Skip to main content

आजही दूविधेतच----भाग दहा

*आजही दूविधेतच---!* 
       *भाग दहा*
        तब्बल तीन दशकानंतर बालमैत्रिणी विशेषतः पणती आणि सानिया सूर्याच्या संपर्कात आल्यात.पूर्वी पेक्षा अधिक भेटीगाठी व्हायला लागल्यात. एकमेकांच्या घरी येणं-जाणं सुरू झालं.फोनवर संपर्क वाढला. यानिमित्ताने बालपण व शालेय जीवनातील आठवणीला उजाळा मिळाला.विचाराची देवाण-घेवाण व्हायला लागली.पणती आणि सानिया तिच्या मुलीसह सूर्याच्या गावी सुद्धा आल्यात.सूर्याची मुलगी पण सानिया आणि पणतीच्या घरी जाऊन आलीत. एकंदरीत काय तर तीन दशकापासून खंडित झालेलं मैत्री/ बहीण भावाचं नातं पूर्ववत आणि अधिक दृढ व्हायला लागलं.परंतु पणतीच्या मनात किरण विषयी असलेली खदखद सानिया पासून लपून राहिली नाही.सूर्याकिरण यांच्यातील अपयशी प्रेमासाठी काहीअंशी सानियाच जबाबदार असल्याची पणतीची धारणा झाली आहे.पणतीनं तशी जाणीवही सानियाला वारंवार करून दिली.सानियानं सुद्धा आपल्या चुकीची प्रांजळपणे कबुली दिली.पणतीच्या प्रयत्नाची फलश्रुती म्हणजे सूर्याकिरणच्या नियोजित भेटीसाठी पूर्वीप्रमाणे प्रयत्न करणार असल्याचा शब्द सानियानं दिला.काहीही झालं  तरी सूर्या किरणची एकदा तरी भेट घडून आणायचीच असा सानियानं चंग बांधला.सूर्या किरणची भेट झाल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही असंही सानियानं वारंवार बोलून दाखविलं.तसे प्रयत्नही सानियाकडून व्हायला लागलेत.त्या कालावधीत घडणाऱ्या घटना प्रसंगाने सूर्या पुन्हा भूतकाळात शिरला.जुन्या आठवणी/जखमा ताज्या झाल्यात.त्यावेळीचा प्रत्येक घटनाप्रसंग त्याच्या दृष्टीपटलावर यायला लागला.सूर्याची अवस्था जशी त्या कालखंडात होती तशीच अवस्था पुन्हा त्याच्या पदरी आली.पण त्यानं तशी कल्पना पणती व सानियाला कधीच येऊ दिली नाही.पुन्हा तो किरणच्या भेटीसाठी आस लावून बसला.मनोमन कुढत बसला.कधी ना कधी सानिया ही किरण सोबत आपली भेट घडून आणणार या भोळ्या आशेने सूर्या मनोमन अगदी सुखावला. भविष्यात किरण सोबत आपली भेट कधीच होणार नाही अशी मनाशी खूणगाठ बांधून असलेल्या सूर्याला सानियाच्या रूपाने "नवा आशेचा किरण मिळाला".म्हणून तो सानियाच्या निरोपाची भिरभिर वाट पाहू लागला.सानियाच्या अधिक संपर्कात राहू लागला.पण कित्येक महिन्यानंतरही सानियाकडून सकारात्मक निरोप काही मिळाला नाही/मिळत नव्हता.निराशा मात्र भरभरून मिळत होती.विशेष म्हणजे त्या दरम्यान सानिया ही बऱ्याचदा किरणच्या गावी जाऊन आली.जुनी घट्ट मैत्री असल्याने बरेचदा सानिया ही किरणच्या घरी राहू लागली.संपर्कात राहू लागली.वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू लागली.