किरण कडून प्राप्त पहिलं प्रेमपत्र पुढील प्रमाणे आहे
Date 17-2-94
*अखंड प्रिती ज्योत*
----------------------------------------
प्रिय मित्र कुमार यांना माझा नमस्कार वि वि चिठ्ठी लिहिण्याचे कारण की मी बरेच दिवसापासून तुम्हाला चिठ्ठीचे उत्तर दिले नाही परंतु आता देणार आहे तुमची चिट्ठी मला मिळाली वाचून फार आनंद झाला तुम्ही म्हटलं होते की त्याच्यासोबत आहे ती सर्व गोष्ट सर्व खोटी आहे मी त्याच्यासोबत बोलत सुद्धा नाही तुमच्या सोबत सोबत खरं प्रेम करत आहे आपली ही गोष्ट चौघाशिवाय कोणाला माहित नसावी मास्तरला ही गोष्ट कोणी सांगितली हे तुम्ही मला स्पष्ट का सांगत नाही.तुम्ही मला अगोदर सांगितलं होतं काय की मी तुझ्यासोबत प्रेम करणार म्हणून तुम्ही चिठ्ठी मध्ये लिहिले होते की मी गोंधळात पडलो म्हणून तुम्ही कशाच्या गोंधळामध्ये पडले हे मला स्पष्टपणे सांगणे बरं का मी तुम्हाला चिठ्ठीचे उत्तर दिले नाहीत तुम्हाला माझा किती राग आला तुम्ही माझ्यासोबत पंधरा दिवस बोलले नव्हते आणि तुम्ही चिठ्ठीनुसार तर वागले पण नाही की तू मला दिसली नाही तर करमत नाही खरोखरच तुम्ही पोटामधून म्हणत होते की होटामधूनच म्हणत होते बरं तुम्ही मला सोमवारी काय होईल ते बघजो तर तुम्ही मला कशावरून असं म्हटलं म्हणजे तुम्ही मला त्या दिवशी किती उद्धटपणाने बोलले हे मला तर इतक वाईट वाटलं होतं की बस.बरं तुम्ही मला म्हणत होते की बस बरं तुम्ही मला म्हणत होते कि माझं तुझ्यावर प्रेम करण्याची पहिलीच वेळ आहे असं तुम्ही मला सांगितलं परंतु मला वाटतं की ही तुमची पहिलीच वेळ आहे म्हणून परंतु माझी आहे पहिलीच वेळ वेळ प्रेम करण्याची म्हणून तर मी तुम्हाला लवकर चिट्टीचे उत्तर दिले नाही कारण मला समजतच नव्हतं कि कशी चिठ्ठी लिहायची म्हणून. परंतु हे मला सगळं तुमच्यावरून समजलं की अशी चिठ्ठी लिहायची म्हणून कारण याचा मला अनुभवच नव्हता मला असं वाटत नव्हत कि माझ्यावर अशी चिठ्ठी लिहायची वेळ येईल म्हणून परंतु काय जाणे ती वेळ माझ्यावर येऊनच ठेपली.बरे असो चिठ्ठी लिहायची कशी काय कशी हे मला मुळीच समजत नव्हतं तुम्ही किनई मला कोणासोबत बोलताना दिसले कि मला वाटते तुम्ही असे सगळ्याच जवळ सांगता काय कि हि माझ्या सोबत आहे म्हणून मला चिठ्ठी लिहिण्याची भितीच वाटायची परंतू मला माझ्या मैत्रिणीने साथ दिली कि काहीच होत नाही असे तीने मला म्हटले म्हणून मी तुम्हाला चिठ्ठी देण्याकरिता लिहायला बसली नाहीतर तुम्ही मला कितीही म्हटलं असतं परंतु मि तुम्हाला लिहू शकली नसती मला वाटलं कि आता जर लिहिली नाही तर नक्कीच आपल्या सोबत बोलणार नाही बरं मि तुम्हाला चिठ्ठीचे उत्तर दिले नाही तर तुम्ही कोणताही शाक पकडला असेल परंतु मला समजतच नव्हतं बर आता जर चिठ्ठीचे उत्तर द्यायला वेळ झालाना तर असं रागावयाच नाही बरं का उत्तर द्यायला वेळ होतच असते इतकं रागावल्याने नसते होत कारण मुलीच्या जातीला पुष्कळ काम असतात परंतु तुम्हाला असते आमच्याइतकेच काम तुम्हाला असते काय बरं ही चिठ्ठी लिहितो खरी परंतु कोणाला दाखववायची नाही तर तुम्ही ही चिठ्ठी सगळ्याना दाखवली तर माझी गावामध्ये बदनामी होईल हे तर तुम्हाला समजते म्हणा परंतु नाही कोणत्या वेळेस लक्ष राहत म्हणून मि तुम्हाला सांगतो आहे बरे असो चूक भूल झाली असेल तर क्षमा करणे कारण माझी पहिलीच वेळ आहे चुका तर पुष्कळ आहे तरी पण राग मानू नये.
