किरण कडून प्राप्त पहिलं प्रेमपत्र पुढील प्रमाणे आहे Date 17-2-94 *अखंड प्रिती ज्योत* ---------------------------------------- प्रिय मित्र कुमार यांना माझा नमस्कार वि वि चिठ्ठी लिहिण्याचे कारण की मी बरेच दिवसापासून तुम्हाला चिठ्ठीचे उत्तर दिले नाही परंतु आता देणार आहे तुमची चिट्ठी मला मिळाली वाचून फार आनंद झाला तुम्ही म्हटलं होते की त्याच्यासोबत आहे ती सर्व गोष्ट सर्व खोटी आहे मी त्याच्यासोबत बोलत सुद्धा नाही तुमच्या सोबत सोबत खरं प्रेम करत आहे आपली ही गोष्ट चौघाशिवाय कोणाला माहित नसावी मास्तरला ही गोष्ट कोणी सांगितली हे तुम्ही मला स्पष्ट का सांगत नाही.तुम्ही मला अगोदर सांगितलं होतं काय की मी तुझ्यासोबत प्रेम करणार म्हणून तुम्ही चिठ्ठी मध्ये लिहिले होते की मी गोंधळात पडलो म्हणून तुम्ही कशाच्या गोंधळामध्ये पडले हे मला स्पष्टपणे सांगणे बरं का मी तुम्हाला चिठ्ठीचे उत्तर दिले नाहीत तुम्हाला माझा किती राग आला तुम्ही माझ्यासोबत पंधरा दिवस बोलले नव्हते आणि तुम्ही चिठ्ठीनुसार तर वागले पण नाही की तू मला दिसली नाही तर करमत नाही खरोखरच तुम्ही पोटामधून म्हणत होते की होट...