अर्थात किरण सोबत सानियाची गाठभेट झाली. परंतु तिचेसोबत तिच्या भूतकाळाविषयी (सूर्या बाबतीत)   चर्चा करण्यासाठी संधी काही मिळत नसल्याचे ती वेळोवेळी सांगू लागली.एवढं मात्र खरं की सूर्याव्यतिरिक्त अन्य बाबतीत त्यांच्यात होणाऱ्या संवादाची इत्यंभूत माहिती मात्र न चुकता सूर्याला मिळू लागली.किरणच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे हे मात्र नक्की कळत असे. प्रसंगांनुरूप तिच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या-वाईट प्रसंगाने सूर्याला कधी आनंद तर कधी वेदना व्हायला लागल्यात.२०२३ चा उत्तरार्ध आणि २०२४ चा पूर्वार्ध मध्ये घडलेल्या प्रसंगाची सूर्याला माहिती मिळायला लागली असली तरी सूर्या किरणच्या भेटीसाठीचे काय प्रयत्न आहे आणि नियोजन आहे याबाबतीत मात्र त्याला कधीच सकारात्मक निरोप मिळाला नाही.चार-पाच महिन्यापासून भेटण्याचे नियोजन तर बरेच बरे साधा त्याच्या नावाचा उल्लेखही किरणच्या समोर करता आला नाही.याउलट कालांतराने  दिवसेंदिवस सानिया सूर्यापासून अचानकपणे दूर अंतर ठेवायला लागली.अप्रत्यक्षरीत्या येनकेनप्रकारे टाळायला लागली असल्याचे तिच्या वागण्या-बोलण्यावरून सूर्याच्या सहज लक्षात यायला लागले.सानिया नेमकी काय भूमिका घेत आहे हे तिचे तिलाच ठावूक आहे पण सूर्या मात्र याबाबतीत पुन्हा दूविधेत अडकला.
        सानियाच्या प्रयत्नातून किरण सोबत नक्कीच भेट घडून येईल ही सूर्याची भोळी आशा कधी मावळली हे सुर्यालाही कळलं नाही.तो फक्त सानियावर विश्वास ठेवून होता.जे काही करायचं होतं ते सानियाला करायचं होतं.सुर्यासाठी किरणकडे जाणारे रस्ते तर केव्हाचेच बंद झाले आहे.म्हणून तर सूर्याची सर्व भिस्त ही सानिया वर आहे.परंतु दिवसेंदिवस सानियाची बदलत चाललेली भूमिका आणि व्यवहारावरून किरणला भेटण्याची आशा आता धुसर होत चालली आहे असा समज सूर्याचा व्हायला लागला.१९९४ च्या कालखंडात सानिया जशी सूर्यापासून दूर अंतर ठेवायची तशीच आताही काहीशी व्यवहार करीत असल्याची सूर्याची समजूत झाली.कारण पूर्वीप्रमाणे सूर्या सोबत सानियाचा फोन वरील संवाद थांबला.सूर्याला जमेल तसं टाळणं हेही सूर्याच्या लक्षात यायला लागलं.सानियाच्या मनात नेमकं काय दडलय याचा अंदाज सूर्याला काही येत नव्हता.तिच्या वागण्याचं रहस्य काही त्याला उलगडत नव्हतं.इतकं मात्र खरं की,कोणत्याही परिस्थितीत सानिया पूर्वीप्रमाणे आपल्यापासून पुन्हा दूर व्हायला नको.दृढ झालेले संबंध विस्कळीत व्हायला नको असाच सूर्याचा प्रयत्न राहिला आहे. सानिया मात्र सूर्यापासून दूर अंतर ठेवण्यातच धन्यता मानयला लागली.तीन दशकापूर्वी सानियाचा सूर्या सोबत जसा व्यवहार होता तशाच व्यवहाराची सूर्याला आवर्जून आठवण व्हायला लागली.
