Skip to main content

मुलीने गाठले यशाचे शिखर-वैधव्यानंतरही मुलींच्या पंखाना दिले बळ

---महिला दिन विशेष--
-मुलींने गाठले यशाचे शिखर- वैधव्यानंतरही मुलींच्या पंखांना दिले बळ!!!

डॉ.नरेश शं.इंगळे

     अत्यंत बिकट परिस्थितीतही जिद्द व मेहनतीच्या भरोशावर मुलीने यशाचे उच्च शिखर गाठले आहे.ऐन तारुण्यात वैधव्य आल्यानंतरही आईने मुलीच्या पंखांना दिलेले बळ त्यासाठी कारणीभूत ठरले असून समाजासाठी हे निश्चितच प्रेरणादायक आहे.
       चिंचपूर गावातील रहिवासी असलेल्या साठ वर्षीय पद्मा भिकुसा शेंदुरजने (पूर्वाश्रमीच्या पद्मा डगवार)वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी भिकुसा शेंदुरजने यांच्याशी विवाह झाला होता.भूमीहीन असलेल्या पद्मा चा विवाह आपल्या पेक्षा बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या भिकुसाशी विवाह झाल्याने तशा आनंदी व प्रसन्न होत्या. संयुक्त कुटुंबात सुखी संसारात रममान असताना सासू-सासरे अल्पावधीतच इहलोकी गेल्याने संयुक्त कुटुंबाची जबाबदारी ही भिकुसा वर आली त्यातचं त्याला वाईट व्यसनाणे पच्छाडले आणि कुटुंबाची जबाबदारीही अखेर पद्मा वर आली आणि तिने ती लीलया पेलली सुद्धा.दोन चिमुकल्या मुलीसह सर्वात धाकटी मुलगी अवघी अडीच वर्षाची असताना भिकुसानेही मृत्यूला कवटाळले होते. बऱ्यापैकी जम बसलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.
       घरातील कर्ता पुरुष गेलयाने कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी ही कमी वयातच पदमा वर आली. घरची परिस्थिती तशी जेमतेमच त्यातही वारसाहक्काची असलेली जमीन वाट्याला आली नाही. परिणामतः मोलमजुरी करण्याशिवाय पद्मा समोर दुसरा पर्याय नव्हता.त्यातच लहानपणी पितृछत्र हरवलेल्या तीनही  मुली बालवयातच पोरक्या झाल्या. कुटुंबाच्या वास्तव्यासाठी पुरेसे घर नाही त्यांतच अठराविश्व दारिद्र्य पद्माच्या पाठीशी आले. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि तीन मुलीचे शिक्षणासाठी पद्माची चांगलीच घालमेल होत असे. अशा बिकट परिस्थितीही पद्मा हिंमत हरली नाही.परिस्थितीशी चार हात  करण्यास तिने कसलीही कसर सोडली नाही.
      मोलमजुरी करीत संसाराचा गाडा पुढे रेटत असताना दोन मुलीचे जेमतेम शिक्षण झाल्यानंतर त्यांचे परिस्थितीनुसार विवाह उरकून टाकले.सोबतच धाकटी मुलगी ज्योतीला शिकविण्याचा "पण" सुद्धा तिने घेतला होता.उज्वल भविष्याचे स्वप्न तिने ज्योतीमध्ये बघितले होते. ज्योतीसुद्धा प्रत्येक वर्षी चांगल्यापैकी यश मिळवू लागल्याने पद्माच्या दृढनिश्चयाला बळ मिळत गेले.त्यातच मोल मजुरीचे काम करीत असताना अचानक संत्राच्या झाडाला अडकून पडल्याने पदमा च्या माझ्या डोक्याला जबर इजा झाली.कालांतराने डोक्याला कळा येऊ लागल्याने येनकेन प्रकारे तिला अचानक झटके येऊ लागले.निदाना अंती मेंदूत रक्तस्राव कमी असल्याने मेंदूत गाठ तयार झाली होती.वडिलांचे छत्र नाही.करती आई आजारी पडल्याने ज्योतीवर अचानक संक उभे राहिले.होईल तशी तजवीज करून स्वतःचे शिक्षण आणि आईचे यशस्वी डोक्याची शस्त्रक्रिया करण्यात  आली.
      पद्माच्या डोक्याची शस्त्रक्रिया झाल्याने तिचे शेतीचे काम  कायमचे हातून सुटले. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि ज्योतीच्या शिक्षणाचा प्रश्‍न तिच्यासमोर निर्माण झाला होता.त्यातच पर्याय म्हणून वयाच्या पन्नासाव्या वर्षी पदमाने शिवणकला अवगत केली आणि तेच उदरनिर्वाहाचे साधन बनविले.
     वाट्याला वैधव्य आणि त्यातच हाताला काम नाही एकट्या मुलीला घेऊन राहणेही तितकेच जिकिरीचे. कुणाच्या मदतीचा हात नाही .समाजाचा विकृत दृष्टिकोनामुळे जीवन जगणे अवघड असतानाच ज्योतीने हि शिवण कला अवगत केली. आईला हातभार म्हणून ज्योतीने शिवणकाम करण्याबरोबरच शिक्षणातही बऱ्यापैकी यश प्राप्त केले केले. शिक्षणातील उच्च (एम.ए.बी.एड.एम.फिल.सेट) पदव्या तिने संपादित करीत गावातील सर्वात उच्च शिक्षित मुलगी म्हणून मान सन्मान मिळविला.स्पर्धेच्या काळातील शिवाजी शिक्षण सारख्या प्रतिष्ठित संस्थेत ज्योती ला शिक्षिका म्हणून नोकरी ची संधी मिळाली.दोघीच्या ही कष्टाच्या बळावर कुटुंबाचे अखेर भाग्य उजाळले!पदमा चे अपार कष्ट आणि प्रचंड अंगमेहनत दृष्टीपटलावर ठेवत ज्योतीनेही तितक्याच दिमतीने यशाचे शिखर गाठले आणि या मायलेकी

ने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...