*भीम--गीते*
*भीमाची जीवनकथा*
(चाल-आगे आगे चले हम)
सांगतो मी ऐका तुम्ही,भिमाची जीवन कथा
बालपणापासूनी, भीम माझा दुःखी होता !!धृ!!
अठराशे एक्क्यांनव, एप्रिल चौदा तारखेला
उदरी भिमाईच्या, भिम जन्मास आला
आनंददुनिया गेले रामजी पिता !!१!!
शाळेच्या दारात,भीम अभ्यास करी
कुणाला ना आली दया,भिमाची थोडीतरी
शिक्षणात भिमाचा, पहिला नंबर होता !!२!!
बडोद्याला गेले जेव्हा,भीम करण्या नोकरी
दुरून फेके, चपराशी ते फाईल टेबलावरी
ऑफिसात मोठा तिथे, अधिकारी भीम होता !!३!!
भीम आले घरी,दुःख झाले रमा उरी
का आले परतूनी, सांगा ना हो साहेब खरी
मिटविणे आहे रमा,मला ही जातीयता !!४!!
उच्च शिक्षण घेण्या, भिम गेले परदेशी
दिवस भर कष्ट करून,राही रमा उपवाशी
बोले रमा साहेबाला, करू नका माझी चिंता !!५!!
महाडच्या चवदार तळी,
भीमाने केली गर्जना
म्हणें पाणी पेईल मी,भिणार नाही कुणा
लाठी आणि दगडाचा,वार झेलीत होता !!६!!
चौदा ऑक्टोबर दिनी,त्या छप्पन साली
हिंदू धर्म त्यागूनिया,बुध्दाची
दीक्षा दिली
नमविला भिमाने, बुद्धाचे चरणी माथा !!७!!
सहा डिसेंबरला,काळ धाऊन आला
सात कोटी दलितांचा, पाठीराखा नेला
लिहिली नरेश गाथा भाग्यवंत अश्रू ढाळीता !!८!!
-रचना-
*प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे*
मु.भांबोरा ता. तिवसा जि. अमरावती.
मोबा.९९७०९९१४६४
--------------------------------------------
*भीम शक्ती दाखवारे*
(आये हो मेरी जिंदगी मे-राजा हिंदुस्थानी)
भीमाच्या लेकरांनो,आता तरी जागे व्हारे
कुत्र्यापरी का जगता,भीमशक्ती दाखवारे!!धृ!!
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व दिले मुलतत्व
कळेना भारतीय,नागरिकास महत्व
अंतकरणी भीम तत्वाला आता रुजवारे !!१!!
अन्याय अत्याचारी, जुलमी ती राजवट
केला भिमाने, तिचा क्षणात नायनाट
भिमाचे वीर रक्त अंगात साठवारे !!२!!
लागूनी पाठी आहे जातीयवादी भूत
बाबाच्या प्रतिमेचा,अपमान आहे होत
जगावे सिंहापरी तो संदेश आठवारे !!३!!
लिहिली भीमाने घटना जागुनी दिन-रात
लावील कुणी का बोट,छाटून टाकु हात
घटनेची रक्षा करण्या सारे समोर व्हारे !!४!!
निद्रेत नका राहु काटेरी आहे वाट वैऱ्याना दाखवारे तुमची ती एकजूट
नरेश भाऊ भावाचे वैर मिटवारे !!५!!
--रचना--
*प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे*
मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.
मोबा.९९७०९९१४६४
----------------------------------------
*भीम तत्त्वाची भाषा*
(चाल- दोन दिवसाची होती मी माहेरला)
भाषा करती पहा भिमाच्या तत्त्वाची
स्तुती करती तोंडभरूनी वैऱ्याची !!धृ!!
गल्लोगल्ली झाले हे सारे लीडर
भीम लेकराची नाही हो यांना कदर
समाज सोडून संगत धरी परक्यांची !!१!!
आज विसरले आहे ते समाजाला
उद्या विसरती आपुल्या आई बापाला
नाही मोल यांना स्वतःच्या अब्रूची !!२!!
भाऊ भावाचे वैरी ते झाले इथे
बंधुभावाचे विसरले पहा नाते
स्वार्थापायी ना पर्वा, यांना कुणाची !!३!!
अशा स्वार्थी पुढाऱ्यांना, शिकू धडा
नरेश घेऊनी हाती तो झेंडा निळा
जान ठेवुनी भिमाच्या उपकाराची !!४!!
--रचना--
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*
मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.
मोबा.९९७०९९१४६४
----------------------------------------
*जयभीम*
(चाल--परदेशी परदेशी जाना नही--राजा हिंदुस्तानी)
जयभीम जयभीम घ्यावा तुम्ही
मनापासूनी घ्या, मनापासूनी
जयभीम घेण्याला लाजता कशाला
भीती ही कुणाची आज नाही तुम्हाला!!धृ!!
दीन दुबळ्याचे होते भीम कैवारी
कर्तव्याची जाण असू द्या अंतरी
माणुसकीची वाट दाविली भीमाने
जगावे जीवन आता तरी मानाने
हा स्वाभिमान तुम्हा मिळवूनी दिला !!२!!
भीम बाबा ते सांगून गेले तुम्हा खरी
ताठ मानेने जीवन जगारे सिंहापरी
इज्जत आपली गमवू नका,स्वार्थासाठी
कुत्र्यावणी जाऊ नका,कुणापाठी
विसरू नका रे,भीम संदेशाला !!२!!
कार्य असे हे केले भीमाने मोलाचे
लिहिले संविधान भारत देशाचे
भारत भूमीवरती आहे त्याचे ऋण
करुनी दिली हक्काची आपल्या जाण
नरेश त्या हक्काने भाग्यवंत झाला !!३!!
--रचना--
*प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे*
मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.
मोबा.९९७०९९१४६४
----------------------------------------------------
सदर भीम गीते ही विद्यार्थी दशेत (१९९४ ते १९९८) लिहीलेली आहे त्यासाठी कविवर्य भाग्यवंत मेश्राम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
*प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे*
मोबा.९९७०९९१४६४
Comments
Post a Comment