Skip to main content

आजही दूविदेतच---भाग दोन

*आजही दुविधेतच*
*भाग दोन*

      हेमंतची गावी परतीची वेळ बदलली.तो आता किरणचे वेळेत येऊ लागला.त्या दरम्यान कधी कधी त्यांच्यात संवाद होऊ लागला.संवादाची इत्यंभूत माहिती तो सूर्याला सांगू लागला.परंतू अजूनपर्यंत त्याला सूर्याच्या मनातील भावना तिच्यापर्यंत पोहचविण्यास अद्याप पर्यंत यश काही आलं नव्हतं.
     शनिवार,रविवार सुटीचे दिवशी दोघेही (सुर्या-किरण) घरीच राहत असे.हेच औचित्य साधून सूर्यानं सुटीचे दिवशी हेमंतला पण कामावर न जाऊ देता घरीच राहण्याचा आग्रह धरला आणि तो पण राजी झाला.नित्यक्रमानुसार सूर्या आपल्या सवंगड्यासह खेळासाठी मैदानावर पोहोचला,नव्हे ! तो तिला भेटण्यासाठी/बघण्यासाठी पोहचला !!! किरण दृष्टीत पडेल अशा ठिकाणी तो उभा राहू लागला.योगायोग म्हणजे त्याचवेळी किरण सुद्धा कित्येक वेळ पर्यंत दारातच उभी होती.खेळात रंगत यायला लागली.मुले मौजमस्तीत रंगू लागलीत.किरण तिचे घराकडून इकडे तिकडे घिरट्या मारू लागली.किरणच्या इकडून तिकडे  येरझारा सूर्याला सकारात्मक दिशेने नेणाऱ्या वाटू लागल्यात.काही वेळानंतर अचानक किरण आणि तिची  मैत्रीण प्रणिता मैदानाचे दिशेने येऊ लागल्यात.म्हणून सूर्याची धाकधूक वाढली.तिच्यातील असा उत्साह सूर्याच्या काळजाला सुखद छेद करू लागला.ती एक एक पाऊल पुढे टाकत मैदानाच्या दिशेने येऊ लागली.ती थेट मैदानाकडे न येता सरळ जिल्हा परिषद शाळेच्या बाजूने असलेल्या मंदिराकडे गेल्यात अन बिनधास्तपणे मंदिराच्या ओट्यावर येऊन बसल्यात.त्याही हसत खेळत अन मौजमस्ती करीत होत्या.किरण येनकेनप्रकारे  मैदानाकडे अर्थात सूर्यावर नजर टाकू लागली.त्याचवेळी समीर अन हेमंत सुद्धा मैदानावर हजर होते.ते दोघेही सूर्या अन किरण या दोघांच्याही हालचालीचे अवलोकन करू लागले.त्यांच्यातील प्रत्येक क्षण ते अलगदपणे टिपत होते.किरणचा आनंदी आणि उत्साह बघून सूर्याचा चेहरा फुलायला लागला.हा सर्व आनंददायी क्षण त्याला खऱ्या प्रेमाची साक्ष देण्यास पुरेसा वाटू लागला.हे सर्व बघून समीर अन हेमंत या दोघांचाही विश्वास अधिक बळकट व्हायला लागला.कदाचित सुर्याप्रमाणे किरण सुद्धा सुर्यावर तितकीच प्रेम करित असावी असं त्यांनाही वाटायला लागलं.म्हणूनच "सूर्या ! तु किरणचे प्रेम मिळविण्यास नक्कीच यशस्वी होशील" हे दोघांचेही एकसुरातील उदगार सूर्याच्या थेट काळजाला जाऊन भिडले.त्याचा कधी नव्हे इतका आत्मविश्वास वाढायला लागला.किरण अनं तिच्या मैत्रिणीनं (प्रणिता) मंदिर परिसरात बराच वेळ घालविला.सुर्यासाठी हा प्रसंग आश्चर्यचकित करणारा आणि त्याच्या प्रेमाला अधिक बळकटी देणारा होता.असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं.काही अवकासानंतर दोघीही घरी परतीच्या वाटेने निघाल्यात.किरण तिच्या घरापर्यंत पोहचली पण थेट घरात प्रवेश न करता पुन्हा दरवाज्यात थांबली आणि येनकेनप्रकारे मैदानावर अर्थात सूर्याकडं नजर फिरवू लागली.तिची नजरभेट सूर्याला घायाळ करणारी होती. शिवाय तितकाच आत्मविश्वासही वाढविणारी होती.कदाचित तिच्याही मनात सूर्या प्रति फिलिंग आहे हे नाकारण्याचं काही एक कारण नव्हतं.आजचा प्रसंग लक्षात घेता सूर्या किरणच्या प्रेमाची फुलबाग ही नक्कीच बहरणार हा आत्मविश्वास सूर्याला दृढ करून गेला.तिच्या घरासमोरील मैदानावर वेळेनुसार बसणे व क्रिकेट सह वेगवेगळे खेळ खेळणे हा सूर्याचा नित्यक्रम होऊन बसला होता.
