*पासवानजी तुमचा निर्णय खरंच योग्य आहे काय?*
-----------------–---------------------
*नरेशकुमार शं.इंगळे*
*मु.भांबोरा,ता.तिवसा, जि.अमरावती*
----------------------------------------
विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार अस्तित्वात आले होते त्यात दलित सेनेचे सर्वेसर्वा रामविलास पासवानजी कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते.विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने दलितांना अनुकूल ठरेल असेच धाडसी निर्णय घेतले होते. याचा अर्थ असा नव्हे की,त्यांनी इतर समाजाला दुर्लक्षित केले होते.पण आजपर्यंतच्या सरकारपेक्षा सत्तेची लालसा न बाळगता त्यांनी खंबीरपणे निर्णय घेतले.यात प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार, मंडल आयोगाची शिफारस आदीचा समावेश करता येईल.व्हीपीच्या दलित अनुकूल भूमिकेमुळे जातियवाद्याचे विशेषता भाजपवालयांचे धाबे दणाणले.पर्यायाने भाजपाच्या भूमिकेमुळे व्हीपी सरकार ला पायउतार व्हावे लागले.व्ही पी.पायउतार झाले असले तरी दलित जनतेच्या मनात मात्र कायमचे सत्तारूढ झाले.याच मंत्रिमंडळात रामविलासजी कॅबिनेट दर्जाचे मंत्री असून व्हीपीच्या निर्णयात सिंहाचा वाटा असावा हे सत्य कुणीही नाकारणार नाही.म्हणूनच व्हीपीच्या पाठोपाठ पासवानजीचे दलित जनतेचे सर्वेसर्वा,दलितांचा तारणार,दलितांचे खरे नेते म्हणून दलित जनता पासवानजी कडे पाहू लागली होती.व्हीपीची प्रकृती आणि राजकारणात शिरलेले अनेक दोष यामुळे व्ही.पी.जींनी राजकीय संन्यास घेतला असला तरी दलित जनतेची पोटतिडकीने बाजू मांडणारा प्रभावी नेता म्हणून पासवानजी च्या रूपात मात्र कायम होता.याचाच अर्थ दलिता विषयी आत्मीयता उराशी बाळगून पोटतिडकीने दलितांचा आवाज उठून जातीयवादी यांचे मुस्कटदाबी करण्यास पासवानजी समर्थ होते.पासवानजीच्या भूमिकेने दलितांचे खरे नेते पासवानजी वाटत होते.जणू रिपाईचे नेतृत्व स्वीकारून फुटीरवृत्तीच्या दलित नेत्यांना धडा शिकवून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यास पासवानजी समर्थ आहे.असे कधीकधी माझ्या वैयक्तिक रित्या स्वतःच्या मनाला वाटत होते.कदाचित स्वताच्या मनाला वाटत होते.कदाचित दलित जनता ही त्यांच्या कडून हिच अपेक्षा ठेवत असावी!
जनता दलाला फुटीरतेचा रोग हा स्थापनेपासूनच लागलेला आहे.पक्षाने चार पंतप्रधान भारताला दिले असले तरी या पक्षाचे अनेक तुकडे पडलेले दिसत आहे.नुकताच जदचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव आणि भावी पंतप्रधान हळदन हळळी दोडेगौडा देवेगौडा असे सरळ दोन गट पडलेले दिसत आहे. पूर्वाश्रमीचे जद नेते जॉर्ज फर्नांडिस (समता पार्टी) आणि रामकृष्णजी हेगडे(लोकशक्ती) यांच्या पक्षाचे जदत विलीनीकरण करण्यात आले.विलीनीकरण हे जदच्या जमेची बाजू होती.पण जदच्या तत्त्वांची पायमल्ली करण्याची भूमिका काही नेते घेत आहे.याचाच अर्थ जातियवाद्यांना(संघपरिवार) समर्थन देनारा शरद यादव यांच्या नेतृत्वाखाली गट ज्यात पासवानजीचा सुद्धा समावेश आहे आणि दुसरा पुरोगामी विचारसरणीचा देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील गट असे दोन गट पडलेले दिसत असून जद पुन्हा फुटीरतेकडे वाटचाल करीत आहे. अशा द्विधास्थितीत पासवानजी पुरोगामी विचारसरणीचे समर्थन करतील अशी अपेक्षा होती.पण पासवानजीनी चक्क संघ परिवाराचे मुक्तकंठाने समर्थन करून संघपरिवाराच्या पंक्तीत खुलेआम जाऊन बसत आहे. पासवानजीच्या भूमिकेवर विश्वास बसत नव्हता पण ती खरी वस्तुस्थिती आहे.कदाचित दलित प्रेमाऐवजी संघाविषयी अधिक आत्मीयता वाटावी हे नवलच! गुरुप्रेम वेगळे!
