३०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाच्या बुंध्यात सापडल्या मूर्ती
प्राचीन हनुमान व राम,लक्ष्मण,सीताच्या मूर्ती दिसल्या
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील भांबोरा गावात हनुमानजीच्या मंदिरा लगत असलेल्या ३००वर्षे जुन्या वडाच्या झाडाच्या बुधांत प्राचीन हनुमानाची मूर्त व राम,लक्ष्मण,सीता यांच्या एकत्र मृरत्या आढळून आल्या ही घटना आज शनिवारी दुपारी घडली त्यामुळे गावातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी करत प्राचीन मूर्त्याच्या दर्शनासाठी मोठा प्रमाणात गर्दी केली होती तर नागरिकांनी सामूहिक भोजनादार व किर्तनही केले याची चर्चा तालुकाभर रंगली
तालुक्यातील १००० लोकवस्तीच्या भांबोरा या गावात प्राचीन काळापासून हनुमानाचे मंदिर असून या ठिकाणी महाकाय३००वर्ष जुने वडाचे महाकाय वृक्ष होते मात्र हे वृक्ष वाळत असल्याने या ठिकाणी या मंदिराचा गावातील लोकांनी सामूहिक वर्गणी करून जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भल्या मोठ्या वडाचे वृक्ष तोडण्याचे काम सुरू होते गेल्या महिन्याभरापासून मुळासगट हे महाकाय वृक्ष तोडण्याचे काम सुरू असतांना या झाडाच्या मुळात बुंध्यात दोन मुरत्या दिसल्या त्यामुळे या महाकाय वृक्षात कशा काय मूर्त असेल ही कल्पना नागरिकांनी केली नव्हती या प्राचीन मुरत्या असल्याने मूरत्या निरखून पाहल्या तर या दोन्ही मूर्त्या हनुमानजी व राम लक्ष्मण व सीताच्या होत्या झाडाच्या मुळात मूर्त्या सापडल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली पाहता पाहता ही वार्ता परिसरातील गावात पोहचली त्यामुळे या मूर्त्या पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली व मूर्त्याचे विधीवत पूजा करत मूर्त्या लगतच्या हनुमान मंदिरात नेल्या व मूर्तीला सेंदूर लावण्यात आले नागरिकांनी या मूरत्याचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या ठिकाणी नागरिकांनी पुन्हा सामूहिक वर्गणी गोळा करत गावात सामूहिक भोजनदान दिले व गावातील महिलांनी कीर्तन केले झाडात मूर्त्या सापडल्याची चर्चा तालुक्यात पसरली होती
कोट
गावात नव्याने मंदिर बांधण्यासाठी जुने महाकाय वडाचे झाड तोडण्याचे काम सुरू होते या झाडाच्या खाली मुळात दोन प्राचीन मूर्त दिसल्या त्यामुळे नागरिकांनी गर्दी केली नागरिकांची मोठ्या प्रमाणात यावेळी श्रद्धा दिसून आली
-- भालचंद्र पोल्हाड, पोलीस पाटील, भांबोरा
Comments
Post a Comment