Skip to main content

रुग्णाची परवड

रुग्णांची परवड--डॉक्टरांची कमतरता --आरोग्य यंत्रणा विस्कळीत---!!!
     
     गोरगरिबांच्या हक्काचे असलेल्या तिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा डॉक्टर अभावी रुग्णाची चांगलीकय परवड  होत असल्याचे चित्र येथील रुग्णालयात आहे विशेष म्हणजे संपूर्ण रुग्णालयाचा भार हा एकाच डॉक्टरवर असल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळीत होत असल्याचे नाकारता येत नाही
     सध्या पावसाचे दिवस आहे पावसाळ्यात पावसाळ्यात बदलत्या वातावरणाने विविध आजारांची लागण ही नैसर्गिक आहे त्या अनुषंगाने तालुक्यामध्ये ताप खोकला सर्दी  मलेरिया टायफॉईड असे विविध आजाराने थैमान घातले आहे असे  गोरगरीब रुग्ण औषधोपचारासाठी तिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयकडे धाव घेतात त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांमध्ये दिवसागणिक रुग्णांची संख्याही वाढतीच आहे विशेष म्हणजे बाह्यरुग्ण विभागात दररोज १५० ते २०० रुग्ण आरोग्य तपासणी आणि  औषधोपचारासाठी येतात मात्र रुग्णालयात पुरेशा डॉक्टरांअभावी रुग्णाचे चांगलीच परवड होत असल्याचे चित्र आहे त्याचं बरोबर बाह्य रुग्णासाठी निश्चित केलेल्या वेळेत सर्व रुग्णांची तपासणी होईलच असे नाही त्यामुळे अनेक रुग्णांना दुपारच्या ओपीडी ची पाहावी लागते किंवा दुसऱ्या दिवशी उपचारासाठी यावे लागते तर काही रुग्णांना नाईलाजाने खाजगी दवाखान्यात उपचारासाठी धाव घ्यावी लागते
       तिवसा तालुक्यात कुऱ्हा मार्डी तळेगाव ठाकूर सह अन्य काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा आहे असे असले तरी ग्रामीण रुग्णालयाशी ८४ गावे संलग्नित आहे तसेच तिवसा हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असून वाहतुकीच्या  वाढत्या वर्दळीने छोटे-मोठे अपघात नित्याचे आहे असे रुग्ण तातडीच्या उपचारांसाठी याच रुग्णालयात तसेच परिसरतील इमर्जन्सी पेशंट सुद्धा उपचारासाठी येथेच धाव घेतात मात्र येथील संपूर्ण आरोग्य यंत्रणेचाभार हा एकाच डॉक्टरवर त्यातही त्यांच्यावर  अतिरिक्त अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार असल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळीत होते त्याचा फटका हा रुग्णांना बसत असल्याचे कोणीच नाकारणार नाही म्हणून ग्रामीण रुग्ण आणि आकस्मिक रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा विस्कळित होणार नाही यासाठी रिक्त असलेले चार डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षक  ही पदे तातडीने भरावी तसेच आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी अशी मागणी रुग्ण व नागरिकांकडून होत आहे

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...