Skip to main content

बी.ए.भाग-१ सेमी-१

*विषय :- अर्थशास्त्र*
बी. ए.भाग-१ सेमी.१
----------------------------------------
प्रा.डॉ. नरेश शं. इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे
----------------------------------------
१) संपती वर आधारित व्याख्या------- यांनी केली आहे.

अ) डॉ. मार्शल 
ब) राबिन्स
क)एडम स्मिथ--
 ड) केन्स

२)कल्याणावर आधारित व्याख्या-------यांनी केली आहे.

अ)डॉ. मार्शल----
ब) रॉबिन्स
क)एडम स्मिथ 
ड) केन्स

३) दुर्मिळतेवर आधारित व्याख्या----यांनी केली आहे.

अ)डॉ. मार्शल
ब)रॉबिन्स----
क)एडम स्मिथ
ड) केन्स

४)अर्थशास्त्रीय नियम------ असतात.

अ) नैसर्गिक  
ब) परिस्तिथीसापेक्ष---
क)वरील दोन्ही
ड)यापैकी नाही

५)-------  या मध्ये विशिष्ट परिस्थिती, विशिष्ट परिवार, विशिष्ट किमती, विशिष्ट मजुरी,आय वैयक्तिक उद्योगाचा अभ्यास केला जातो.

अ) सूक्ष्म अर्थशास्त्र---
ब) स्थूल अर्थशास्त्र
क)वरील दोन्ही
ड)यापैकी नाही

६)-------यामध्ये विशिष्ट बाबीचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेतील मुख्य समूहाचा अभ्यास केला जातो.

अ)सूक्ष्म अर्थशास्त्र
ब)स्थूल अर्थशास्त्र---
क)वरील दोन्ही
ड)यापैकी नाही.

७) जनरल थिअरी (सामान्य सिध्दांत) हा ग्रंथ----यांनी लिहिला आहे.

अ)डॉ. मार्शल
ब)रॉबिन्स
क)एडम स्मिथ
ड)केन्स--

८)डॉ. मार्शल यांनी----- --महत्व दिले आहे.

अ)संपत्तीला
ब)दुर्मिळतेला
क)कल्याणाला---
ड)यापैकी नाही

९)वस्तूची किंमत------ ठरते
अ)मागणी
ब)पुरवठा
क)मागणी-पुरवठा संतुलन--
ड)यापैकी नाही

१०) वस्तूच्या मागणीत ---------या कारणाने बदल होतो.

अ)लोकसंख्या बदल
ब)किमतीत बदल
क)आवडीनिवडीत बदल
ड)वरील सर्व---

११)मागणी नियंमानुसार वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी-------

अ)वाढते--
ब)कमी होते
क)स्थिर राहते
ड)वरील सर्व

१२)वस्तूची मागणी आणि किंमत याचा सबद्ध ----दिशेने बदलणारा आहे.

अ)सम
ब)व्यस्त---
क)वरील दोन्ही
ड)वरील दोन्ही नाही

१३)गिफेनचा विरोधाभास---संबंधित आहे.

अ)कनिष्ठ किंवा हलक्या वस्तू--
ब)दर्जेदार वस्तू
क)भांडवली वस्तू
ड)यापैकी नाही

१४)किंमतजन्य लवचिकतेचे एकूण--------प्रकार आहे.

अ)एक
ब)दोन
क)चार
ड)पाच--

१५)किंमतजन्य लवचिकता मापनाची "एकूण व्यय पध्दती"यांनी सांगितली.

अ)पिगू
ब)प्लॅक्स
क)बामेल
ड)डॉ. मार्शल--

१६)विशिष्ट परिस्थितीत प्रत्येक पुढील नगापासून मिळणारी उपयोगीता म्हणजे सीमांत उपयोगिता---------

अ)ऱ्हास पावते--
ब)वाढते
क)स्थिर राहते
ड)वरील सर्व

१७)एखादी वस्तू तयार करण्याकरिता पैशाच्या स्वरूपात येणाऱ्या खर्चास-----म्हणतात

अ)मौद्रीक खर्च--
ब)वैकल्पिक खर्च
क)वरील दोन्ही
ड)यापैकी नाही

१८) एकूण उत्पादन राशी तयार करण्याकरिता जो खर्च येतो त्यास----उत्पादन व्यय म्हणतात.
अ)एकूण---
ब)सरासरी
क)सीमांत
ड)यापैकी नाही

१९)एकूण उत्पादन एका नगाने वाढविल्यास एकूण व्ययात जी शुद्ध वाढ होते तिला--------व्यय म्हणतात
अ)एकूण
ब)सरासरी
क)सीमांत---
ड)यापैकी नाही

२०)वस्तूचे सर्व नग विकून जेवढे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नाला ---------प्राप्ती असे म्हणतात.

