Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

संपादक मंडळ

" भीमपर्व " डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक 2020 चे संपादक मंडळ जाहीर -  मुख्य संपादक-  समाजभुषण मा.राजूजी नन्नावरे .   प्रकाशक - सौ.सुरेखा राजूजी नन्नावरे .  मंडळ - ---------------------------    - प्रा.संगीता थूल    - प्रा.डॉ. बी.टी.अंभोरे.   - प्रा.डॉ. नरेश इंगळे.   - प्रा.विश्वजीत अंबादे .   - प्रा.डॉ. सुखदेव उंदरे.   -  प्रा.हरीचंन्द्र गजभिये.  वरील मान्यवरांची निवड आज दि.१८ /०३/२०२०  रोजी " भीमपर्व विशेषांक २०२० " अंक १८ , करीता  स़ंपादक मंडळा मधे  करण्यात आली आहे .  करीता सर्व मान्यवरांचे मनपुर्वक अभिनंदण.🌹🌹🌹🙏🙏🙏

मलाला युसूफजई

*स्त्रियांच्या अधिकारासाठी लढणारी निर्भीड वीरांगना :-मलाला युसूफजई* ----------------------------------------  *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *मु.भांबोरा,ता.तिवसा* *जि.अमरावती.* *भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४* ----------------------------------------         मलाला हे नाव आता जगासाठी अपरिचित राहिले नाही.शौर्य,साहस,धैर्य,प्रबळ इच्छाशक्ती आणि स्वकर्तृत्वाने संपूर्ण जगासाठी ती आदर्श अन प्रेरणास्त्रोत ठरली आहे.एक शालेय विद्यार्थिनी जिने तालिबान्यांच्या विरोधात आणि स्त्रियांच्या अधिकारासाठी/शिक्षणासाठी तसेच शांततेसाठी रणशिंग फुंकले.तालिबान्यांनी घातलेल्या मुलीच्या शिक्षणावरील बंदी विरोधात आवाज उठविला.परिणामाची तिला जाणीव नव्हती असे नाही.पण मलालाने हे आवाहन धाडसाने स्वीकारले.तिचा हा आवाज कायमचा बंद करण्यासाठी प्रतिक्रियाही उमटल्या.त्यांच्या कार्यात अडसर ठरत असलेल्या मलालावर शस्त्रधारी तालिबाण्याकडून जिवघेणा हल्ला अर्थात बेछुट गोळीबारही करण्यात आला होता.अशाही स्थितीत ती डगमगली नाही.मृत्यूवर मात करून तितक्याच ताकदीने पुन्हा खंबीरपणे उभी राहिली.तिच्या या लढाऊ बाण...

भारतीय जलनीतीचे जनक:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

*भारतीय जलनितीचे जनक!* *:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *मु.भांबोरा ता.तिवसा* *जि.अमरावती* *मोबा.९९७०९९१४६४* *इमेल* *nareshingale83@gmail.com* ----------------------------------------           डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक महान द्रष्टे नेते व युगपुरुष होते.समाजातील उपेक्षित,शोषित,पीडित आणि वंचित बहुजन समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढले.प्रस्थापितांशी निकराने सनदशीर मार्गाने अविरत संघर्ष केला.भारतीय समाज रचनेला एक वेगळा आयाम दिला.त्यांना एकाच वेळी परिस्थितीशी संघर्ष आणि वेगवेगळ्या आघाड्यांवर लढा द्यावा लागला आणि यशस्वी लढा सुद्धा दिला आहे.डॉ.आंबेडकरांचे विचार/कार्य व व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत.जलविषयक धोरण विविध धोरणांपैकी एक आहे.         भारत हा एक विकसनशील व कृषिप्रधान देश आहे.अधिकांश भारतीय लोक कृषीक्षेत्रावर अवलंबून आहे.कृषीक्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.म्हणूनच कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय पर्याय...

स्त्रियांचे कौटुंबिक हिंसाचाराचे अर्थशास्त्रीय विश्लेषण

*स्त्रियांच्या कौटुंबिक हिंसाचाराचे अर्थशास्त्रीय विश्लेषण* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *अर्थशास्त्र विभाग प्रमुख* *श्रीसंत शंकर महाराज कला महाविद्यालय,पिंपळखुटा* *ता.धामणगाव रेल्वे* *जिल्हा अमरावती* ----------------------------------------        भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती पैकी एक आहे.भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीयाला मानाचे व गौरवाचे स्थान दिले आहे."यत्र नार्यस्तु पूजते, रमते तंत्र देयता" अर्थात जिथे स्त्रीचा मान-सन्मान केला जातो तिथे देवता वास करते.असे स्त्रीच्या गौरवाबाबतीत आपल्याकडे सुभाषित आहे. प्रत्यक्षात मात्र विषमतावादी समाजरचनेत तिला दुय्यमच दर्जा दिला जातो.पारंपारिक अनिष्ठ प्रथा-परंपरा,विविध बंधने स्त्रीवर लादलेली आहेत.समाजात महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांची मालिका अजूनही थांबलेली नाही. मानसिक-शारीरिक छळ,हुंडाबळी,भेदभाव इत्यादीचे माध्यमातून स्त्रियाची कोंडी ही अद्यापही कायम आहे.स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण,पतीचा मनमानी व्यवहार,सासू नंनदेचा जाच तसेच स्त्रियांना दिले जाणारे ...

मुलीने गाठले यशाचे शिखर-वैधव्यानंतरही मुलींच्या पंखाना दिले बळ

---महिला दिन विशेष-- -मुलींने गाठले यशाचे शिखर- वैधव्यानंतरही मुलींच्या पंखांना दिले बळ!!! डॉ.नरेश शं.इंगळे      अत्यंत बिकट परिस्थितीतही जिद्द व मेहनतीच्या भरोशावर मुलीने यशाचे उच्च शिखर गाठले आहे.ऐन तारुण्यात वैधव्य आल्यानंतरही आईने मुलीच्या पंखांना दिलेले बळ त्यासाठी कारणीभूत ठरले असून समाजासाठी हे निश्चितच प्रेरणादायक आहे.        चिंचपूर गावातील रहिवासी असलेल्या साठ वर्षीय पद्मा भिकुसा शेंदुरज ने (पूर्वाश्रमीच्या पद्मा डगवार)वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी भिकुसा शेंदुरजने यांच्याशी विवाह झाला होता.भूमीहीन असलेल्या पद्मा चा विवाह आपल्या पेक्षा बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या भिकुसाशी विवाह झाल्याने तशा आनंदी व प्रसन्न होत्या. संयुक्त कुटुंबात सुखी संसारात रममान असताना सासू-सासरे अल्पावधीतच इहलोकी गेल्याने संयुक्त कुटुंबाची जबाबदारी ही भिकुसा वर आली त्यातचं त्याला वाईट व्यसनाणे पच्छाडले आणि कुटुंबाची जबाबदारीही अखेर पद्मा वर आली आणि तिने ती लीलया पेलली सुद्धा.दोन चिमुकल्या मुलीसह सर्वात धाकटी मुलगी अवघी अडीच वर्षाची असताना भिकु...