Skip to main content

गाडगे बाबा यांचा

काटे वेचुनी फुले देणारे
गाडगे बाबांचा वारसा जपतात
----------------
   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्षात कृतीत उतरवून वारसा जपणारे दोन भूमिपुत्र अविरत कार्य करीत आहे त्यांचे कार्य समाजाला  देणारे असले तरी उपेक्षितच राहिले आहे
वाढोना(लोकसंख्या 1400) गावातील त्र्यंबकराव गुलाबराव गायकवाड (वय 52 )18 वर्षापासून दररोज  स्वयंस्फूर्तीने गावाची साफसफाई करतात गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक असलेले त्रिंबकराव दररोज साडेपाच ते साडेसात वाजता नियमितपणे गावाची साफसफाई करतात त्यांचा हा उपक्रम तब्बल 18 वर्षापासून अविरत सुरू आहे दररोज ग्राम स्वच्छता नाली सफाई सांडपाणी व्यवस्था ते स्वतः अंगमेहनतीने व समाजातुन विनामूल्य करतात अल्पभूधारक असलेले त्रिंबकराव यांच्याकडील दोन एकर शेतीपैकी अर्धा एकर शेतामध्ये फुलबाग फुलविली आहे त्यातून मिळणारी फुले गावातील मंदिर तसेच ज्यांच्याकडे सुख दुःख चेकार्यक्रम असतात त्यांच्याकडे स्वतः जाऊन विनामूल्य ते देतात तसेच श्रावण महिन्यात घरोघरी स्वतः जाऊन 11 बेलपत्रे बांधून पूर्ण गावाला बेलाची पाने आणि फुले देतात तसेच 2002 मध्ये शेंदुर्जना ते वाढोणा या रहदारीच्या रस्त्यावर स्वखर्चातून 50 ट्रॉली मुरूम टाकला त्यामुळे लोकांना येण्या-जाण्यासाठी हा  रस्ता सोयीस्कर झाला याशिवाय मशानभुमी ची स्वतः सफाई करून वृक्ष लागवडी सारखा उपक्रम राबविला आहे
अशाच प्रकारचा संत  गाडगेबाबा विचाराचा  कार्याचा वारसा व्यवसायाने शिक्षक असलेले डॉक्टर संदीप मनोहरराव राऊत हेसुद्धा चालवीत आहे गाडगे बाबा च्या विचारातील समाज अस्तित्वात यावा आणि समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी स्वतः डॉक्टर संदीप राऊत स्वखर्चाने दरवर्षी 51 शाळा मध्ये आपल्या टीमसह जाऊन प्रबोधन मालिका राबवितात त्यांनी हा उपक्रम 2013 पासून प्रारंभ केला असून आतापर्यंत तिवसा मोर्शी वरुड चांदूर बाजार अचलपूर अंजनगाव सूर्जी दर्यापूर  तालुक्यातील प्रत्येकी 51 शाळा याप्रमाणे 271 शाळांमध्ये हा उपक्रम राबविला आहे गाडगेबाबांनी स्वच्छता व कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील स्वच्छता करण्याचे कार्य 51 वर्षे असे कार्य केलेआहे तेच व्रत घेऊन स्वतः स्व. बबनराव मेटकर यांच्या प्रेरणेतून प्रबोधन मालिका अविरत पणे चालविणणार असल्याचे डॉक्टर राऊत यांनी सकाळ शी बोलताना सांगितले आहे
   प्रसिद्धीपासून दूर आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता स्वखर्चातून निःस्वार्थ पणेअविरत कार्य करणाऱ्या या दोन्ही भूमिपुत्राच्या कार्य समाजासाठी एक आदर्श ठरत आहे-
*नरेश शं. इंगळे*

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...