Skip to main content

राष्ट्संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला

*राष्ट्संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही गुरुदेव प्रेमी अनुयायांची अपेक्षा!*
----------------------------------------
        *वृत्त संकलन*
*प्रा.डॉ. नरेश शं.इंगळे*
मोबा.९९७०९९१४६४
dr-nareshingale.blogspot.com
_________________________
      वंदनिय राष्ट्संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी गुरुदेव अनुयांची मनस्वी इच्छा असून आता ही मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे. भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी कित्येक वर्षांपासून गुरुदेव अनुयायी लढा देत आहे  मात्र सरकारने अद्यापही दखल घेतली नाही येत्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. त्याबाबतीत काही निवडक गुरुदेव भक्ताच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहे.
-------------------------------------------------------------------
*राष्ट्रासंताना भारतरत्न सन्मान मिळावा असी मागणी करावी लागन हे खुप मोठ दुर्दैव्य*

          राष्ट्रासंताच इतके मोठ राष्ट्रीय योगदान व स्वातंत्र- लढया सक्रिय सहभाग बघता त्यांना त्यांच्या महान कार्याचा गौरव भारतरत्न सन्मानाने आतापरेन्त्य होऊन जायला पाहिजे होता,आपना सर्वांचे दुर्भाग्य आहे की महाराजांच्या कार्यासाठी तो माँगावा लागत आहे,
 भारतरत्न सन्मान हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.तो राजकिय हेतूने कोणालाही दिला असेल त्यांच्याशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तुलना करणे योग्य नाही सन्मान कार्याचा होत असतो व्यक्तीचा नव्हे.बाजारात अनेक वस्तू असतात कधी काही वस्तू जाहिरातबाजीमुळे सोन्याच्या भावाने विकल्या जातात.परंतु सोन्याचे महत्त्व त्यांना येत नसते.भारतरत्न हा स्वतंत्र भारताचा सर्वोच्च मानाचा नागरी सन्मान आहे.तो ज्ञान, विज्ञान,समाजसेवा,कला ,साहित्य इ.क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.आजपर्यंत पंचेचाळीस लोकांना तो दिलेला आहे.हा सन्मान कोणाला द्यावा याचा निर्णय भारत सरकार घेत असते व घोषणा भारताचे राष्ट्रपती करतात. आता ज्या राजकीय पक्षाचे शासन असते ते निर्णय घेताना आपले राजकीय हित लक्षात घेऊन निर्णय घेत असतात हे खरे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतरत्न ही पदवी नसून तो सन्मान आहे.तो मर्यादित व्यक्तींना द्यावा व त्या सन्मानाची उंची कमी होवू नये अशा व्यक्तींना द्यावा. तुकडोजी महाराज यांनी देशासाठी जे कार्य केले ते भारतरत्न सन्मानास पाञ नाही काय? किंबहुना या सन्मानापलीकडचे आहे.परंतु भारत देशात या सन्मानापेक्षा मोठा सन्मान कोणताच नाही.महाराज देहरूपाने आपल्यातून निघून गेले परंतु कार्यरूपाने शिल्लक आहे.तेव्हा त्यांना किमान उशीरा का होईना येत्या २६ जानेवारीला भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात यावे.
*विकास बोरवार ( सचिव)*
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचारमंच महाराष्ट्र राज्य*
-------------------------------------------------------------
*राष्ट्रसंतांना भारतरत्न देवून जनभावनेचा आदर करावा*

              राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य हे वैश्विक स्वरुपाचे असून अनेक दिवसांपासून मागणी करुनही त्यांना भारतरत्न मिळू नये ही खेदाची बाब आहे.महाराजांचे कार्य हे देशाला जोडणारे आणि देशात राष्ट्रीय एकात्मतेचा विचार रुजविणारे होते.स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःं भाग घेवून लोकांना प्रेरित करणारे राष्ट्रसंत देशासाठी तुरुंगात जाणारे एकमेव संत आहे.आपल्या संपूर्ण साहित्यातून त्यांनी समता,एकात्मता व बंधूतेचा संदेश दिला आहे.चीन युध्दाच्या वेळी सीमेवर जाऊन सैन्याला प्रोत्साहन देणारे व जपानमधे विश्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करतांना विश्वबंधूत्वाची शिकवण देणारे तुकडोजी महाराज खरे संत होते.अशा जागतीक स्तरावर कार्य करणाऱ्या समाजसेवी संताला सरकारने ताबडतोब भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करुन जनभावनेचा आदर करावा अशी आमची मागणी आहे.

