*दगाबाज, भ्रष्टाचारी,संधीसाधू आणि जातीयवादी पक्षांना पुन्हा सत्तेत आणणार का?*
----------------------------------------
*नरेशकुमार शं.इंगळे*
*मु.भांबोरा,ता.तिवसा,*
*जि.अमरावती*
----------------------------------------
१३ व्या लोकसभेच्या निवडणुका सोबतच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही संपन्न होत असून प्रत्येक राजकीय पक्ष जनतेचा आपल्याकडे कौल मिळविण्याकरिता आटापिटा करीत आहे.पर्यायाने प्रत्येक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागत आहे.कोणताही पक्ष कींचितही मागे नाही.जणु त्यांची सत्ता काबीज करण्यासाठी चढाओढच नव्हे तर प्रखर संघर्ष सुद्धा करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे;नव्हे जनतेचे पंचनामे घोषित केले आहे.आश्वासनाची तर बरसातच करीत आहे.जसजशी निवडणूक तारीख जवळ जवळ येत आहेत तसतशी त्यांची झोप उडत आहे. पर्यायाने कड़क उन्हापेक्षाही राजकीय मैदान तापत आहे.पण अशा अस्थिर स्थितीत जनतेत निराशवृत्ती तितक्याच प्रबळतेने दिसत आहे.कोणत्या पक्षाची निवड करावी याबाबत जनता दुविधेतच आहे.कारण कोणताही राजकीय पक्ष वचनपूर्ततेस वचनबद्ध नाही.पण घटनेने दिलेला अधिकार बजाविने हे ही कर्तव्यच आहे.त्याच पार्श्वभूमीवर नाइलाजास्तव कोणत्या तरी राजकीय पक्षांना मत देणे तितकेच महत्त्वाचे आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मधील गटबाजी आणि जनतेचा काँग्रेस पक्षावर असलेला रोष आणि सत्ता बदलाची गरज म्हणून जनतेने भाजप-सेना युतीला सत्तारूढ केले.सत्तारूढ पक्षाकडून जनतेला मोठ्या आशा-आकांक्षा होत्या.त्या असणेही सहाजिकच आहे.कारण १९९४ च्या सत्ता बदलानंतरही जनतेच्या अपेक्षाभंग झालाय. जनतेला विकासाची गंगा आणि सर्वसामान्य जनतेचे हित आम्हीच जोपासले असून ५० वर्षाच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्षाने जे काम केले नाही ते काम आम्ही अवघ्या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत करून दाखविले. असा कांगावा संपूर्ण महाराष्ट्रात पिटत आहे.पण या शासनाने सर्वसामान्य जनता आणि मध्यमवर्गीय तथा सुशिक्षित वर्गाच्या पाठीत खंजीर खुपसले असे म्हटल्यास नवल नाही.ज्या पक्षांनी विश्वासघात केला त्या पक्षास विश्वासघात करण्याची पुन्हा संधी देणार का? यावर चिकित्सक बुद्धीने चिंतन आणि विचार करणे आवश्यक आहे.
सत्तारूढ झाल्यानंतरही आश्वासनाची बरसात चालू ठेवत आश्वासनाची पूर्तता करण्यास मात्र चतुराई दाखवली नाही.शासनाचा ढोंगीपणा आणि इतर प्रश्नावर लक्ष केंद्रित केले असता आपल्या सहज लक्षात येते.सुशिक्षित, बेरोजगारांना रोजगार संधी देण्याचा प्रश्न मात्र शेवटपर्यंत रेंगाळत राहिला.सुशिक्षित बेरोजगारांची पिळवणूक होण्यास सरकार कोठेही मागे दिसत नाही.२७ लाख बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ या आश्वासनावर बेरोजगारात नवचैतन्य आणि उत्साह संचारून या नेत्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून सरकार सत्तारूढ करण्यास याच वर्गाचा सिंहाचा वाटा आहे.पण अल्पावधीतच युती शासनाचा ढोंगीपणा लक्षात आला.उदाहरणार्थ शरद पवारांच्या कारकिर्दीत बीपीएड प्रश्न निकालात निघाला होता.पण युती शासनाने त्यांच्या कार्यकाळात या बेरोजगारांच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष न देता हा जीआरच गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केला.तेव्हा आपल्या रास्त मागण्या पूर्ण करण्यास नागपूर अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढला.मात्र याच हुकूमशाही सरकारने विधायक मार्ग न पत्करता सुशिक्षित बेरोजगारावर लाठीचार्ज केला तर काहींना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले.ऐन निवडणुकीच्या समोर सुशिक्षित बेरोजगारांची सहानुभूती मिळविण्यासाठी शिव उद्योगाचे पुन्हा थोतांड मांडून आपल्या ढोंगीपणाचे प्रदर्शन दाखवित सुटले आहे.बेरोजगारांची जणु ही थट्टाच.