        वास्तविकता किरण सोबत भेट व्होवो अथवा न व्होवो पण पूर्वीप्रमाणे सानिया दूर व्हायला नको असंच सूर्याला वाटतंय. किरण सोबत भेट घडून आणण्याच्या नादात सानिया पुन्हा दूर व्हायला नको म्हणून कालांतराने सूर्या हा सानिया सोबत जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष वा फोनवर बोलायचा तेव्हा तेव्हा किरण बाबतीतचा विषय काढणे टाळायचा आणि टाळण्याचा प्रयत्न आहे.बहिण भावाच्या नात्यात आता किरणचा विषय नको असाच सूर्याने "पण" घेतला.सानिया सोबत बोलताना सूर्याने किरणचा विषय घेणे हेतूपुरस्सर टाळणे सुरू केले.शिवाय पणती सुद्धा सानिया सोबत बोलताना नेहमीच किरण बाबतीत बोलायची वा सूर्याची किरण सोबत भेट घालून देण्याचा आग्रह धरायची हे सूर्याला ठाऊक आहे.म्हणून सूर्यानं पणतीला सुद्धा सानिया सोबत बोलताना किरण बाबतचा विषय हाताळायचा नाही वा भेट घडून आणण्याचा आग्रह धरायचा नाही असं तळमळीनं पणतीजवळ सांगून ठेवलं.सानियाचा बदललेला व्यवहार लक्षात घेता पणतीनही किरणचा विषय घेणे वा त्या विषयावर बोलणे बंद केले असल्याचे सांगितले.पणतीनं हे सर्व मत सानियाजवळही व्यक्त केलं.केवळ किरणसाठी मैत्रीत अंतर आणू नको असं सांगण्यासही पणती विसरली नाही.मात्र सानिया कडून पुरेसा प्रतिसाद न मिळता उलट ती सूर्यापासून दूर अंतर ठेवायला लागली.मध्यंतरी तर साधारणतः एक दीड महिना सानियानं सूर्या सोबत अबोला धरल्यासारखं वागत होती.हे मात्र सूर्याच्या पसंतीत पडलं नाही.उलट सानियाचं असं वागणं सूर्यासाठी अतिशय क्लेशदायक ठरलं.म्हणून त्यानं सुद्धा घट्ट मन करून सानियासोबत काही दिवस अबोला धरला.हे ही त्याला रुचलं नाही.म्हणूनच त्याने लवकरच अबोला खंडीत केला.आपण मनोभावे बहीण भावाचं नातं जपतोय आणि सानिया मात्र भावापासून दूर अंतर ठेवतोय.सानिया नेमकी सूर्यासोबत अशी का वागतोय याबाबतीतच कोडं सूर्याला अद्यापही उलगडता आलं नाही.
     किरणचे आई-वडील हे सानिया कडे काही दिवस मुक्कामी आहेत असं सानिया व तीचे पती (जावाई बापू) कडून समजलं.किरण व अजय मध्ये कदाचित खडके उडत असावे शिवाय तिचे आई वडील आणि अजय यांच्यात मतभेद होत असावे म्हणून ते काही दिवस सानिया कडे मुक्कामी आलेत. म्हणून सूर्या व त्याच्या मैत्रिणी एकमेकांसोबत बोलताना किरणच्या वैवाहिक जीवनावर चर्चा व्हायची.त्याच दरम्यान २१ जून २०२४ शनिवार रोजी (मध्यरात्री) किरण ही सूर्याच्या स्वप्नात आली.किरण ही जुन्या चक्कीच्या ठिकाणाकडे येत होती.(प्रेमात असताना दोघेही तिथे एकमेकांना भेटायचे वा दृरवरून बघायचे) स्वप्नात तिथे तिचे घर बांधले होते.सूर्या त्याच रस्त्यावरून तिचे कडे टक लावून बघत होता.ती सूर्याच्या जवळुन मुकाट्याने मान खाली टाकून पुढे गेली.पण तिनं त्याच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही.------!!!
निष्कर्ष:- कदाचित आजही किरणचे मनात सूर्या प्रति प्रचंड राग भरलेला असावा.