तुझीच फक्त
किरण
याच चिठ्ठीच्या उभ्या-आडव्या बाजूला पुढील मजकूर होता.
१)तुम्ही मला चिठ्ठीमध्ये पाठविले की कशाचं बर्डन असेल म्हणून उत्तर देत नाही परंतु मला कशाचच बर्डन नाही तुम्ही गावाला गेले होते म्हणून मि तुम्हाला चिठ्ठी देऊ शकली नाही
कारण ही चिठ्ठी माझ्याजवळ नसते तर ही चिठ्ठी राहते म्हणजे समजून जा कि कोणापाशी राहते म्हणून
२) तुम्ही मला तिच्यासमोर म्हणत होते की उत्तर नाही दिल म्हणून तुम्हाला तर माहित आहे कि आजकालच्या मुली लवकरच करंट पकडतात म्हणून तुम्ही एवढे शिकून राहले परंतु तुम्हाला अक्कल कमी आहे.कशी कमी तर तुम्ही तिच्या समोर चिठ्ठी दिली म्हणून राग नको यायला हं तुम्ही मला इतकी कारागिरीची चिठ्ठी लिहिली तशी मला लिहिता येत नाही मि एकातच खिचडी केली
३)तुम्ही मला परवाच्या दिवशी चिठ्ठी दिली परंतु ती अशी दिली मैत्रीण समोर तर मला म्हणत होती की तुला काय दिले मला दाखव मी तिला म्हटले कि काहीच नाही तर सगळ्यापाशी सांगितले तर मला खुबच वाईट वाटलं बर आता तुम्हाला द्यायची असेल ना तर एकटीला पाहून द्यायची आता अशी चूक करायची नाही हं.
४)शून्यातून शून्य गेले राहिले शून्य असे मला मित्र मिळाले हेच माझे पुण्य.चिठ्ठीचे उत्तर लवकरात लवकर देणे बरे असो मी तुम्हाला म्हटले होते की तुम्हाला लाळू खायला बोलावते म्हणून त्याच दिवशी चिठ्ठी घ्यायला बोलावले तर तुम्हाला काही समजलंच नाही
५) शिरोमणी शिरोमणी आठवण येते क्षणोक्षणी जसे गंगेचे निर्मळ पाणी तशी तुमची गोडवाणी पंख नाही दिले देवांनी तरी समाचार कळवितो चिठ्ठिनी
याच चिठ्ठी सोबत पुढील चिठ्ठी पण होती
सुनील बा माझ्या घरासमोरून इतक्या चकरा मारते की बस आणि त्यांच्यासोबत दोन मुलं सुद्धा राहतात पण ते सुद्धा माझ्याच क्लासमधले मला असं वाटते की सुनीलने त्याच्यापाशी असं नाही सांगितले पाहिजे की हि ------सोबत आहे म्हणून मला याची खूपच भीती वाटते मूल म्हणजे इतके कुचिन राहतात की बस बरं तुम्ही सुनीलला सांगजा कि अशी तिच्या विषयी आणि माझ्या विषयी अशी गोष्ट कोणासमोर करायची नाही म्हणून असं त्याला स्पष्टपणे बजावून सांगायचं असं लिहिलं म्हणून रागवायचं नाही कारण मला तर खूपच भीती वाटते कारण कोणाला जर असं माहित झालं कि कोणीही म्हणायचं की पहायला तर खूपच गरीब वाटतंय आणि अशी आहे म्हणून मी याच्यामध्ये लिहीत आहे तुम्ही मला तिच्यासमोर चिठ्ठी दिली ना तर ती काय मला म्हणाली कि चिट्ठी कशाची आहे तर दाखव मी तिला म्हटले की हि चिठ्ठी दाखवायची नाही तर ती मला म्हणाली की मला माहिती हायना कि कशाची आहे म्हणून मग मी तिला म्हटले कशाची आहे म्हणून तुला माझं काय माहिती आहे