सुशिक्षित बेरोजगार वर्गासोबतच शेतकरी आणि मध्यमवर्गाचा सुद्धा विश्वासघात केला.दुर्दैवाने याच सरकारच्या कारकिर्दीत निसर्गराजा शेतकऱ्यांवर कोपला.पर्यायाने नापिकीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.युती शासनाने पुरेशी मदत देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे महान कार्य या सरकारने केले.याच सरकारने केले आहे. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी बी-बियाणे वाटप करण्यात आले.पण त्यांच्या पुढील वर्षात मात्र शेतमालाला योग्य भाव न देता बियाण्याच्या किंमतीत मात्र अवाढव्य वाढ करण्यात आली.आर्थिक संकटात सापडलेला आणि कर्जबाजारी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.पण शासनाची पुरेशी मदत मिळाली नाही. ज्यांना मिळाली त्यांनाच मिळाली. एक प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक आणि शोषण करण्यास कसल्याच प्रकारची कसर सोडली नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती पूर्ण ठरणार नाही.याशिवाय शेतकऱ्यांना वीजेचा पुरवठा मोफत करण्यात येईल असे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत काहीच पोहोचले नाही.याउलट शेतकऱ्यांचे वीज प्रवाह विजेचे बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याचे अनेक उदाहरण पहावयास मिळते.एन्रॉन प्रकल्पाबाबाबतही सत्तेत आल्यानंतर एन्रॉन प्रकल्प समुद्रात बुडविल्या जाईल असे आश्वासन देऊन याच युती शासनाने सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्प डोक्यावर घेऊन नाचविला.वेगळ्या विदर्भबाबत युतीत मात्र गंभीर मतभेद होते.पण ज्या भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले ते भाजप नेते मात्र सत्तेसाठी गप्प बसले.झुणका भाकर केंद्राचेहीं त्यांनी तीन तेरा वाजविले आणि तसे होणे ही सहाजिकच होते.शहराच्या ठिकाणी स्थापन झालेल्या या केंद्राचे सर्वसामान्य बहुतांश गरीब जनतेला याचा फायदा कसा होणार.पण एवढे मात्र खरे की या माध्यमाने आपल्या कार्यकर्त्यांची बाजू मात्र बळकट केली.सर्व सामान्य जनतेपेक्षा ह्यांना त्यांचे कार्यकर्त्याचे हित जोपासणे महत्त्वाचे वाटत होते.केवढी ही विसंगती.पण आर्थिक बोजा मात्र महाराष्ट्राच्या तिजोरीवर.
भारतीय संस्कृती उदात्त असून महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रख्यात आहे.याच मातीत संत गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे संत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,डॉक्टर भाऊसाहेब देशमुख,महात्मा फुले.छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज यासारखे रत्न याच भूमीत जन्मलेले असून महाराष्ट्रच्या गौरवगाथेला जगाच्या इतिहासात फार मोठे स्थान दिले पण ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भर महाराष्ट्रात गुंडगिरीचे, दहशतीचे वातावरण तयार केले. तोडफोडी,खंडणी आदी प्रकार राजरोसपणे पहावयास मिळते. गौरवशाली महाराष्ट्राचे आणि संस्कृतीचे धडे सांगणारे हेच नेते जॅक्सन सारख्या हिजड्यांना विदेशातून महाराष्ट्राच्या भूमीवर नाचण्यासाठी बोलावून त्याच्या नावावर फार मोठी संपत्ती गोळा करण्यास मागेपुढे पहिले नाही.
चारित्र्यहनन करण्याचा तर जणू यांनी ठेकाच घेतल्यासारखे वाटते.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीना तर अत्यंत खालच्या दर्जाचे बोलण्यास मागेपुढे पाहिले नाही.हे मागील निवडणूक प्रचारावरून सहज लक्षात येते. रिपाईचे नेते बाळासाहेब आंबेडकरावरही शिंतोडे फेकण्याचा ह्याच मंडळातील शिवसेना नेत्यांनी केली होती.शिवसेना नेत्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला कंटाळून विद्यमान राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्यामुळे त्याचा वचपा म्हणून त्यांचेही अनेक जाहीर सभेत चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.इतकेच नव्हे तर अगदी लहान मुलांच्या खेळात जसे नावे बोटे ठेवल्या जाते त्याचप्रमाणे अगदी बालिशपणे त्यांनी भुजबळांना लखोबा हे विशेषण दिले आहे.काही दिवसांपूर्वीच अमरावतीच्या जाहीर सभेत सोनिया गांधींची अमेरिकेच्या मोनिका लेविंस्कीशी तुलना केली. महाजन सारख्या बुद्धिमान नेत्यांनी अशी तुलना करणे योग्य आहे का?जणू त्यांनी विरोधकाचे चारित्र्य हनन करण्याचा जणुं ठेकाच घेतला की काय असे वाटणे स्वाभाविक आहे.