प्रेमकुमार बोके (व्याख्याते व लेखक) 
संंभाजी ब्रिगेड 
अंंजनगाव सुर्जी
------------------------–------------------------------
   गेल्या १७ वर्षांपासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारत सरकारने भारतरत्न सन्मान प्रदान  करावा अशी मागणी करण्यात आली.वेळोवेळी  या मागणीचे अनुषंगाने पञव्यवहार करण्यात आला.लोकसभेत व विधानसभेत सविस्तर चर्चा झाली.महाराष्ट्र सरकारने दि.८ जून २००६ ला या मागणीची पञ पाठवून  शिफारस केली.केंद्राच्या गृह विभागाने मा.पंतप्रधान कार्यालयाकडे शिफारस प्रस्ताव सादर केला तरी १७ वर्षांच्या कालावधीत निर्णय होवू नये हे फार मोठे दुर्देव आहे.येत्या दि.२६ जानेवारी २०२१ रोजी निर्णय व्हावा.
*राजेंद्र मोहितकर गुरूजी चिमूर*
-----------------------------------------------------------------
        *वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारत देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न येत्या दि.२६ जानेवारी २०२१ ला गणराज्य दिनाचे औचित्यावर प्रदान करावा अशी मागणी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच तिवसा शहराच्या वतीने करण्यात आलेली आहे*

*वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान मिळावा  अशी मागणी आजपर्यंत गेली १७ वर्षे सातत्याने या मागणीच्या अनुषंगाने पत्रव्यवहार व पाठपुरावा हजारो कार्यकत्त्यांनी गावागावातून केला.विदर्भ व महाराष्ट्रातील अनेक खासदार व आमदारांना तसेच महाराष्ट्र व भारत सरकारला हजारो निवेदने, पत्रे,ठराव,साहित्य संमेलनाचे ठराव,सामाजिक संस्था, संघटनांनी व अजूनही गावागावातून पाठविणे सुरू आहे.*
*अनूप देशमुख*
*तिवसा शहर अद्यक्ष*
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचारमंच महाराष्ट्र राज्य*
----------------------------------------------------------
       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना नक्कीच भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे वंदनीय तुकडोजी महाराज यांनी ग्राम गीते च्या माध्यमातून प्रबोदन केलें आज विदेशात ही लोक त्यांच्या विचारांवर चालत आहे युवा पिढी करिता त्यांचे विचार व ग्रामगीता खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारी आहे व सरकार नि याचा प्रसार प्रचार करावा लवकरात लवकर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा जेणे करून देश भर त्यांच्या विचारांना अधिक प्रेरणा मिळेल.
*विकास वासुदेवराव दांडगे*
*प्रहार जनशक्ती पक्ष*
*वर्धा जिल्हा प्रमुख*
-----------------------------------------------------------------
 *राष्ट्रासंताना भारतरत्न सन्मान*
  *मिळालाच पाहीजे...!*
        भारतरत्न राष्टसंत तुकडोजी महाराज यांना मिळावा असे  ज्यांना मनाभावापासुन वाटत असेल त्यांनी आप आपल्या गावपातळीवरुन सरपंच पोलीस पाटील व ग्रामसभेचा ठराव घेऊन माननीय पंतप्रधान यांना पाठवावी,व मायबाप सरकाने येत्या २६ जानेवारी ला राष्ट्रासंताना भारतरत्न सन्मान बहाल करावा.
*राष्टीय किर्तनकार रमेश कचरे*
 *महाराज फुबगांव ता दारव्हा*
*जि.यवतमाळ* 
 *जिवन प्रचारक गुरुकुंज मोझरी*
----------------------------------------------------------------
 *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न केव्हा ?.....* 
 *युगप्रवर्तक राष्ट्रसंत !..*