       सूर्या हा सानियाच्या आईच्या अंत्यसंस्कारसाठी गावी आला होता.किरणचे घरही त्याच भागात असल्याने कदाचित ती नजरेत पडेल असं सूर्याला मनोमन वाटत होतं.त्याच हेतूने तो वारंवार तिचे घराकडे नजर फिरवीत होता.पण ती काही त्याच्या नजरेत पडली नाही.अजय आणि सूर्या यांची मात्र भेट झाली.बोलणे सुद्धा झालेत.तसेच सूर्याने सानियाच्या आईचे तेरवीला सुद्धा हजेरी लावली.पण तो तेरवीला वेळेत पोहचला नाही.त्यामुळे सानियाचे सासरकडील कुटुंब वगळता अधिकांश जणांच्या भेटी झाल्यात.म्हणून सूर्याचं काही समाधान झालं नव्हतं.म्हणून त्यानं गोड जेवणाच्या कार्यक्रमाला जायचं ठरवलं.पण पाऊसपाणी व इतर कारणामुळे त्याला काही जाता आलं नाही.म्हणून त्याच दिवशी म्हणजे दि ०१ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी दुपारच्या वेळेत तो निवांतपणे झोपी गेला असता किरण ही त्याच्या स्वप्नात आली.सानिया तसेच किरण व तिची आई घरात बसले होते.घर कुणाचे आहे ते कळले नाही पण त्या घरी किरण व तिची आई आणि सानिया त्या घरात बसल्या होत्या.सूर्या सुद्धा तिथे आला होता.सूर्या हा किरणचे आई सोबत मनमोकळ्या गप्पा करीत होता तर किरण ही काही अंतरावर पाटावर बसून (काळसर शेवाळी साडी परिधान) घरगुती कामे करीत होती.सूर्या व तिची आई चर्चेत रमले असताना किरण ही वारंवार सूर्यावर हलकीशी नजर फिरवीत स्मित हास्य करीत होती.सानिया मात्र पुर्णतः घाबरली होती.सूर्याने येथून लवकर जावे असच तिला काहीसं वाटत होतं.पण सानियाची इच्छा काही पूर्ण होत नव्हती.याउलट तो अधिक गप्पा-गोष्ठीत रमला.काही वेळाने किरण ही तिथून बाहेर यायला लागली.काळसर शेवाळी साडी परिधान केलेल्या किरणचं सौंदर्य हे कुठल्याही रूपवती पेक्षा किंचीतही कमी नव्हतं.तिचं असं रूप सूर्यानं पहिल्यादाच बघितलं.तिचं असं सौंदर्य बघून तो दंग झाला.सध्यास्थितीत तिचं असलं सौंदर्य कधीच नजरेत पडलं नाही.एकाएकी तिचं सौंदर्य कसं काय खुलंलं.(कमी वयातील तिच्या सौंदर्यप्रमाणे)असा विचार करीत असताना सूर्याला एकदम झोपेतून जाग आली आणि त्याला कळलं की हे प्रत्यक्षात नाही तर हे स्वप्नात आहे म्हणून------!!!
निष्कर्ष :- कदाचित तिचा काहीसा राग शांत झाला असावा.
      गुरुवार दि.१९ सप्टेंबर २०२४ ची रात्र.त्या रात्री सूर्या निवांतपणे झोपी गेला.ध्यानी मनी काहीच नसताना त्याच मध्यरात्री किरण ही त्याच्या स्वप्नात अवतरली.स्वप्नात सानियाकडे (माहेरचे गाव) काही तरी कार्यक्रम होता.त्यात सूर्या व किरण हे दोघेही सहभागी झाले होते.पण ते एकमेकांसोबत काही बोलले नाहीत वा बोलत नव्हते. ते केवळ एकमेकांची नजर चुकवून एकमेकांकडे बघत होते.सानियाकडे ते दोघेही एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर बसले होते.सूर्या हा दुचाकी वाहनावर तर किरण ही थोड्याच अंतरावर बसली होती.पण दोघातही अबोला कायम होता.लोकं आपापल्या सोयीने सानियाकडे येऊ लागलेत व परतू लागलेत.अशातच ज्यांना सूर्या-किरणचे प्रेमप्रकरण माहीत आहे असे कुणी लोक तेथे आल्यास सूर्या व किरण हमखास एकमेकांकडे बघत होते.त्याच दरम्यान अचानक समिरही तेथे अवतरला.त्याला बघताच ते दोघेही अवाक झाले अनं एकमेकाकडे एकटक आश्चर्याने बघू लागलेत.आपल्यात प्रेमप्रकरण होतं याची तिला आवर्जून जाणीव झाली असावी.तत्पूर्वी मात्र किरणने असं काही जाणवू दिलं नाही.काही वेळातच ती घरी जायला निघाली अनं त्याच वेळी सूर्याला झोपेतून जाग आली.अनं लक्षात आले की हे प्रत्यक्षात नव्हेतर स्वप्नात आहे.
निष्कर्ष :- किरणकडून आजही अबोला कायम आहे.