      काही दिवसांनं हेमंत किरणच्या संपर्कात यायला लागला.संवाद व्हायला लागला.त्यांच्यात वेळोवेळी होत असलेला संवाद तो न चुकता सूर्या जवळ सांगू लागला.परंतु सूर्याच्या मनात असलेलं प्रेम तो अद्यापपर्यंत तिच्या समोर व्यक्त करू शकला नाही हेही तितकचं खरं होतं.तो एकाएकी  तिला सांगायला घाबरत होता.
         किरण ही शाळेसाठी जायला सकाळी साडेदहा वाजता घरून निघत असे.त्याच वेळेत हेमंतला सुध्दा दुकानासाठी जायला सांगितलं.त्यानुसार तो पण त्याच वेळेत जायला लागला.हा नित्यक्रम  जवळपास तीन महिने चालला.यावेळेत सूर्या हा कॉलेज मध्ये राहत असे. पण त्यांच्यात दररोज काय संवाद घडतय तो ते नित्यनेमाने सुर्या जवळ सांगू लागला.त्यामुळे सूर्याला पण काहीसा दिलासा मिळत असे.आता लवकरच सर्व काही सुरळीत होईल या आशेने सूर्या बिनधास्त होता.दरम्यानच्या काळात हेमंत बऱ्यापैकी काम शिकला.म्हणून त्यालाही दुकानदाराकडून काही चार दोन पैसे मिळू लागलेत.म्हणून हेमंत सुद्धा समाधानी होता.किरण विषयी दररोज वृतांत मिळू लागल्याने सूर्या पण आनंदी अनं आशादायी होता.म्हणून तो येणाऱ्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेता अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊ लागला.पण किरणंकडून कसलाही सकारात्मक निरोप येत नसल्यानं तसा तो ही चिंताग्रस्त होता.मात्र त्यानं अभ्यासाकडं दुर्लक्ष केल नसलं तरी पूर्वी प्रमाणे अभ्यासात जी गती असायला हवी ती गती नक्कीच नव्हती.कारण त्याचं सगळं मन हे पुर्णतः किरण मध्ये गुंतलं होतं.किरण त्याच्या नजरेत पडल्याशिवाय त्याला काही राहावल्या जात नव्हतं.म्हणून तो तिच्या एका नजर भेटीसाठी पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी जायला लागला.दिवसभर रिकामा वेळ घालविण्यापेक्षा त्यानं आवश्यकता नसतानाही इंग्रजी विषयाची शिकवणी (इयत्ता बारावीत ट्युशन) लावली.तिच्या वेळेत पोहचता येईल या बेताने त्यानं ट्युशनची वेळ करवून घेतली.त्यामुळे किरण अन सूर्या हे दोघेही एकाच वेळेत,एकाच बसने गावी परतत असे.त्यावेळी नजरभेट तर होतच असे शिवाय अधिक वेळपर्यंत तिला बघता पण येत असे.कालांतराने परीक्षेची वेळ लक्षात घेता सूर्या पुन्हा अधिकांश वेळ घरी राहायला लागला.मात्र हेमंत कडून दैनंदिन संवादातील गोष्टी माहीत करून घेण्यास विसरत नव्हता.हेमंत पण न चूकता दररोज सायंकाळी सूर्याची भेट घेऊन सर्व वृत्तांत सांगायचा.