         *भारताला संतपरंपरा   प्राचीन काळापासून लाभली आहे जगतगुरु तुकोबाराय , संत कबीर , गोरा कुंभार , चोखामेळा, अशी किती नाव घ्यायची भारतातील विविध प्रांतात अनेक महान , तपस्वी , ज्ञानी महात्मे होऊन गेले या थोर संतांच्या कृपाशीर्वादाने , त्यांच्या वाङ्मयाने हा भारत जगातील एक आदर्श देश म्हणून ओळखला जातो इथला नागरिक , इथली संस्कृती जगावर आजही आपली छाप सोडते यात आपल्याला लाभलेल्या संतांच्या परंपरांचा फार मोठा प्रभाव आहे*_ !..

आधुनिक काळातील एक महान संत म्हणजे तुकडोजी महाराज ज्यांनी एका व्यक्तीपासून ते अखिल विश्वाच्या कल्याणाची संकल्पना मांडली व कार्य केले ते युगप्रवर्तक तुकडोजी . आध्यात्मा सोबतच महाराजांनी समाजातील प्रत्येक गोष्टींचा विचार करून त्यावर काम केले ग्रामगिते सारखा जनाने मान्य करावा असा ग्रंथ दिला गावापासून ते देशापर्यंत आणि अखिलविश्वाचा व्यापक विचारांचा संत कदाचीत च या आधुनिक काळात झाला असावा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महाराज आपल्या खंजिरी आणि भजनाच्या माध्यमातून "" *भारत के बलवान जंग मे आजा आजा रे""* म्हणत स्वातंत्र्याचा लढा तीव्र करून भारतातील पाहिलं गाव स्वतंत्र केलं आणि हीच उत्तेजनेची लाट संपूर्ण भारतात उसळली आणि इंग्रज सरकार याच काळात हादरून गेले आणि लवकर भारत स्वतंत्र झाला देशासाठी स्वतन्त्र सैनिक म्हणून काम करणारे राष्ट्रसंत तुकडोजी एकमेव , आणि याहूनही अधिक म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराजांनी संकल्पना मांडली त्याबद्दल आपण काय वर्णन करणार ग्रामगीता वाचली आणि समजून घेतली तर महराजांचं विशाल व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहते असा हा युगपुरुष आपल्या महाराष्ट्र राज्यात होऊन गेला आणि आपल्या कल्याना साठी आपलं संपूर्ण साहित्य आपल्या साठी महाराज देऊन गेले महाराजाना शब्दात सांगायचे जरा कठीणच आहे इतके मोठे समाजसेवक समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परंतु आपली शोकांतिका पहा की महराजांचं कार्य जगासमोर यावं त्यांना भारताचं रत्न म्हणून सन्मान देऊन या सन्मानाचाही सन्मान वाढावा अश्या *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न का नाही ?...* हा सवाल इथल्या व्यवस्थेत शोधतो आहे 

      *सचिन राऊत(तिवसा)*
     *सेवारत फाउंडेशन*
--------------------------------------------------------------
        भारत चीन युध्दाच्या प्रसंगी "तय्यार हुआ, तय्यार हुआ यह हिन्द तुम्हारे साथ ।आओ चीनियों  मैदानमे देखो हिंदका हाथ।।" असं त्या चीनच्या बॉर्डर वर जाऊन ज्यांनी आपली खांजरी गर्जवली,"स्वातंत्र्याचा बैल बरा पण गुलामगिरीचा थोर नको,हक्काचा कोंबडा बरा पण दुष्मानाचा मोर नको."असल्या पेटत्या अग्निमत्रांनी पारतंत्र्याची चीड नि स्वातंत्र्याची चाड ज्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये जागृत केली होती, जपानच्या विश्वधर्म परिषदेत जाऊन ज्यांनी भारताचा पंचशील ठराव मांडला व अठरा देशाचे सल्लागार झाले त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्याच्या शिफारशी सन २००३ म्हणजेच तब्बल १७ वर्षापासून होत आहेत तरीदेखील शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे ही खंताची बाब आहे.तरी येत्या २६ जानेवारी ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मान प्रदान करावा आणि सर्व गुरुदेव भक्तांचे समर्थन करावे.
*साक्षी पवार*
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवती विचारमंच महाराष्ट्र राज्य*
----------------------------------------------------------------