      किरणचं सूर्याच्या आयुष्यातून नकळत जाणं आणि  स्वमर्जीनं इतरासोबत लग्नाचा संकल्प सूर्याच्या चांगलाच जिव्हारी लागला.किरणच्या अशा आततायी वागण्यानं सूर्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.नव्हे ! त्याचं संपूर्ण आयुष्यच पणाला लागलं.त्याचं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातात राहिलं नव्हतं.विरह अनं तिच्या लग्नापासून तो पूर्णतः कोसळला/भरकटला. आपसूकच तो अपयशाच्या गर्तेत ढकलला गेला आहे याचीही त्याला जाणीव झाली नाही.तो यातून सावरणार की अधिक भरकटणार अशीच काहीशी स्थिती झाली होती.एवढं सर्व घडूनही तो किरणवर वेड्याप्रमाणे जीवापाड प्रेम करीत होता.प्रेम करीत आहे.नव्हे ! तो किरणच्या प्रेमात पूर्णतः वेडापिसा झाला आहे हे त्यावेळी सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नव्हती. किरणच लग्न झालं असलं तरी तिला न सांगता वा कसलीही माहिती होऊ न देता तिच्यावरती कायम प्रेम करू लागला असला तरी त्याच्या भविष्याचे काय? असा प्रश्न अनुत्तरीत होता.अशातच किरणचे लग्नानंतर साधारणतः चार-पाच वर्षांनी तिची वर्ग मैत्रीण सुप्रियाच्या लग्नप्रसंगी सूर्याकिरण या दोघांची भेट झाली.तिने तिचे विचार/मत  त्याच्याजवळ व्यक्त केले.तिने त्याची अप्रत्यक्षरित्या समजूत काढली.तदनंतर तो तिच्या शब्दाखातर हळूहळू विरहातून बाहेर पडायला लागला.त्याच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसायला लागली.तिलाच दृष्टी पटलावर ठेवून तो अपयशातून बाहेर पडून यशाच्या मार्गावर स्वार व्हायला लागला.किरण आता आपली होणार नाही वा भविष्यात कधी भेटणार सुद्धा नाही हे त्याला चांगलच ठाऊक आहे.तिच्या भविष्याच्या दृष्टीने आता तिला भेटायचं नाही वा तिच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. मात्र आयुष्यभर अपार प्रेम करीत राहायचं.तिला अनं तिच्या आठवणीला जिवापाड जपायचं असं ठरवून घेतलं.
         कालांतराने त्याच्या यशाच्या वाटा मोकळ्या झाल्यात.नोकरी मिळाली.लग्न झालं.संसारात रममाण झाला. किरणला विसरला नाही पण तिच्या विरहातून तिच्याच शब्दाला शिरोधार्य मानून अखेर बाहेर पडला.
      सूर्याचं सर्व काही सुरळीत सुरू होतं.स्वतःला त्रास होईल अशा जुन्या आठवणीला त्यानं कधीचाच पूर्णविराम दिला होता.(तिचे सोबत प्रत्यक्ष बोलण्याचा/प्रत्यक्ष भेटण्याचा मोह टाळायचा) तब्बल २९ वर्षानंतर त्याच्या बालमैत्रिणी विशेषतः पणती व सानिया या दोघी त्याच्या संपर्कात आल्यात. सानिया तर त्याच्या प्रेमाची खरी साक्षीदार आहे.त्यांच्या संपर्काने सूर्याच्या प्रेमाच्या आठवणी/जखमा पुनर्जीवीत झाल्यात.किरणच्या आठवणीला उजाळा मिळाला.तत्कालीन दिवस आठवायला लागलेत.त्यातच सूर्यांनं आपलं सर्व प्रेमप्रकरण पणती जवळ उघड केलं.सूर्याची प्रेमकहानी ऐकून पणतीही अचंबित  झाली.तिनं त्याला वेड्यापिशात  काढलं.इतक्या वर्षांनंतरही प्रेयसीला कसलीही माहिती होऊ न देता तिचं प्रेम जपतोय/पूर्वी प्रमाणेच प्रेम करतोय याबाबतीत तिला आश्चर्य वाटायला लागलं.अस असलं तरी तिनं सूर्याच्या भावना समजून घेतल्यात.त्याला धीर दिला.महत्प्रयासाने किरणच्या विरहातून बाहेर आलेल्या सूर्याच्या अनमोल आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात.सूर्या हा किरणवर पूर्वीप्रमाणेच प्रेम करतोय हे पणतीला कळून चुकलं.त्यामुळे आपसात येनकेनप्रकारे चर्चेच्या ओघात किरणचा विषय झाला नाही असं  फार कमी वेळा घडलं. परिणामतः जुना सूर्या अस्तित्वात आला.दिवसेंदिवस तो आता जुन्या आठवणीत रमायला लागला.पणती-सानिया सोबत चर्चा करताना किरणचा विषय निघाल्याशिवाय त्याचं काही समाधान होत नसे.त्यातच सानिया-पणतीनं एकदा तरी त्याची भेट घडवून आणायची असं वारंवार बोलून दाखविलं. म्हणून कधीही मनात इच्छा नसताना किरणला भेटण्यासाठी सूर्याच्या आशा-आकांक्षा पल्लवीत झाल्यात.किरणच्या विरहातून बाहेर पडलेल्या सूर्याला किमान एकदा तरी किरणला भेटावं,मनमोकळं बोलावं अनं मनसोक्त डोळेभरून बघावं असं त्याला वाटायला लागलं.सानिया पणतीच्या माध्यमातून हे सर्व काही प्रत्यक्षात घडणार होतं.पण अचानकपणे सानियानं सूर्याच्या आशा-आकांशा अनं भावनेला हुलकावणी दिली.नकळत तिनं किरणचा विषय बाजूला सारला.सानिया ही किरणसोबत भेट घडवून आणणार ही त्याची आशा पूर्णतः मावळली. परिणामतः सूर्या पूर्वीप्रमाणेच पुन्हा अंतर्मनातून कोसळला/खचला.हे कधीच कुणाला कळलं नाही.आणि त्यानंही आपलं असं मत कधी कुणाजवळ व्यक्त केलं नाही.पूर्वींप्रमाणेच मनातल्या मनात साठवून ठेवलं.त्याच्या आयुष्यात कुणीही आलं तरी असच घडणार असं त्याला वाटायला लागलं.हे सर्व मैत्रिणीमुळे घडलं असं सूर्याचा म्हणणं नाही पण त्यांनी आस दाखविली अनं अल्पावधीतच पाठ फिरविली.त्यांचं असं वागणं त्याच्या काळजाला लागलं असल तरी आपली मैत्री विस्कळीत होणार नाही याबाबतची खबरदारी घ्यायला लागला.म्हणून त्याला आता किरणच्या भेटीपेक्षा मैत्री/ बहीण-भावाचं नातं जपायचं आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी (किरणच्या भेटीसाठी) मैत्री आणि बहिण भावाचं नातं पणाला लावायचं नाही हे ही तितकच खरं आहे.
      सूर्या हा इतर बालमित्र-मैत्रिणी पेक्षा साकेत पणती आणि सानियाच्या अधिक संपर्कात आहे.साकेतला सूर्या किरणच्या बाबतीत किंचितही माहिती नाही.पणती-सानियाला सर्व काही माहिती आहे.त्यामुळे पणती-सानिया सोबत बोलताना किरणचा विषय आल्याशिवाय राहत नाही.किरणचा वारंवार विषय येणं सुर्याला विरहाच्या दिशेने नेण्यासारखं आहे.जुन्या जखमा ताज्या करण्यासारखं आहे.म्हणून किरणचा वारंवार विषय नको.आपलं पूर्वीप्रमाणेच प्रेम बरं ! कशाला मैत्रिणीच्या डोक्यावर भार द्यायचा/ताण द्यायचा म्हणून तो त्यांच्यापासून पूर्वीपेक्षा कमी संपर्कात राहायला लागला.त्याला त्याच्या सोबत संपर्क नको आहे असं नाही तर त्यालाही त्याच्यासोबत भरभरून बोलायचं असतं.पण त्याला जुन्या आठवणीत/विरहात रमायचं नाही.एकोणतीस वर्षांपूर्वी स्वतः परिस्थितीशी एकाकी झुंज देत तो त्यातून कसातरी बाहेर पडला.आता तेच दिवस पुन्हा स्वतःवर ओढवून घ्यायचे नाही.पुन्हा त्या वाटेने जायचं नाही.पूर्वीप्रमाणेच आयुष्यभर किरणवर अप्रत्यक्ष प्रेम करायचं.तिच्या आठवणीला जपायचं.तिची भेट घडवून आणण्याचं ओझ कुणाच्या खांद्यावर द्यायचं नाही तर सर्व काही परिस्थितीवर सोडून द्यायचं.काळाच्या ओघात कधी ना कधी भेट होईलच या आशेवर पुढील आयुष्य काढायचं.असच त्यानं काहीसं ठरवून घेतलं आहे.


Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...