*आजही दुविधेतच* *भाग-३* हेमंत कडून झालेल्या विश्वासघातानं सूर्या पूर्णतः कोसळला/खचला.चार-चौघात राहण्याऐवजी एकाकी राहणं पसंत करू लागला.त्यावेळी त्याला काही सुचेनासं झालं होतं.हेमंत अनं सूर्या यांच्यातील संवाद कधीचाच थांबला.तो दृष्टीत पडल्यास त्याचा राग अनावर होत असे.त्याच्या कडून झालेला विश्वासघात अनं घडलेला प्रकार कदापिही विसरण्यासारखा नव्हता.इतकं सर्व घडूनही सूर्याचा किरणववरील विश्वास पूर्वीप्रमाणेच कायम होता.तरीपण सत्यता समजून घेण्यासाठी त्याची उत्सुकता अनं तितकीच तळमळ होती.त्यासाठी किरण किंवा सानियाला भेटून शंका निरसन करणं हाच एकमेव पर्याय समोर होता.पण सर्वदूर चर्चेनं सूर्याला किरणच्या संपर्कात किंवा तिच्या घराच्या आसपास परिसरात ये-जा करणं तितकं सोपं नव्हतं.कारण हेमंतनं त्याचं स्वतःचं नाव किरण सोबत जोडून घेतलं होतं शिवाय सूर्यालाही बदनामीच्या कटघऱ्यात उभ केलं होतं.त्याने सूर्याची सर्वच बाजूने कोंडी अन तटबंदी केली होती."सूर्याचं प्रेम तुटलं अनं माझं जुळलं" हे तर त्याच्यासह त्याच्या सहकार्यानी ब्रीदवाक्य बनविलं होतं.हेमंत सह त्याच्या सहकार्य...