Skip to main content

काँग्रेस आणि आघाडी सरकार

*काँग्रेस आणि आघाडी सरकार*
----------------------------------------
*नरेशकुमार इंगळे*
----------------------------------------
        नुकताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले नाही.याचाच अर्थ असा की जनतेनी कोणत्याही एका पक्षाला पूर्णपणे पाठिंबा दर्शविला नाही.सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी उदयास आली असून मतांची टक्केवारी पाहता त्यांनासुद्धा काँग्रेसपेक्षा मतांची टक्केवारी कमी आहे.तरीपण भारतीय संविधानाच्या संकेतानुसार सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला सरकार बनविण्यास पाचारण केले पण बहुमत सिद्ध न झाल्यामुळे अवघ्या १३ दिवसाचे सरकार पायउतार झाले.
       भाजप सरकार बरखास्त झाल्यानंतर राष्ट्रपतींनी संयुक्त आघाडीचे प्रमुख नेते हळदन हळळी दोडे गोडा देवेगौडा यांना सरकार बनविण्यास पाचारण केले आणि आपले बहुमत सिद्ध केले असून काँग्रेस पक्षाने बिनाशर्त पाठिंबा जाहीर केला. संयुक्त सरकार जरी सत्तारूढ झाले तरी ते किती काळ टिकू शकेल याचा भरवसा नाही.पण काँग्रेसने पूर्णपणे पाच वर्षे पाठिंबा ठेवला तर निश्चितच हे सरकार टिकू शकते यात मुळीच शंका नाही.आज पर्यंत संयुक्त सरकार अस्तित्वात आले असे नाही.या अगोदर सुद्धा संयुक्त आघाडी सरकार अस्तित्वात आले होते पण राजकीय नीतीमुळे संबंधित सरकार टिकू शकले नाही.१९७७ मध्ये मोरारजी देसाई चे जनता सरकार अस्तित्वात आले त्यात बाबू जगजीवनराम सारखे काँग्रेसवाले नेते सुद्धा होते. परंतु आपसी मतभेदांमुळे हो अवघ्या ३८महिन्यातच सत्ताभ्रष्ट झाले.पुन्हा चार महिन्याकरिता चरण सिंग-चव्हाण युतीचे सरकार अस्तित्वात आले परंतु ते सुद्धा फार काळ टिकू शकले नाही.असाच प्रयोग १९८९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने विश्वनाथ प्रताप सिंगचे जनता दलाचे सरकार अस्तित्वात आले पण नेमके त्याच कालावधीत रामजन्मभूमी-बाबरी मज्जिद या वादाने भाजप आणि जनता दलात मतभेद निर्माण झाल्यामुळे भाजपने आपला पाठिंबा काढून घेऊन वि.पी सिंग सरकार ला पायउतार केले.त्याचवेळेस जनता दलातून बंडखोरी करून चंद्रशेखर, देवीलाल हे काँग्रेसच्या पाठिंब्याने पुन्हा सत्तारूढ झाले.त्यावेळेस भारतीय राजकीय व्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली असून निवडणूका घेतल्याशिवाय राष्ट्रपती समोर पर्याय नव्हता.जेव्हा राजकीय व्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली होती तेव्हा सामान्य जनतेचा असा समज झाला होता की काँग्रेस सत्तालोलुप आहे.सत्तेला चिकटून राहणे हा त्यांचा गुणधर्म आहे.सत्तेबाहेर राहणे काँग्रेसी नेत्यांना मुळीच आवडत नाही. काँग्रेस नेते पाडापाडीचे राजकारण खेळण्यात मशगुल आहे असा सर्वसामान्य जनतेचा समज होता तो कितपत सत्य होता तो काँग्रेसच्या नेत्यांना परिपूर्ण माहीत सुद्धा असेलच.तरीपण सहानुभूतीच्या लाटेत (काही प्रमाणात)काँग्रेस पक्षाला घवघवीत यश न मिळता कसेतरी सरकार अस्तित्वात येऊन पाच वर्षे आपली कारकीर्द पूर्ण केली पण काँग्रेसविषयी जनतेच्या मनात असंतोष खदखदत होता.खुमखुमी होतीच आणि निवडणुकीच्या माध्यमातून तो प्रकट होऊन काँग्रेसला सत्तेबाहेरच ठेवले.यातून काँग्रेसने धडा घ्यावा.