Skip to main content

बी.ए.भाग:-१ सेमी.२

*विषय :- अर्थशास्त्र*
बी.ए.भाग :-१ सेमिस्टर :-२
----------------------------------------
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता धामणगाव रेल्वे
------------------------------------------
१) ------महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

अ)1 मे 1960-
 ब)1 जुन 1960
क) 1 जुलै 1960 
ड) 1 ऑगस्ट 1960

 २) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या---- इतकी आहे..

अ)11. 14 कोटी  
ब)11.24 कोटी-
क)11.34 कोटी
ड) 11.44 कोटी

 ३)वर्धा व वैनगंगा नदीच्या संयुक्त प्रवाहास ---- म्हटले जाते.

अ) संयुक्त  ब)जनहिता 
क)प्राणहिता- ड) वरील सर्व

४) सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर ----- हे आहे.

अ) बैराट         ब) चिखलदरा
क) तोरणमाळ  ड) कळसुबाई-

५) प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्र राज्याचे ----- विभाग आहेत. 
अ) चार     ब)सहा-
क) आठ।  ड) दहा

 ६) महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे.

 अ)कृषिप्रधान अर्थव्यवस्था
ब) वाढती लोकसंख्या
क) शहरीकरणात वाढ 
ड)वरील सर्व-

 ७) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी -------- आहे

अ) गोदावरी- ब) भीमा 
क)कृष्णा      ड)तापी 

८) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे ------शहर आहे.

अ) अमरावती  ब) मुंबई 
क)नागपूर-      ड)पुणे 

९) An Essay on Principles of Population  हा ग्रंथ ------ यांनी लिहिला आहे.

अ) थॉमस माल्थस- ब)डॉ.मार्शल
क) डेव्हिड रिकार्डो 
ड)एडम स्मिथ

१०) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एक हजार पुरुषांमागे स्त्रियांची ------ संख्या आहे

अ) 929    ब) 943-
क) 922    ड)941

 ११) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता------- आहे.

अ) 382     ब) 315 
क)142      ड)365-

 १२) सन 1961 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण-–-- इतके होते.

अ) 35.1-   ब) 35.2
क) 35.3   ड) 35.4

१३) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या---- कोटी इतकी आहे
अ) 5.04     ब) 5.06    
क)5.08-    ड)यापैकी नाही

 १४) 2011 च्या जनगणनेनुसार भारतामध्ये नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र राज्याचा----- क्रमांक लागतो.

अ)प्रथम     ब) द्वितीय
क) तृतीय-  ड) चतुर्थ

 १५)एका भागातून दुसऱ्या भागामध्ये होणारी माणसाची हालचाल म्हणजे----- होय.

अ) स्थलांतर-   ब)नागरीकरण 
क)ग्रामिनीकरण ड)यापैकी नाही

१६) भारताच्या एकूण भूभागापैकी----- प्रतिशत भूप्रदेश महाराष्ताला मिळाला आहे.

अ) 9.26   ब)9.36-
क) 9.46    ड)9.56

१७)महाराष्ट्राच्या वाट्याला------ चौरस किलोमीटर जमीन आलेली आहे.

अ) 3,07,317   ब) 3,07,713--
क)3,70,713   ड) 3,70,313 

१८) नापीक व मशागतीस अयोग्य प्रकारच्या जमिनीचे प्रमाण सर्वात जास्त------तर सर्वात कमी-----मध्ये आहे.

अ) विदर्भ-कोकण 
ब) मराठवाडा - विदर्भ 
क)कोकण - विदर्भ-
ड)यापैकी नाही 

१९) महाराष्ट्रामध्ये मशागती खालील नसलेल्या जमिनीचे सर्वात जास्त क्षेत्र------ या जिल्ह्यामध्ये आहे.

अ) चंद्रपूर-भंडारा 
ब)धुळे-हिंगोली
क)अमरावती- अकोला
ड) भंडारा-गोंदिया-

२०)महाराष्ट्रामध्ये मशागती खालील नसलेल्या जमिनीचे सर्वात कमी क्षेत्र------ जिल्ह्यामध्ये आहे.

अ) चंद्रपूर-भंडारा 
ब)धुळे-हिंगोली-
क)अमरावती -अकोला
ड) भंडारा गोंदिया 

२१) भारतामध्ये कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा----- क्रमांक लागतो.

