*आजही दूविधेतच---!* *भाग दहा* तब्बल तीन दशकानंतर बालमैत्रिणी विशेषतः पणती आणि सानिया सूर्याच्या संपर्कात आल्यात.पूर्वी पेक्षा अधिक भेटीगाठी व्हायला लागल्यात. एकमेकांच्या घरी येणं-जाणं सुरू झालं.फोनवर संपर्क वाढला. यानिमित्ताने बालपण व शालेय जीवनातील आठवणीला उजाळा मिळाला.विचाराची देवाण-घेवाण व्हायला लागली.पणती आणि सानिया तिच्या मुलीसह सूर्याच्या गावी सुद्धा आल्यात.सूर्याची मुलगी पण सानिया आणि पणतीच्या घरी जाऊन आलीत. एकंदरीत काय तर तीन दशकापासून खंडित झालेलं मैत्री/ बहीण भावाचं नातं पूर्ववत आणि अधिक दृढ व्हायला लागलं.परंतु पणतीच्या मनात किरण विषयी असलेली खदखद सानिया पासून लपून राहिली नाही.सूर्याकिरण यांच्यातील अपयशी प्रेमासाठी काहीअंशी सानियाच जबाबदार असल्याची पणतीची धारणा झाली आहे.पणतीनं तशी जाणीवही सानियाला वारंवार करून दिली.सानियानं सुद्धा आपल्या चुकीची प्रांजळपणे कबुली दिली.पणतीच्या प्रयत्नाची फलश्रुती म्हणजे सूर्याकिरणच्या नियोजित भेटीसाठी पूर्वीप्रमाणे प्रयत्न करणार असल्याचा शब्द सानियानं दिला.काहीह...