्या दिवशी समीरची तीन वेळा भेट झाली.घर परिसर,शाळेजवळ/वॉटर सप्लाय जवळ,नदीवर भेट झाली असल्याचे सांगितले.
१८) १४ डिसेंबर १९९४ बुधवार दुपारी २.३७ वाजता किरण ही सूर्यगंगा नदीवर दोन मुली सोबत कपडे धुवायला जात होती. त्यावेळी तिने लाल रंगासारखी मिक्स साडी परिधान केली होती.सूर्याने खाकी रंगा सारखा पॅन्ट गुलाबी शर्ट परिधान केले होते.
१९) १५ डिसेंबर १९९४ गुरुवार वॉटर सप्लाय जवळ दृष्टीत पडली (पाणी भरण्यासाठी) लाल लुंगी गुलाबी शर्ट परिधान केले होते.
२०) १६ डिसेंबर १९९४ शुक्रवार सकाळी ११.०२ वाजता किरण प्रारंभी प्रणिताच्या घराजवळ आणि नंतर शाळेजवळ आली. त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि आकाशी रंगाचा पॅन्ट परिधान केला होता.
२१) २५ डिसेंबर १९९४ रविवार सकाळी १०.२० ते दुपारी ०३.१० वाजताचे दरम्यान गावचे मैदानावर क्रिकेट खेळणे सुरू होते.त्यात सूर्या सुध्दा सहभागी होता.त्यावेळी किरण ही तिच्या घराबाहेर होती व सोबत काही मुली पण होत्या.त्यावेळी तिने लाल रंगाचा गाऊन तर सूर्याने आकाशी रंगाचा पॅन्ट आणि हिरव्या रंगाचे शर्ट परिधान केले होते.
२२) २९ डिसेंबर १९९४ गुरुवार सकाळी ०८.०६ वाजता ती वाटर सप्लायचे (सार्वजनिक नळ) ठिकाणावरून पाणी भरत होती. त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने तर लाल लुंगी आणि पांढरे शर्ट परिधान केले होते. आता नवीन वर्षाला (१९९५) सुरुवात झाली होती. एक जानेवारी १९९५ रविवारला सकाळी आठ चाळीस वाजता किरण ही वाटर सप्लाय वरून पाणी भरत होती.शुभेच्छा देण्याची इच्छा असतानाही भेटता आले नाही.तिचीच तयारी नव्हती. म्हणून शुभेच्छा देता आल्या नाही.भेटता आले नाही.त्यावेळी तिने हिरव्या रंगासारखा पंजाबी सलवार सूट तर सूर्याने खाकी सारखा पॅन्ट मिक्स शर्ट परिधान केला होता.
२३) ०५ जानेवारी १९९५ गुरुवार दुपारी ०१.४० वाजता सूर्या तालुक्याच्या ठिकाणी साई पान मंदिरवर उभा होता.किरण बस स्टॉपवर बसली होती. तिचे सोबत प्रणिता व तिची मोठी बहीण होती.त्यावेळी तिने हिरव्या रंगाचा मिक्स पंजाबी सलवार सूट तर सूर्याने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
२४) ०८ जानेवारी १९९५ ला सूर्या हा दुपारच्या सत्रात रामेश्वराच्या घराजवळ बसला होता.त्याला मागील वर्षाची आठवण येत होती.किरण व सानिया ज्या रस्त्याने आल्या होत्या त्याच रस्त्याने पुन्हा तिची वाट पाहत होता.पण ती रस्ता विसरली होती.रस्ता चुकली होती.त्या दिवशी सूर्या निराश होता.विशेष म्हणजे दरवर्षी त्याच तारखेला (०८ जानेवारी) गावी असेल तेव्हा तेव्हा रामेश्वररावच्या घराजवळ नक्कीच वाट पाहतो. पण ती कधीच नजरेत पडत नाही आणि भविष्यात पण अशीच स्थिती राहील.पण सूर्या मात्र त्याचा नित्यक्रम कधीच विसरला नाही, विसरणार पण नाही.हा दिवस त्याच्यासाठी अविस्मरणीय आहे.
२५) ०९ जानेवारी १९९५ सोमवार सकाळी ११.१७ वाजता किरण दोन मुली सोबत नजरेत पडली. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी सलवार सूट (त्यावर ठिपके ठिपके) असा ड्रेस तर सूर्याने आकाशी रंगाचा पॅन्ट आणि गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलं होतं.ती गावच्या बस स्टॉपवर जात होती. तीची रोडने कालवा आहे (पुलाजवळ)त्या ठिकाणी भेट झाली पण ती काही बोलली नाही.
२६) १३ जानेवारी १९९५ शुक्रवार मध्यरात्री ती स्वप्नात आली.
२७) १५ जानेवारी १९९५ रविवारला काही मुली समवेत ती दृष्टीत पडली.त्यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती तर सूर्याने आकाशी रंगाचा पॅन्ट हिरवं शर्ट परिधान केलं होतं.
२८) १६ जानेवारी १९९५ सोमवार सकाळी ०९.४५ वाजता सूर्या रामेश्वररावच्या घराजवळ बसला होता.तेव्हा ती नजरेत पडली.त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने लाल रंगाची लुंगी आणि स्वेटर परिधान केले होते.