अ) प्रथम    ब) द्वितीय-
क) तृतीय    ड)चतुर्थ 

२२) शेतीच्या अल्प उत्पादकतेचे कारण आहे 

अ) शेतीचा लहान आकार 
ब) अपुरा भांडवल पुरवठा क) मान्सूनचा लहरीपणा
ड) वरील सर्व-

२३)------भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते.

अ)डॉ. एम. एस. स्वामीनाथन-
ब) नॉर्मन बोरलॉग 
क)स्वर्गीय वसंतराव नाईक
ड) शरद पवार

 २४) हरभरा हे----धान्य आहे.

अ) कडधान्ये-  ब) तृणधान्ये
क) तेलबिया  ड)यापैकी नाही

२५) महाराष्ट्र राज्याने---- पासून विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) धोरण स्वीकारले आहे.

अ) जानेवारी 2006 
ब) फेब्रुवारी 2006-
क)मार्च 2006 
ड) एप्रिल 2006

 २६) महाराष्ट्र राज्याने -----मध्ये जैवतंत्रज्ञान धोरण जाहीर केले.

अ) 2001-   ब)  2005 
क) 2011    ड) 2016

 २७) 1997 मध्ये आबीद हुसेन समितीने लघु उद्योगाची गुंतवणूक--–-- कोटी रुपयापर्यंत केली.

अ)तीन-     ब) चार
क) पाच।   ड) सहा 

२८) महाराष्ट्रामध्ये पहिली कापड गिरणी--- येथे उभारण्यात आली.

अ) इचलकरंजी  ब)बडनेरा
क) कोल्हापूर   ड) मुंबई-

२९) महाराष्ट्राचे मॅचेस्टर या------ शहराला म्हटले जाते.

अ) इचलकरंजी- ब) बडनेरा 
क) कोल्हापूर यापैकी नाही.

३०) महाराष्ट्रामध्ये पहिला साखर साखर कारखाना------- येथे उभारण्यात आला.

अ) प्रवरानगर  ब)बेलापूर- 
क) केळापूर    ड)अकलूज

३१) डॉ. वर्गियस कुरियन यांना---- क्रांतीचे जनक म्हटले जाते.

अ) हरितक्रांती   ब)निळी
क) धवलक्रांती- ड) यापैकी नाही

३२) राज्यातील पहिली रेल्वे सेवा---- दरम्यान सुरू झाली.

अ) मुंबई-भुसावळ
ब)मुंबई-ठाणे-
क)मुंबई-पुणे
ड)यापैकी नाही

३३) विदर्भामध्ये------ एकूण जिल्हे आहेत.
 
अ) सात   ब) नऊ
क) अकरा-  ड) तेरा

 ३४)-------यास महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

अ) भंडारा-   ब) गोंदिया
क) चंद्रपूर     ड)गडचिरोली

३५) 2011 च्या जनगणनेनुसार दर हजार पुरुषांमागे सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण------- जिल्ह्यात आहे.

अ) भंडारा   ब) गोंदिया- 
क)चंद्रपूर     ड)गडचिरोली

 ३६)---------हे शेतकरी आत्महत्येची नोंद ठेवतात.

अ) नॅशनल सॅम्पल सर्व्हे
ब) नॅशनल पापुलेशन ऑर्गनायझेशन
क) नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो-
ड) यापैकी नाही

३७)------ हे शेतकरी आत्महत्येचे कारण आहे.

अ) वाढता  कर्जबाजारीपणा
ब) सततची नापिकी
क) वाढता उत्पादन खर्च 
ड) वरील सर्व-

३८)---------येथे दीक्षाभूमी आहे.

अ) नागपूर-   ब) मुंबई 
क)पुणे       ड)औरंगाबाद 

३९)विदर्भामध्ये एकूण------- राष्ट्रीय उद्याने आहेत

अ)दोन   ब)चार-
क)पाच   ड)सहा

 ४०) विदर्भात एकूण-----औष्णिक विद्युत केंद्रे आहेत.
अ)दोन   ब) चार
क) पाच-  ड)सहा
----------------------------------------
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
९९७०९९१४६४
----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...