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगपुरुष होते.त्यांनी अखिल समाजाला आपल्या कीर्तन व भजनातून जाग्रूत  केले.अंधश्रद्धा कर्मठता यांवर प्रहार केले.सामुदायिक प्रार्थनेतून त्यांनी अखिल मानवाला जोडले.राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी बहाल केली.या महान व्यक्तिमत्वाला भारतरत्न मिळावे यासाठी आम्ही राज्यव्यापी अभियान सुरु करुत.....!
*डॉ. तुषार अ.देशमुख*
*राष्ट्रिय कार्याध्यक्ष वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद भारत*
–---------------------------------------------------------------
      भारतरत्न हा सन्मान जर अखिल भारतासाठी अफाट कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना मिळतो तर तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मिळालाच पाहिजे.आपल्या भजन आणि संघटनेचा सदुपयोग राष्ट्राला गुलामीतून सोडवण्यासाठी करणारे ते एकमेव संत आहेत.त्यांच्या भूतपूर्व काळापासून तर आजतागायत संपूर्ण साधुजनांचे संघटन करणारे अद्भुत समाजसेवक आहेत.मानवताधर्म प्रस्थापित करत सर्वधर्मसमभावाची शिकवणूक दिली.भारताचा आत्मा असणाऱ्या खेड्यांना शक्तिशाली,विकसित करण्यासाठी आजन्म परिश्रम घेतले,खेडे आदर्शही केले. सर्वधर्मपरिषदेत विश्वाला शांतता व प्रेमाचा महामंत्र दिला. त्यांचे कार्य शब्दातीत आहे.त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला तर जगाला त्यांच्या विचारांची असणारी गरज अधिक वेगाने पूर्ण होईल.
 *प्रा.प्रशांत गजानन ठाकरे* 
 (पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदकप्राप्त आणि राष्ट्रीय युवा प्रोबधनकार)
----------------------------------------   ----------- - ----
       ज्या महात्म्याने आपलं संपुर्ण जिवन राष्ट्रासाठी समर्पित केलं प्रसंगी भारताच्या स्वातंत्र्या साठी १००दिवस जेल भोगला भारतातील गावे स्वयंपूर्ण व्हावी म्हणून गावोगावी जाऊन ग्रामविकासाचा मंत्र दिला सर्वधर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेची शिकवन देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना येत्या २६ जानेवारीला भारत सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा गेल्या १७ वर्षा पासून जनतेची ही मागणी आहे सरकारने  जनभावणेचा आदर करावा अन्यथा तीव्र आंदोन करण्यात येईल 
*अमर वानखडे*
*अध्यक्ष :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य*
-------------------------------------------- --------------
        *भारत हा जगाला आदर्श देणारा देश आहे. या भारत देशात अनेक संत महापुरुष झाले. असेच एक महान संत महाराष्ट्रातील विदर्भाच्या मातीमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जन्माला आलेत. जन्मताच जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. या संत विचाराप्रमाणे हे राष्ट्रा  मधल्या पडलेल्या तुकड्याला तुकडे जोडून राष्ट्राला  अखंडत्व  बहाल करणारे ,देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रियतेने सहभाग घेऊन देव हा देशची पवित्र. याप्रमाणे गावाच्य गल्ली पासून तर देशाच्या राजधानी दिल्लीपर्यंत लोकांना मानवतेच्या विचारांचे प्रबोधन करणारे, राष्ट्रासाठी अविरत झटणारे मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार येत्या 26 जानेवारीला भारत सरकारने हा पुरस्कार देऊन सन्मानित कराव हीच आमची सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांची देशाच्या सर्व मंत्री प्रधानमंत्री व शासन व्यवस्थेला  विनंती आहे. कारण राष्ट्रसंत चे त् कार्य हे देशाप्रती अप्रतिम व अगणित आहे.. आणि म्हणून हा पुरस्कार त्यांना देऊन या पुरस्काराचं ही सन्मान वाढवावा ही शासन मायबापांना विनंती....!
*राज रामरावजी घुमनर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य प्रवक्ते*
------------------------------------------------------------------     
          राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी इंगजाविरुद्ध आंदोलने झाली 
देशाच्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात समर्पित भावाने तन मन धन अर्पण करून ग्रामविकासाची गरुकिल्ली तुकडोजी महाराज यांनी जनतेला समर्पित केली आहे
राष्ट्रसंतांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचावे ग्रामिगीतेचा प्रचार प्रसार व्हावा व महाराजांच्या स्वप्नातील भारत पुन्हा निर्माण व्हावा याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राज्य व केंद्र सरकारने याबाबत ठोस भूमिका घेतली पाहिजे
- दिनकर सुंदरकर
जनकल्याण फाउंडेशन
अध्यक्ष, 
अमरावती तालुका पत्रकार संघ
-------------------------------------------- --------------------- 
       वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामउन्नतीचे पुरस्कर्ते आहे. तुकडोजी महाराज एक असे क्रांतिकारी संत आहे ज्यांनी संपूर्ण जीवन स्वतंत्रता, समाज आणि राष्ट्राच्या कल्याणाकरिता समर्पित केले. देशात होणारा जाती-वाद, भ्रष्टाचार,देशातील राजकारण पाहून लज्जास्पद कृत देशात घडत आहे. यासाठी एकच उपाय, महाराजांनी माणसाला दिशा देणारा तसेच माणसाला माणूस बनविण्यासाठी समर्पित केलेला ग्रंथ म्हणजे "ग्रामगीता".  