म्हणून सूर्या हा दररोज सायंकाळी हेमंतची भिर भिर वाट पाहत असे.तो भेटी दरम्यानचा वृत्तांत सांगत असलातरी सूर्याच्या बाबतीत बोललो किंवा त्याचे विचार तिच्या जवळ व्यक्त केले आहे हे त्याला कधी ऐकायला मिळत नव्हतं.सूर्या कडे ऐकून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.सूर्याची परीक्षा निकट आल्याने तो ही अभ्यासाच्या दृष्टीनं घरीच राहू लागला.त्यानं संपूर्ण विश्वास हा हेमंतवर टाकला होता."जे काही करायचं आहे, ते हेमंत तूच कर" असं सूर्यानं त्याला सांगून टाकलं होतं.त्यांच्यात काय सवांद होतय या बाबतीत सूर्या पुर्णतःअनभिज्ञ होता.जे हेमंत सांगत असे तेच सूर्या ऐकत असे अनं खरं मानत असे.
        सूर्या अन किरण या दोघांच्याही परिक्षा अगदी जवळ आल्या होत्या.त्याच दरम्यान किरण ही आजारी पडली असल्याचे हेमंत कडून सूर्याला समजलं.म्हणून ती गावावरून ये-जा न करता तिची वर्ग मैत्रीण सुप्रिया हिचे कडे मुक्कामी राहू लागली होती.किरण आजारी अनं तिथेच मुक्कामी राहत असल्याने तिचे आईवडील तिच्यासाठी घरून हेमंत करवी दूध डब्बा पाठवू लागले.हेमंत सुद्धा तिचे घरून पाठविलेला दूध डब्बा तिच्यापर्यंत पोहचू लागला.किरण आजारी असल्यानं सूर्याचा जीव तीळ तीळ तुटायला लागला.त्याचं कशातच मन रमत नव्हतं.तिला बघितल्याशिवाय त्याचं काही समाधान होत नव्हतं.दूरवरून का होईना तिची भेट घ्यावी अशी त्याची मनस्वी तळमळ होती.शेवटी एक दिवस सायंकाळी पाच-साडेपाच वाजताच्या दरम्यान सूर्या हेमंतसोबत तिच्या मैत्रिणीकडे जायचं ठरविलं.जसजसं सुप्रियाचं घर जवळ जवळ येत होतं तसतसं सूर्याचा जीव खालवर होत होता.दोघेही सुप्रियाच्या घरानजीक पोहचले.किरण (पिवळ्या रंगाचे गाऊनवर) अनं सुप्रिया बाहेर दरवाज्यातच बसल्या होत्या.सूर्याचं तिथपर्यंत जाण्याचं धाडस झालं नाही.तो दूर अंतरावरच थांबला.अनं तेथूनच तिला न्याहाळू लागला.हेमंत तिच्या पर्यंत पोहचला.किरणकडे असलेला दुधाचा रिकामा डब्बा तिनं हेमंत कडे सुपूर्द केला.सूर्या काही अंतरावर उभा असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिनं डाव्या हातानं डोक्याच्या केसाला वळण देत अलगदपणे सूर्याकडे (निळा शर्ट-काळा पॅन्ट) नजर फिरवली अनं गालातल्या गालात हसली !!! तिच्या क्षणभराच्या नजरेनं अनं स्मितहास्यानं सूर्या पूर्णपणे सुखावून गेला.पण तिच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबतीत तो दुविधेतच अडकला.
