Skip to main content

राष्ट्रसंत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा म्हणून गावागावातून जात आहेत निवेदने
************************
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा म्हणून तिवसा येथील सेवारत फाऊंडेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंचच्या युवकांनी वरखेड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरू परमहंस आडकोजी महाराज यांचे पुण्यतिथी महोत्सवप्रसंगी संकल्प केला.
या दोन्ही संघटनेच्या युवकांनी नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी थांबवून निवेदनही दिले.तसेच गावागावातून ग्रामसभेचे ठराव घेणे सुरू केलेले आहे.तसेच लोकांच्या सह्यांची निवेदने पाठविणेही सुरू केले.आहे.मुंबईला जावून त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा असा आवाज बुलंद केला.वरोरा,चिमूर, अड्याळ टेकडी, गुरुकुंज आश्रम इथेही त्यांनी भेटी देवून चर्चा केली यामध्ये विकास बोरवार,अमर वानखेडे व इतर अनेक युवकांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील सर्व व इतर राज्यातील  खासदारांना व आमदारांना लेखी निवेदने हे युवक पाठविणार आहेत.
    याप्रमाणेच नागपूर येथील कीर्तनकार, सप्तखंजिरीवादक संजयभाऊ बेले हेही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा म्हणून कार्यरत आहे.त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंञी नितीनजी गडकरी,महाराष्ट्र राज्याचे उर्जामंञी चंद्रशेखर बावनकुळे,कृषीमंञी डाॅ.अनिल बोंडे यांना निवेदने दिलेली आहे.ही मागणी त्वरित पूर्ण न केल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केलेला अाहे.तसेच फुबगाव जि.यवतमाळ येथील कीर्तनकार व प्रचारक ह.भ.प.रमेश कचेरीत महाराज हेही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा म्हणून कार्यरत आहे नुकतेच त्यांनी मंञी संजयभाऊ राठोड यांची भेट घेवून निवेदन दिले.या मागणीच्या अनुषंगाने ते आमदार ,खासदारांच्या भेटी घेवून चर्चा करित आहे.अमरावती जिल्ह्यातील युवकांनी खासदार नवनीत राणा यांची भेट घेवून निवेदन सादर केले.त्यांनी पुढील लोकसभा अधिवेशनप्रसंगी ही मागणी संसदेत मांडण्याचे आश्वासन दिलेले आहे.प्रा.बंडोपंत बोढेकर यांनी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच काॅलेजच्या विद्यार्थ्यांसमोर आयोजित व्याख्यानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा म्हणून प्रचार केला.
   चिमूर येथील राजेंद्र मोहितकर गुरूजी गेल्या १६ वर्षांपासून सन २००३ पासून पञव्यवहार व पाठपुरावा घेत आहे.अनेक सामाजिक संघटना व संस्था यांची निवेदने, ग्राम पंचायत, ग्रामसभा यांची निवेदने त्यांच्या पुढाकाराने गेलेली आहे.
कीर्तनकार मोहनदास चोरे,भाऊसाहेब थुटे, सतिश देशमुख, विद्यापीठ नामकरण चळवळीचे सरचिटणीस रमेशचंद्र सरोदे,सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज, रामपाल महाराज, इंजिनियर पवन दवंडे व इतर अनेक प्रचारक कीर्तनकार ही मागणी पूर्ण होण्याचेदृष्टीने कार्यरत अाहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...