विश्वाचा घटक देश !
गाव हाचि देशाचा अंश !
गावाचा मूळ पाया माणूस !
त्यासी करावे धार्मिक !!
                            - ग्रामगीता 
"ग्रामगीता" हि ग्रामविकासाची गुरुकिल्ली आहे. देशात नवी पिढी घडविण्यासाठी, समाज व राष्ट्राचा कल्याणाकरिता अफाट साहित्य लेखणी केली आहे. समाजात समन्वय साधण्याचे कार्य त्यांनी केले आहे. अशा थोर कांतिकारी महामानवास भारतरत्न मिळालाच पाहिजे.
*प्रतिक लोखंडे*
*संवेदना न्यूज़ संपादक*
---------------------------------------------------------------
      ज्या महात्म्याने आपलं संपुर्ण जिवन राष्ट्रासाठी समर्पित केलं प्रसंगी भारताच्या स्वातंत्र्या साठी १००दिवस जेल भोगला भारतातील गावे स्वयंपूर्ण व्हावी म्हणून गावोगावी जाऊन ग्रामविकासाचा मंत्र दिला सर्वधर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेची शिकवन देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना येत्या २६ जानेवारीला भारत सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करावा गेल्या १७ वर्षा पासून देशातील  जनतेची ही मागणी आहे सरकारने  जनभावणेचा आदर करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल .
*अमर पु.वानखडे* 
*अध्यक्ष :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य*
-------------------------------------------- -----------------
     तुकडोजी महाराजांनी भारतीय अस्मिता सांभाळून सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. त्यांच्या ‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे’ या रचनेला नोबेल पुरस्कार मिळायला हवा. त्यांची ग्रामगीता ही ग्रामीण भागाचा ज्ञानकोशच आहे. कर्मकांडात अडकलेल्या सामान्य शेतकऱ्याला त्यांनी जागे केले. तुकडोजी महाराजांनी स्वतःचा संप्रदाय निर्माण केला नाही. ते खऱ्या अर्थाने समाजसुधारक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास मंत्रालय निर्माण केले आहे. त्याचे मूळही ग्रामगीतेतच आहे.
राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळावा यासाठी विदर्भातील सर्व पक्षांनी संघटनांनी आणि नेत्यांनी यासाठी आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे- वैभव स वानखडे,
नगराध्यक्ष न प तिवसा,
सदस्य जिल्हा नियोजन समिती
------------------------------------------------------------
       *राष्ट्र भूषण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
*(राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मानेने भूषवण्यात यावे)*
    ही भारत भूमी अनेक संतांच्या , माहात्म्यच्या ,शूरवीरांच्या ,महापुरुषांच्या जन्माने पावन झालेली आहे.त्याच्या कार्याने सुशोभित आणि त्यांच्या विचारांनी सुगंधित झालेली आहे .या भारत भूमी साठी या देशासाठी अनेक संतांनी महापुरुषांणी शूरवीरानी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले आहे.बलीदान दिले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भात जन्माला आलेले आणि आपल्या कार्याने विचारने देशाचे नाव लौकिक करणारे देशासाठी  आपल्या आयुष्यातील क्षण- क्षण झिजवून या देशाला समतेची आणी मानवतेची दिशा दाखवीणारे असे या राष्ट्राचे राष्ट्रसेवक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांनी आपलं संपूर्ण जीवनात या देश हिताशिवाय दुसरा कोणताही विचार केला असेल असे कोणीही सांगू शकणार नाही.