       एप्रिल-मे (१९९३) महिना.उन्हाळ्याची चाहूल लागली.त्याच दरम्यान किरण अनं तिची मैत्रीण सानिया या दोघीही सानियाच्या मोठ्या बहिणीच्या नजीकच्या गावी जाणार असल्याचे कुठूनतरी सूर्याला कळलं.सानिया म्हणजे सूर्याच्या अति निकटची मैत्रीण.त्यांच्यात बहिण-भावाप्रमाणे घट्ट ऋणानुबंध सर्वश्रुत आहे.त्यात दोघेही दहावी पर्यंत एकाच वर्गात शिकलेत.सानियानं आवश्यक त्यावेळी सूर्याला सहकार्य करणं कधी टाळलं नाही.किरण सोबत सानियाची घट्ट  मैत्री आणि जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आहे हे त्याला उशिरा कळलं.तिकडे हेमंत सूर्याच्या बाबतीत किरणकडे काही बोलण्याचं धाडस करीत नव्हता.अशा दुविधा स्थितीत इतरांपेक्षा सानिया त्याला अधिक जवळची वाटायला लागली.ती नक्कीच काहीतरी मदत करील याची सूर्याला पूर्ण खात्री होती.सानिया आपल्या प्रेमासाठी खरी संजीवनी ठरेल असा विश्वास सूर्याला यायला लागला.हेमंतचंही असच काहीसं म्हणणं होतं.हेमंतवर सूर्याचा पूर्ण विश्वास होता.सूर्या त्याच्या शब्दापलीकडे कधी जात नव्हता.असे अनेक घटनाप्रसंग घडत असताना सूर्यानं किरणचे नावाने एक प्रेमपत्र लिहिलं (सानिया मार्फत पाठविण्यासाठी पण तेव्हा तो ते पत्र पाठवू शकला नाही).त्यात अनेक बाबीचा उलगडा केला होता.हे प्रेमपत्र हेमंतला दाखविलं.पण त्यानं त्या पत्राकडे दुर्लक्ष करीत सानियाची भेट घेण्यावर अधिक भर दिला.सूर्यानं सानियाच्या भेटीसाठी प्रयत्न चालविलेत तसेच प्रयत्न हेमंतने पण सुरू केले.सूर्याची सानिया सोबत भेट झाली नाही.मात्र हेमंत सानियाची गाठभेट झाली.या भेटी दरम्यान तुझं मत (सूर्याचे) आणि तुझी किरण प्रति असलेली तळमळ याबाबतची सविस्तर माहिती सानिया जवळ सांगितली असल्याचे हेमंतनं सूर्याला सांगितलं.कित्येक वर्षांनंतर आपल्या भावना किरण जवळ व्यक्त होणार असल्याने सूर्यानं सुटकेचा श्वास घेतला.कारण त्याच्या मनावर असलेले भलेमोठे ओझे अलगदपणे गळणार होते.या विचारानं त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.ही भेट त्याच्यासाठी अनमोल तितकीच अविस्मरणीय अनुभव देणारी आणि त्याच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारी ठरणारी होती.आता सूर्याची बहिणच हे कर्तव्ये पार पाडणार असल्याने आता काहीतरी सकारात्मक घडणार याची सूर्याला पूर्ण खात्री होती.पण किरणचा नेमका निर्णय काय असेल याबाबतीत तो पुन्हा दुविधेत अडकला.