जातीयवादी सरकार अस्तित्वात येऊ नये म्हणून तेरा धर्मनिरपेक्षवादी घटक पक्ष एकत्रित येऊन आघाडी तयार केली आणि काँग्रेसने सुद्धा आपसी मतभेद मिटवून जातीयवादी पक्षाचा पाडाव करण्यासाठी आघाडी सरकार ला विनाशर्त बाहेरून पाठिंबा देऊन धर्मनिरपेक्षवादी सरकार अस्तित्वात आणले.यात काँग्रेसने पाडापाडीचे राजकारण खेळू नये हीच अपेक्षा.देवेगौडा सरकार जरी अस्तित्वात असले तरी आघाडी सरकारचे मुख्य चाबी काँग्रेसजवळच आहे.हे सरकार किती काळ टिकू शकेल याविषयी जनतेच्या मनात दुवीधा निर्माण झाली असून काँग्रेस आपली जबाबदारी कशा प्रकारे पार पडते याकडे लक्षावधी जनतेचे लक्ष वेधले आहे.कारण भारतीय जनतेला माहित आहे की हे सरकार ७५ टक्के काँग्रेस वरच अवलंबून आहे.काँग्रेस जेव्हा आपला पाठिंबा काढून घेईल तेव्हाच राष्ट्रीय सरकार आदळल्याशिवाय राहणार नाही.
यात संयुक्त आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा यशस्वीरित्या आपली कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न करावा.नंतर पुन्हा निवडणुका घेतल्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.यात काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यास जनता संपूर्णरित्या काँग्रेसला जबाबदार धरून जनतेच्या न्यायालयात या पक्षाला वठणीवर धरल्याशिवाय राहणार नाही याची जाण ठेवावी. कारण भारतासारख्या विकसनशील देशाला पुन्हा पुन्हा (पाठोपाठ) निवडणुका घेणे परवडण्यासारखे नाही.कारण मागील निवडणुकांचा खर्च लक्षात घेता जवळपास ४५० ते ४७५ कोटी खर्च (वैयक्तिक उमेदवाराचा खर्च वेगळा) खर्च असून पुन्हा तेवढा खर्च भारतीय अर्थव्यवस्थेला निरुपयोगी होईल. पर्यायाने देशात चलन फुगवटा, बेरोजगारी,दारिद्र्य,महागाई वाढेल याचा अर्थ असा की देशात आर्थिक अराजकता निर्माण होईल आणि जनता सुद्धा या प्रसंगाला दाद देणार नाही.अशा परिस्थितीत जनतेच्या पर्यायाने देशाच्या हिताकडे लक्ष देऊन संयुक्त सरकार मधील घटक पक्षांनी वादविवाद घडवून न आणता एकजुटीने आपला कारभार यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करावा.काँग्रेस पक्षाने सुद्धा आपली देशहिताच्या दृष्टीने,सत्तेच्या आहारी न जाता संयुक्त सरकारात क्षुल्लक प्रश्नावरून वादंग माजवता परिपूर्ण मदत करावी जेणेकरून भारतीय जनतेच्या मनात काँग्रेस पक्षाविषयी सहानुभूती निर्माण होईल.यदाकदाचित काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला तर भारतीय जनता या पक्षाला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही.याकडे काँग्रेसने लक्ष द्यावे. आणि पुन्हा निवडणुका झाल्यास काँग्रेस पक्षाचा याहीपेक्षा दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही.याचे भान ठेवून काँग्रेस पक्षाने आपली राजकीय नीती कायम ठेवून संयुक्त सरकार टिकवून ठेवणे यातच महानता माणावी पर्यायाने काँग्रेसची प्रतिमा उंचावेल काँग्रेस विषयी जनतेच्या मनात पुन्हा उत्साह संचारेल यात मुळीच शंका नाही. ईश्वर काँग्रेसच्या नेत्याला पाडापाडीच्या राजकारणातून मुक्ती देऊन सहकार्याची भावना प्रदान करो हीच ईश्वर प्रार्थना. चला आता पाहूया काँग्रेस देवेगौडा सरकारला कितपत सहकार्य करते ते.याच प्रतिक्षेत आम्ही भारतीय जनता........
----------------------------------------
*नरेशकुमार इंगळे*
----------------------------------------
*दैनिक विदर्भ मतदार, दिनांक-२६ जून १९९६*
   (प्रकाशित)

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...