कारण त्यांचे संपूर्ण कार्य आणि त्यांच्या साहित्यातील शब्द आणि शद्ब देशासाठी खर्ची घातला आहे अशे दिसते.आणि त्यांच्या कार्यातून दिसते त्यांनी या देशावर आलेल्या प्रत्येक प्रसंगामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये आपले योगदान दिले.मग ती परिस्थिती देशावर युद्धाची असो किंवा दुष्काळाची असो किंवा भूकंपाची असो उपासमारीची असो किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटाची असो त्या प्रत्येक स्थिती मध्ये त्यांनी आपल्या जीवाचा पर्वा न करता त्या परिस्थितीचा सामना केला.देशाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी वेळोवेळी मदत केली.१९६२साली जेव्हा चीनचे आणी भारताचे युद्ध झाले तेव्हा त्यांनी देशाच्या सीमेवर जावून शत्रूला लढण्यासाठी आव्हान सुद्धा केले.तसेच आपल्या भारतीय सैनिकांना "तयार हुवा तयार हुवा हिंद तुम्हारे साथ आवो चिनियो मैदान मे देख हिंद का हात" अशा भजनाच्या माध्यमातून मनोबल सुद्धा वाढवले होते.तसेच जेव्हा देशात काही भागात भूकंपाचा सावट आलं तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांना मदतनिधी गोळा करून त्याचे पर्यंत पोहचून त्याचे सुद्धा "होणारे ते न चुके केव्हा प्रभू सगळी कडे पाहतो मानवा का चिंता वाहतो"" अशा भजनाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा धीर देणाचे कार्य त्यानि केले.एवढे कार्य करत असताना जेव्हा देशात पंथ भेदाचे ,धर्म भेदाचे ,संप्रदाय भेदाचे प्रमाण वाढत होते तेव्हा त्यांनी असे काही विचार मांडला आणि धर्म , पंथ ,संप्रदायाचे भेद मिटवून टाकले व सर्वांच्या हिताचं आणि सर्वांचं अस एक अधिष्टांन निर्माण करून दिल की तिथं  कोणत्याही धर्माच्या पंथाच्या ,संप्रदायाच्या माणसाने ते आपलंच आहे  असे म्हणावे .आपल्या या अशा कार्यातून आणि विचारातून कर्मकडाना वाव न देता आपल्या कामातच राम आहे असा विज्ञानवादी सिद्धांत मांडला .गीतेचेच प्रमाण घेवुन व सत सावतामाळी संत गोरोबाकाका संत कबीर संत नरहरी सोनार संत जनाबाई यांच्या सारख्या संतांचा ईश्वर प्राप्तीचा इतिहास सांगून ईश्वर सोंग किंवा ढोंग केल्याने प्राप्त होत नाही तर आपले कर्म कर्तव्य जर इमानदारीने केल्याने तो प्राप्त होतो असे दाखवून दिले .या माध्यमातून देवाच्या नावर देशात चाललेल्या कर्मकडांना आणि अंधश्रद्धेला दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.आपलं संपूर्ण आयुष्य या देशासाठी झिजवणाऱ्या या महात्माल्या त्याच्या कार्याची दखल घेवुन भारत सरकारने येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मानाने भूषवण्यात यावे.
*-महेंद्रा सावके
(हिरंगी)*
*मो.न-९६०४६८०६८३*
*अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक*
          *विचार मंच जिल्हा वाशिम*
-------------------------------------------------------------------
वृत्तसंकलन
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*
९९७०९९१४६४
-------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...