       सूर्याच्या मनात असलेले भाव हे सानिया करवी किरण पर्यंत पोहोचणार असल्याने सूर्या कधी नव्हे इतका आनंदी अनं उत्साही होता.मात्र किरण सूर्याचं प्रेम स्वीकारणार की नाही अशी द्विदास्थिती ही कायम होती.इतके मात्र खरे की,किरणने सूर्याच्या प्रेमाचा स्वीकार केल्यास त्याच्या कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेचं फलित होणार होतं.या उलट किरणने नकार दिल्यास किंवा किरणच्या मनात सूर्याच्या बाबतीत कुठलीच भावना नसेल तर त्याच्या निर्मळ मनावर आभाळ कोसळणार हेही तितकच खरं होतं.किरणचा निर्णय काहीही असो तो निर्णय स्वीकार करण्यासाठी सूर्यानं मन घट्ट केलं होतं.तिचा एक निर्णय सूर्याचं आयुष्य आणि भविष्याची दिशा ठरविणारा राहील यात अजिबात शंका नव्हती.हेही खरे आहे की; सूर्याचं प्रेम हे किरणला मिळवण्यासाठी नव्हे तर तिचं प्रेम निभवण्यासाठी होतं/ आहे.सूर्या हा किरण कडून अपेक्षित असलेल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होता.किरणचा निर्णय काय असेल ह्या बाबतीत त्याच्या मनात सारखी कालवाकालव सुरू होती.त्याच्यासाठी एक एक दिवस अनं एक एक क्षण महत्त्वाचा होता.सानिया गावावरून कधी परतणार आणि हेमंत करवी किरणचा निर्णय कधी कळणार यासाठी तो अगदी आतुर झाला होता.किरणचा होकार त्याच्यासाठी त्याचे आयुष्य बदलविणारा आणि पुढील दिशा ठरविणारा असला तरी यदा कदाचित तिच्या कडून नकार आला तर तिचा नकारही पचविण्याची त्याची तयारी होती.तिचा जो निर्णय असेल तो लवकर कळणं अपेक्षित होतं.निदान आपल्या मनातील भाव तिच्यापर्यंत पोहोचावे हीच त्याची तळमळ होती.किरणचा नकार जरी आला तरी तिच्या संपर्कात न येता तिला कायम जपण्याचं आणि आयुष्यभर तिचे प्रेम निभवण्याचा सूर्यानं संकल्प केला होता.
      सानिया आणि किरण गावावरून कधी परततील यासाठी तो आस लावून बसला होता.पण तिच्या परतीचा निरोप काही मिळेना.त्यातच सानिया आणि किरण गावी गेल्या तेव्हापासून हेमंतचा सुद्धा काही थांगपत्ता नव्हता.विशेष म्हणजे तेव्हापासून हेमंतन भेटणं तर बरेच बरे पण तो सूर्याच्या घराकडे फिरकत सुद्धा नव्हता.हेतुपुरस्सर तो बोलणं किंवा भेटणं टाळत होता.हेमंतचं असं वागणं सूर्याला आश्चर्यकारक वाटायला लागलं.हेमंतच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबतीत सूर्या तर्कवितर्क काढत असे.अनेक प्रश्नाच्या गर्तेत तो अडकला होता.
        दोन दिवसांनी सानियासह किरण गावी परतल्याचे इतराकडून सूर्याला कळलं.याबाबतीत हेमंतनं मात्र त्याला काहीच सांगितलं नाही.उलट तो सूर्यापासून दूर अंतर ठेवू लागला.हेमंतनं एकाएकी सूर्याकडं येणं-जाणं तसेच बोलणं सुद्धा बंद केलं होतं.हेमंत असा का वागतोय हे सूर्याला कळेनासं झालं होतं.कदाचित आपल्या कडून काहीतरी चूक झाली असावी म्हणून तो आपल्या सोबत बोलत नसावा असा सूर्याचा काहीसा समज झाला.म्हणून सूर्या स्वतःहुन हेमंत सोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागला.सूर्या हेमंतच्या जितक्या जवळ जवळ जाऊ पाहत होता तेवढाच तो दूर दूर राहण्याचा प्रयत्न करीत होता.त्याच्या अशा वागण्याचं आणि व्यवहाराचं रहस्य सूर्याला काही केल्या उलगडत नव्हतं.असेच सात आठ दिवस उलटले पण हेमंत काही सूर्याला भेटला नाही.त्याच्याशी काही संवाद साधला नाही.