Skip to main content

घरकुलासाठी पायपीट

घरकूलासाठी पायपीट
दिव्याअंग कुटुंबप्रमुखाची आर्त हाक------
मदतीसाठी जिल्हा परिषद सदस्य यांचा पुढाकार
------------------
     कुणी घर देता का घर अशी आर्त हाक दोन्ही डोळ्यांनी अपंग असलेल्या विनायक नवरंगे या व्यक्तींनी केली आहे.दरम्यान जि प सदस्य अभिजित बोके यांनी नवरंगे यांच्या घराची स्थिती लक्षात घेऊन घर बांधणी साठी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे
     तिवसा तालुक्यातील करजगाव येथील विनायक नवरंगे पत्नी दुर्गा मुलगी चैताली मुलगा मयूर यासह पडक्या फुडक्या घरा मध्ये वास्तव्यात आहे विनायक अपंग असल्याने कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी पत्नी दुर्गावर आहे. दुर्गा मोलमजुरीचे कामे करून कुटुंबाचा गाडा कसातरी पुढे रेटत आहे.अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या कुटुंबा चा  उदरनिर्वाह करणे कठीण आहे तेथे घराची उभारणी कशी करावी असा प्रश्न दुर्गांनी केला आहे.
      दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरबांधणीसाठी पूर्वी इंदिरा आवास योजना आणि आता प्रधानमत्री आवास योजना अस्तित्वात आहे  या योजनेअंतर्गत घरकुल मिळेल अशी अपेक्षा या कुटुंबांना होती मात्र जाचक अटीमुळे सदर कुटुंब घरकुल पासून वंचित आहे सदर योजनेअंतर्गत अपंग व्यक्तीच्या कुटुंबांना ३ प्रतिशत घरकुलांचे वाटप करणे बंधनकारक असताना सुद्धा हे कुटुंबाना अद्यापही घरकुल प्राप्त झाले नाही. 2002 च्या दारिद्र्य रेषेच्या तआधारावर घरकुलासाठी प्रतिक्षा यादी संपुष्टात येऊन २०११ च्या सामाजिक आर्थिक जातीच्या आधारावरील घरकुलाचे वाटप केल्या जाते. 2011चे  सर्वेक्षणानुसार घरकुल वाटपासाठी अ ब क ड अशी यादी तयार करण्यात आली आहे. विनायक चे कुटुंब ड यादीत समाविष्ट असल्याने सध्यातरी निकषाप्रमाणे या कुटुंबाना घरकुल देणे शक्य नसल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि संबंधित विभागाचे कर्मचारी/अधिकारी वर्गाकडून सांगितले जाते.सर्वांसाठी घर या  शासनाचे धोरणानुसार आम्हाला हक्काचे घर कधी मिळणार असा  प्रश्न विनायक नवरंगे यांनी केला आहे.
     दरम्यान विनायक च्या कुटुंबाला घराची अत्यंत आवश्यकता लक्षात घेऊन अमरावती जिल्हा परिषदेचे सदस्य  अभिजित दादा बोके यांनी नवरंगे यांच्या कुटुंबाला भेट देऊन व्यथा जाणून घेतली. शासनाच्या निकषानुसार सद्या घरकुल देणे शक्य नसले तरी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा काही निधी तसेच युवक काँग्रेस कडून निधी गोळा करून  घर बांधण्यासाठी  साहाय्य करणार असल्याचे तसेच  शासनाकडून घरकुल मिळवून देण्यासाठी/ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोके यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...