२९) १८ जानेवारी १९९५ बुधवार चार वाजून दहा मिनिटांनी किरण नजरेत पडली.त्यावेळी ती अतिशय आनंदी होती. त्यादिवशी शाळेमध्ये वोटिंग कार्ड बनविणे सुरू होते.दोघेही या कार्डसाठी शाळेत आले होते.अबोला कायम होता.
३०) २० जानेवारी १९९५ शुक्रवार सायंकाळी ०५.४० वाजता किरण नजरेत पडली तिथे uncle WK होते. त्यावेळी तिने पिवळ्या-पांढरा रंगाचा पंजाबी सलवार सूट परिधान केला होता.
३१) २६ जानेवारी १९९५ ला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी (प्रभातफेरी) ती तिच्या घरासमोर उभी होती. त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन परिधान केले होते.नंतर सायंकाळी ५.४० वाजता पायाला ठेच लागली बीकेजी कडे उपचार केला.त्याने हिरव्या रंगाचा पॅन्ट गुलाबी रंगाचे शर्ट परिधान केले होते.
३२) २८ जानेवारी १९९५ शनिवार सकाळी आठ पस्तीस वाजता वाटर सप्लायवरून पाणी भरताना नंतर घरातील केरकचरा नेत असताना ०९.४५ वाजता दिसली. त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने हिरव्या रंगाचा पॅन्ट गुलाबी रंगाचे शर्ट परिधान केले होते.
३३) ०२ फेब्रुवारी १९९५ गुरुवारला नऊ दहा वाजता काही महिलांसोबत ती दिसली.तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने हिरवा शर्ट लाल लुंगी परिधान केली होती.त्याच रात्री ती स्वप्नात आली.स्वप्नात ती एकटीच घरी होती त्यावेळी तिने काळसर रंगासारखे गाऊन परिधान केले होते.
३४) १३ फेब्रुवारी १९९५ सोमवारी मध्यरात्री ती स्वप्नात आली.तिच्या परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर जो किस्सा घडला त्यावर दोघात चर्चा झाली.
३५) १४ फेब्रुवारी १९९५ मंगळवार सकाळी ०८.४२ वाजता ती वॉटर सप्लाय वरून पाणी भरत होती.त्यावेळी तिने लाल रंगाचे गाऊन तर सूर्याने हिरवा पॅन्ट गुलाबी शर्ट परिधान केला होता.
३६) १४ फेब्रुवारी १९९५ मंगळवार मध्यरात्री ती स्वप्नात आली होती. शाळेचा प्रोग्राम सुरू होता.त्यावेळी किरण त्याच्याकडे एकटक बघत होती.त्यावेळी तिने शाळेचा ड्रेस परिधान केला होता.
३७) २३ फेब्रुवारी १९९५ गुरुवार सूर्या जिल्ह्याच्या ठिकाणावरून आजारावस्थेत घरी परतत असताना गावातीलच व्यक्तीच्या ऑटोत बसला होता.ऑटोचालक सूर्या सोबत बोलत होता.तेव्हा सर्व लोक तिच्या बाबतीतच चर्चा करीत होते.
३८) ४ नोव्हेंबर १९९५ दुपारी १.३० वाजता समीर आणि किरणची भेट झाली.शाळा नजीक वाटर सप्लाय जवळ भेट झाली होती. तेव्हा तिने सूर्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तसेच सहानुभूती सुध्दा दाखविली.
३९) १८ फेब्रुवारी १९९६ रविवार सूर्या हा अमरावती वरून आजाराची तपासणी करून गावाकडे येत होता.गावातील सर्व मंडळी किरण ही अजय सोबत विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा करू लागली होती.ती चर्चा सूर्याच्या कानावर आदळली होती. चर्चा ऐकताच सूर्या पूर्णपणे कोलमडला होता.
४०) १९ फेब्रुवारी १९९६ सोमवार लग्न विवाहा संदर्भात वादविवाद नंतर समेट घडून आला. किरणचे वडील लग्नासाठी राजी नव्हते.किरणचे वडिल व अजय यांचे वेगवेगगळे मतप्रवाह होते
४१) अखेर २३/ २४ फेब्रुवारी १९९६ शुक्रवार/शनिवार या दिवशी अजय-किरण विवाहबद्ध झालीत.
४२) ०२ मार्च १९९६ शनिवार तिच्या लग्नाचे रिसेप्शन असल्याचे गावकऱ्याकडून सूर्याला समजले.त्यावेळी सूर्या हा आजारी होता.
४३)२६ जून १९९९ शनिवार दुपारी ०४.४३ वाजता किरणची वर्गमैत्रीण सुप्रियाच्या लग्नात (तालुक्याचे ठिकाण वरील मंदिर) चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भेट झाली.चर्चा झाली.जड अंतकरणाने निरोप घेतला.
४४)२४ मार्च २००५ गुरुवारी सूर्या हा मोठ्या धाडसाने किरणच्या घरी पोहचला. तिला त्याने त्यांच्या लग्नाची पत्रिका दिली.लग्नाला येण्याचं निमंत्रण दिलं. तसेच सुर्याने जपून ठेवलेले पहिले प्रेमपत्र व फोटो किरणकडे सुपूर्द केले.
Comments
Post a Comment