काही दिवसापूर्वी दूरदर्शन केंद्रावर एका ज्येष्ठ पत्रकाराने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गुलाब नबी आजाद,भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद महाजन,जनता दलाचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांची मुलाखत घेतली होती.तारीख व पत्रकाराचे नाव निश्चितपणे आठवत नाही पण मुलाखत प्रसारित झाली होती. मुलाखतीच्या वेळी हे तिन्ही ज्येष्ठ नेते आपली भूमिका प्रभावीपणे मांडत होते.जेव्हा जातीयवादाबाबत प्रश्न असे तेव्हा मात्र पासवानजी आपली बाजू अतिशय प्रभावी व पोटतिडकीने मांडून भाजपा हा दलित विरोधी पक्ष कसा आहे हे प्रमोदजीच्या लक्षात पर्यायाने जनतेच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करीत असे.आजपर्यंत पासवानजीची भूमिका याच प्रकारची होती.पण सध्यास्थितीत पासवानजी सारखा प्रभावी नेता दलितविरोधी भाजपाच्या भूमिकेची कुरघोडी करित होता आणि जातीयवादाची त्यांची धोरणें लक्षात आणून देण्याची सिंहगर्जना करीत होता. तेच पासवानजी संघ परिवाराचे निसंकोचपणे समर्थन करीत आहे.या भूमिकेला काय म्हणावे याचेच दलित जनतेला नवल वाटणे सहाजिकच आहे.ज्या भाजपवाल्यांनी मंडल आयोगाला विरोध केला,दलित विरोधी भूमिका घेत आहे,याशिवाय व्ही पी.सींग सारख्या लोकनेत्याला केवळ दलित समर्थक नेता असल्यामुळे त्यांना पायउतार होण्यास भाग पाडले.त्याच भाजपवाल्यांचे पासवानजी मुक्तकंठाने समर्थन करीत आहे याचे मात्र आश्चर्य वाटत आहे.
कोणत्याही हितापेक्षा देश हिताला कमी लेखता येत नाही. आज कारगिल,बटालिक,द्रास, क्षेत्रात भारत-पाक दरम्यान अप्रत्यक्ष युद्ध चालू होते.त्यादृष्टीने भारतीय जवान शहीद होत आहे. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय जनता निपक्षपातीपणे एक दिलाने भारत सरकार अर्थात अटलजीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.काही राजकीय कावळे राजकारण करीत आहे हा भाग वेगळा याचा अर्थ देश हितापेक्षा इतर प्रकारचे हीत गौण स्वरूपाचे आहे हे कुणीही नाकारणार नाही. मागील वर्षीच लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या होत्या. पण राजकीय पक्षाच्या सत्ता हव्यासापोटी देशावर मध्यावधी निवडणुका लादल्या गेल्या.जद विभाजनामुळे व विलीनीकरणामुळे शरद यादव गट व देवेगौडा गट असे दोन परस्पर विरोधी दोन गट अस्तित्वात आलीत.यादवांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचा प्रत्यक्ष संकेत दिला असला तरी भाजपानी अजून तरी हिरवी झेंडी दाखविली नाही. पासवानजी व त्यांच्या गटानी आज केलेला विचार अविश्वास ठरावा पूर्वीच केला असता तर करोडो रुपये खर्चाची मध्यावधी निवडणूका भारतीय जनतेवर कदाचित लागल्या गेल्या नसत्या. शरद यादव गटासोबत पासवान जी आज जी भूमिका प्रभावीपणे घेत आहे की,अटलजींचे हात बळकट करून त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा मानस व्यक्त केला आहे.ही भूमिका अगोदर घ्यायला हवी होती कारण अवघ्या एका मताने अटलजी चा पराभव झाला होता.तो तुमच्या स्वतःच्या एका मताने अटलजींचे सरकार कोसळले नसते.आणि अगणित खर्चाची निवडणूक टाळल्या गेली असती.याउलट तुम्ही अटलजी ना जोरदार विरोध करून अटलजींना पायउतार करण्यास महत्त्वाची भूमिका वठवली होती.प्रश्न असा निर्माण होतो की पासवानजीना एकाएकी अटलजी विषयी अर्थात संघ परिवाराविषयी सहानुभूती का?अटलजींना भावी पंतप्रधानाचे उमेदवार पुढे करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आणि त्याचे हात बळकट करण्याचा पासवानजी व इतर नेत्यांनी जो निर्धार व्यक्त केला आहे तोच निर्धार अविश्वास ठरावापूर्वी व्यक्त केला असता तर.....
माननीय रामविलास पासवानजी विषयी वैयक्तिकरित्या मनस्वी अतिशय आदर आहे. त्यांचा राजकीय अनुभव आणि बुद्धिमत्तेवर सुद्धा विश्वास आहे. त्यांनी घेतलेले निर्णय योग्य की अयोग्य याचा निष्कर्ष लावणे माझ्यासारख्याना तरी कठीण आहे.पण माझे मत अल्पशा बुद्धीने व्यक्त करीत आहे.पासवानजी संघ परिवाराला मदत करून दलितांची बाजू कशाप्रकारची मांडून दलिताचे हीच साध्य करण्याचा प्रयत्न करणार आणि आपला घेतलेला निर्णय खरोखरच योग्यच आहे असे कसे पटवून देणार आहे याच प्रतीक्षेत!
----------------------------------------
*नरेशकुमार शं.इंगळे*
*मु.भांबोरा,ता.तिवसा,जि. अमरावती*.
----------------------------------------
*दै.विदर्भ मतदार,दि.६ ऑगस्ट,१९९९ ला प्रकाशित*
----------------------------------------
तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे- शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे. शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...
Comments
Post a Comment