त्यामुळे सूर्याच्या मनात शंकेचं घर करायला लागलं.हेमंतच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबतीत सूर्या दुविधेतच होता.असं वागण्यामागील रहस्य काय असेल हे शोधण्याचा तो प्रयत्न करू लागला.त्याच्याशी जबरदस्तीनं संवाद साधू लागला.पण तो बोलण्याच्या अजिबात मानसिकतेत नव्हता.कालांतराने सूर्याला नजीकच्या मित्राकडून कळायला लागलं की, "किरणनं सूर्याचं प्रेम नाकारलं" असं तो अनेकाजवळ सांगत फिरू लागला.किरणची विनाकारण बदनामी होऊ नये यासाठी सूर्या नेहमीच काळजी घ्यायचा.इतकेच नव्हे तर त्यानं कधीही स्वतःचं नाव हे किरण सोबत जोडुन घेतलं नाही.स्वतः किरणवर अफाट प्रेम करतो हे सुद्धा त्यानं  कधीही आपल्या काही निवडक मित्रा व्यतिरिक्त कुणाजवळही व्यक्त केलं नव्हतं.सूर्या किरणवर जीवापाड प्रेम करतोय याची हेमंतला पूर्ण कल्पना असतानाही हेमंत स्वतःच स्वतःचं नाव किरण सोबत का जोडतोय याचं सूर्याला आश्चर्य वाटायला लागलं.विशेष म्हणजे सूर्यानं ज्याच्यावर प्रचंड असा विश्वास ठेवला त्यानचं असं वागावं हे सूर्याला अजिबात रुचलं नव्हतं.हेमंतनं त्याचं स्वतःचं नाव किरण सोबत जोडून सर्वदूर चर्चा घडवून आणली.तो इथेच थांबला नाही तर "किरणनं सूर्याचं प्रेम नाकारलं अनं माझं प्रेम स्वीकारलं" अशी सर्वदूर चर्चा घडवून आणली.पण सूर्यानं अश्या चर्चेवर कधीही विश्वास ठेवला नाही.कारण सूर्याचा विश्वास हा स्वतःपेक्षा किरणवर अधिक होता."जी मुलगी विनाकारण कधी घराच्या बाहेर पडत नाही,घराबाहेर पडली तरी कधीही खालची मान वर करीत नाही,सहसा कुणाच्या संपर्कात येत नाही,तिचा बोलण्याचा एक एक शब्द विकत घ्यावा लागतो अशी लाजाळू,निर्मळ मनाची,सोज्वळ स्वभावाची,तितकीच संस्कारी मुलगी हेमंत सारख्या मुलांच्या प्रेमात पडूच शकत नाही" अशी सूर्याला पूर्णपणे खात्री होती.किरणचा हाच स्वभाव सूर्याला अधिक आकर्षित करीत असे.नव्हे ! याच स्वभाव गुणामुळे तो किरणच्या प्रेमात पडला होता..फक्त त्याला त्याच्या मनातील भाव एकाएकी तिचेसमोर व्यक्त करता आले नाही.कधी अशी संधी मिळाली नाही.हेमंतनं तर त्यांचा विश्वासघात केला होता.खोटारडेपणाचा कळस गाठला होता.सूर्याला या सर्व बाबीचा उलगडा करायचा होता.पण हेमंत भेटणेच टाळत असल्याने सूर्याला असं काही करता आलं नाही.तसेच किरण ही कधी संपर्कात न आल्याने तिलाही काही विचारता आलं नाही.हेमंत कडून घडवून आणलेल्या चर्चेने गावात अधिक वेग घेतला.हा सुर्यासाठी मोठा धक्का होता.त्यातच हेमंतचे काही निवडक सवंगडी मुद्दाम सूर्याच्या समोर अशी चर्चा करण्यास अधिक रस घ्यायला लागली होती.सूर्याला ते सर्वकाही सहन होत नव्हतं.अशा लोकांशी कसा व्यवहार करावा हेच त्याला कळत नव्हतं. किरणबाबतची अशी चर्चा सूर्याच्या चांगली जिव्हारी लागली.त्याचं मन अतिशय दुःखी अनं खिन्न व्हायला लागलं होतं.परंतू सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.हेमंत सूर्याच्या जवळपासही फिरकत नसल्याने त्यालाही काही विचारणा करता येत नव्हती.कधी कधी "ही अफवा/चर्चा खरी तर नसेल ना ! " असेही त्याला वाटत असे.याचं उत्तर केवळ हेमंत आणि किरण कडेच होतं.त्याच दरम्यान सानिया सुद्धा सूर्याला कधी भेटली नाही.त्यामुळे नेमकं खरं काय आहे ते सूर्याच्या समजण्यापलीकडचं होतं.पण किरणवर विश्वास मात्र अढळ होता.