तर ती माझ्यासोबत मग बोललीच नाहीं म्हणून तर मी दोन वाजता आली मला किनई तुम्ही चिठ्ठी द्यायची असेल ना तर कोणासमोर द्यायची नाही कारण तिच्यावरूनच समजून घ्याना तुम्हाला काही माहीत नाही ती कशी आहे म्हणून तर ती मला माहिती आहे कशी आहे म्हणून तर इतकी ती बदमाश आहे कि बस बातच इथली तिथं आणि तिथली इथं चुगल्या सांगते पण तुम्हाला वाटत असेल की हिची पेटन मैत्रीण आहे म्हणून पण काही नाही कसेतरी दिवस काढा लागते तर अशी चूक तुम्ही कधीच करू नका मला असं समजलं की तुमची तब्येत एकदमच खराब झाली म्हणून तर तुम्ही माझी इतकी काहीच काळजी घेतली नाही करायची नाही तर तुम्हाला असं वाटत असेल कि मि हिला तिन चिठ्ठ्या दिल्या पण उत्तर दिले नाही याचा तर तुम्ही शाक पकडला असेल तर असा शाक नाही पकडायचा काहीच काळजी करायची नाही मी तुम्हाला कधीच विसरणार नाही तुम्हाला वाटत असेल कि मला विसरेल म्हणून परंतु मी तुम्हाला कधीच विसरणार नाही बरे असो माझं मन होतं की तुमच्या भेटीला याव बा म्हणून परंतु मला असं वाटलं की यांच्या पुऱ्यातल्या मुली मुल म्हणेल की ही कशाला नेहमी नेहमी येते म्हणून मी तुमच्या भेटीला आलीच नाही तर यात शंका वाटून घेऊ नये बरे असो मला तुमची इतकी आठवण कि बस तुम्ही जर मला एक दिवस दिसले नाही की मला करमतच नाही मला तुम्ही दोन दिवस दिसले नाही तर मला करमलच नाही मग मला असं समजलं की तब्येत बरोबर नाही म्हणून मला तर इतकं वाईट वाटलं की बस मला असं समजलं तर मी त्या दिवशी जेवण सुद्धा केले नाही बर दवाखान्यामध्ये जाणे चांगली तब्येतीची सोय करा कारण आता परीक्षा जवळ आली आहे चांगल्या डॉक्टराकडे जायचे आणि चांगली तपासणी करून चांगलं औषध घ्यायचं तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही बरं माझ्या म्हणण्यानुसार वागायचं बरं का बरे असो तुम्ही मला जशी पहिली चिठ्ठी दिली होती तशीच द्यायची अशी कधीच करू नये मी तुमच्या चिठ्ठीचे उत्तर लिहितो परंतु मला तुम्ही एकटे दिसता परंतु माझ्यासोबत त्या राहतात ना म्हणून मी तुम्हाला म्हटले की तुम्हाला लाळू खायला बोलावते म्हणून तर ते मी चिट्ठी घेण्याकरिता असे म्हटले बरे असो चिट्ठी जवळ ठेवायची नाही आणि कोणाला दाखवायची नाही तर जाळून टाकायची
# तुमचीच फक्त
किरण
----------------------------------------
Comments
Post a Comment