धर्मनिरपेक्षतेबाबतही यांचे धोरण तकलाटूच आहे.मुळात या पक्षाची विचारधारा धर्मनिरपेक्षतावादी नव्हे तर कट्टर पंथीच आहे.हा तर केवळ त्यांचा ढोंगीपणा आहे.मुळातच यांच्या नसानसात जातीयवादी प्रवृत्ती आढळून येते कारण या पक्षाच्या कारकिर्दीत आणि त्यांच्याच आशीर्वादाने दलित,अल्पसंख्यांक मुस्लिम,ख्रिश्चनावर उघड हल्ले केल्या जाते हे कशाचे द्योतक आहे? मुंबईतील घाटकोपर येथील दलितावर कोणतीही पूर्वसूचना न देता केलेला बेछूट गोळीबार करून ११ दलित निरपराध व्यक्तीची हत्या केली. ख्रिश्चनावरील हल्ला प्रकरणाच्या संदर्भात ग्रॅहम स्टेवर्ट आणि त्याच्या मुलांना जिवंत जाळण्याचे धाडस यांच्याच पिलावळीने केले. बाबरी मज्जिद उध्वस्त करण्याचे कट-कारस्थान यावरून यांची धर्मनिरपेक्षवादी वृत्तीचे थोतांड लक्षात येते.अशा घातक कारवायांमुळे जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्यास कारणीभूत कोण?
भारताचे परराष्ट्रीय धोरण शांतताप्रियतेचे आहे.जागतिक तसेच अंतर्गतरित्यासुद्धा शांततेचा पुरस्कार भारताने सदैव केला.याच भूमीतील बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला.त्यांचा धम्मच शांतताप्रियतेचा पुरस्कार करणारा आहे.जगाला शांतीचा संदेश देणार्या भगवान गौतम बुद्धाच्या जन्मदिनी म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर सोमवार दिनांक ११ मे १९९८ रोजी अनुस्फोट करून बुद्धाच्या तत्वाला जबरदस्त धक्का दिला. याचवेळी दुसरीकडे मात्र बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भारताचे जागृक आणि सतर्क पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बुद्धाच्या शांतीचा संदेश जोपासना करण्याचे आव्हान करित होते.हे तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
इंदिरा काँग्रेसच्या राजवटीत १९९२ मध्ये मुंबई या आर्थिक राजधानीत बॉम्बस्फोट घडवून आणल्या गेला.यांच्या चौकशी आयोगाने म्हणजेच श्रीकृष्ण आयोगाने शिवसेनाप्रमुखावर ठपका ठेवण्यात आला.पण याच युती शासनाने त्यांच्यावरही कसल्याही प्रकारची कारवाई न करता त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर पडदा टाकून हुकूमशाही प्रवृत्तीचा परिचय करून दिला.फार मोठ्या वित्तहानी आणि जीवितहानी पेक्षा शिवसेनाप्रमुख त्यांना मोठे वाटले. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर या सरकारातील आमदार,मंत्री आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांपर्यंत भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. त्यांच्यावर कारवाई न करता भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणार्या निस्वार्थी समाजसेवक अण्णा हजारे यांना तुरुंगाची हवा खावी लागली.यावरून त्यांचे सांगायचे वेगळे आणि करायचे वेगळे या स्वरूपाचे तकलाटू आणि संधीसाधू धोरण सहज लक्षात येते.वरील तकलाटू, दगाबाज,भ्रष्टाचारी,संधीसाधू आणि जातीयवादी प्रवृत्तीच्या राजकीय पक्षांना पुन्हा निवडून देणार का?मागील निवडणुकीत केलेली केलेली चूक पुन्हा करणार का?आदीबाबत बुद्धिजीवी, सामाजिक वर्गांनी यावर विचार करणे आवश्यक आहे.
----------------------------------------
*नरेशकुमार शं.इंगळे*
*मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती*
----------------------------------------
*दैनिक विदर्भ मतदार*
*दि.३ सप्टेंबर १९९९*
*(प्रकाशित)*
---------------------------------------------
तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे- शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे. शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...
Comments
Post a Comment