अ)एकूण--
ब)सरासरी
क)सीमांत
ड)यापैकी नाही

२१) पूर्ण स्पर्धेत सरासरी आणि सीमांत प्राप्ती वक्र अक्ष आसाला ------असतो
अ)ऋणात्मक
ब)धनात्मक
क)समांतर----
ड)यापैकी नाही

२२)उत्पादनाच्या अंतर्गत बचती आहे....

अ)उत्पादन तंत्र सुधारणा
ब)श्रमविभागणी
क)उप उत्पादन निर्मिती
ड)वरील सर्व---

२३)सामान्यतः समउत्पत्ती वक्र प्रारंभ किंवा उगम बिंदूला------- असतो.

अ)बहिर्गोल---
ब)अंतरगोल
क)वरील दोन्ही
ड)वरील पैकी नाही

२४)उत्पादनाच्या बाह्य ----------बचतीआहे.

अ)वाहतूक व्यवस्था सुधारणा
ब)बँक व्यवसायात वाढ
क)प्रशिक्षण केंद्र उभारणी
ड)वरील सर्व--  

२५) पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत -----ग्राहक-विक्रेते असतात.

अ)एक
ब)दोन
क)मर्यादित
ड)असंख्य----

२५) एकाधिकार बाजारपेठेत----   विक्रेते असतात.

अ) एक---- 
ब)असंख्य
क)भरपूर
ड)वरील सर्व

२६)पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत खरेदीदार-विक्रेत्यांना-----प्रवेश असतो

अ)मुक्त----
ब) बंधने असते
क)मर्यादित बंधने
ड)वरील सर्व

२७)पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तू---- असते
अ) भेद असते
ब)समान/एकजिनसी---
क)थोडाफार फरक
ड)यापैकी नाही

२८) पुर्ण स्पर्धेचे वैशिष्ट्ये आहेत----

अ) मुक्त प्रवेश-गमन
 ब)असंख्य क्रेते-विक्रेते
क)एकजिनसी वस्तू
ड)वरील सर्व--- 

२९)एकाधिकाराचे प्रकार आहेत.

अ)नैसर्गिक एकाधिकार
ब)कायदेशीर एकाधिकार
क)सार्वजनिक एकाधिकार
ड)वरील सर्व------

३०)परस्परावलंबन ------या बाजारपेठेचे वैशिष्ट्ये आहे.

अ)पूर्ण स्पर्धा
ब)अपूर्ण स्पर्धा
क)एकाधिकार
ड)अल्पाधिक्कार-----

३१)कारटेल प्रकार आहेत-----

अ)केंद्रीकृत कारटेल
ब)बाजार विभाग करणारे कारटेल
क)वरील दोन्ही-----
ड)यापैकी नाही


३१) Oligopoly मधील
 Oligoi या शब्दाचा अर्थ----------आहे.
अ)अल्पसंख्य----
ब)बहुसंख्य
क)वरील दोन्ही
ड)यापैकी नाही

३२)----------या बाजारपेठेत  मूल्यभेदन शक्य आहे.
अ)पूर्ण स्पर्धा
ब)अपूर्ण स्पर्धा
क)एकाधिकार----
ड)वरील सर्व

३३)-----------ही भूमीची वैशिष्ट्ये आहे.

अ)निसर्गदत्त देणगी 
ब)स्थानांतरण करता येत नाही
क)भूमी अविनाशी असते
ड)वरील सर्व---

३४)भूमीमध्ये ------------गोष्टींचा समावेश असतो.

अ)शेतजमीन
ब)नद्या पर्वत
क)वनस्पती/जंगले
ड)वरील सर्व---

३५) श्रम हा घटक ----आहे

अ) नाशिवंत
ब)सक्रिय उत्पादक 
क)वरील दोन्ही---
ड)यापैकी नाही.

३६) श्रमाला------दिले जाते.
अ)मजुरी----
ब)व्याज
क)खंड
ड)नफा

३७)भांडवलाला--------या स्वरूपात मोबदला दिला जातो.

अ)मजुरी
ब)व्याज---
क)खंड
ड)नफा

३८) खंड सिध्दांत-----यांचेशी संबंधित आहे.

अ)केन्स
ब)शुंपिटर
क)रीकार्डो-----
ड)प्लॅक्स

३९) भूमीचे मूलभूत व अविनाशी गुण वापरल्याबद्दल भूमीच्या एकूण उत्पादनापैकी भूमी मालकाला दयावयाचा हिस्सा म्हणजे----------होय.

अ)खंड--
ब)मजुरी
क)व्याज
ड)नफा

४०) संघटकाच्या परिश्रमाचा मोबदला म्हणजे----होय.

अ)खंड
ब)मजुरी
क)व्याज
ड)नफा--
----------------------------------------
प्रा. डॉ. नरेश शं.इंगळे
९९७०९९१४६४
----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...