        गावात अफवा आणि चर्चेला पेव फुटले असले तरी त्यात सूर्याचा कुठेच उल्लेख नव्हता.कदाचित हे सर्व हेमंत मुद्दामहून घडवून आणत असावा असा सूर्याचा कयास होता.या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी हेमंत,सानिया किंवा किरण यापैकी कुणाच्यातरी भेटीनं समाधान होणार होतं. प्रयत्न करूनही सानिया भेटली नाही.किरणकडे जाण्याचा मार्ग अवघड होता.हेमंतची भेट घेतल्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.हेमंत पण सूर्याला भेटणे हेतुपुरस्सर टाळत होता.अखेर १० एप्रिल १९९३ रोजी सूर्या सरळ सरळ हेमंत ज्या दुकानावर काम करतोय तेथेच पोहोचला.अचानक सूर्याला बघून हेमंत भांबावला अनं त्याला टाळू लागला.सूर्या तसा रागातच पण त्यानं रागावर नियंत्रण ठेवलं.तरीपण त्याचं काय करावं आणि काय करू नये अशी सूर्याची स्थिती झाली होती.प्रेमानेच हेमंतला बाहेर बोलावलं.त्याच्याशी कोणताही वाद न घालता त्याला सरळ पंचायत समिती परिसरात नेलं.रस्त्यानं जात असताना दोघातही स्मशान शांतता.एकमेकांशी कसलाही संवाद नव्हता.दोघेही निवांत ठिकाणी जाऊन बसले.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हेमंतवर प्रश्नाचा भडिमार न करता प्रेमानेच त्याला विचारले की, "का रे बा हेमंत ! किरणबाबत तू उलट सुलट अफवा/चर्चा का पसरवित आहे" अशी त्याला विचारणा केली.तो गोंधळला.सूर्यानं त्याला किरण बाबतीत अनेक प्रश्न विचारलेत.पण त्यानं एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर दिलं नाही.सूर्या त्यांचेशी बोलत होता. वेगवेगळे प्रश्न करीत होता.पण तो केवळ मूकपणे ऐकत होता.सूर्याचा विश्वासघात झाला आहे त्यामुळे सूर्याची मनस्थिती काय झाली असेल हे त्यालाही चांगलं कळतं होतं.म्हणून तो तोंडातून ब्र ही बाहेर काढत नव्हता. प्रतिउत्तर न देता तो केवळ ऐकत होता.कदाचित त्याच्या मौनव्रतातच त्याची कबुली आहे हे सूर्यला कळून चुकलं होतं.हेमंत कसलेच उत्तर देत नसल्यानं सूर्या अखेर हतबल झाला,निराश झाला अनं स्वतःच स्वतःला सावरू लागला.सूर्यावर झालेला प्रचंड आघात त्याला सहन होत नव्हता.सूर्या कधी नव्हे इतका निराश अनं हतबल त्या दिवशी झाला.शेवटी सूर्यानं पुन्हा स्वतःला सावरत त्याची समजूत काढू लागला आणि अखेर मनाला की, " हेमंत तुझ्यावर माझा प्रचंड विश्वास होता.तू माझा विश्वासघात केला हे मी कधीच विसरणार नाही".कदाचित जर तुला वाटत असेल की तू चूक केली आहे तर तुला माफी मागण्याची किंवा चूक सुधारण्याची संधी आहे.मी तुझ्याजवळ किरण बाबत माझे मनातील भाव व्यक्त केले आहे,ते तू किरण व्यतिरिक्त कुणालाही सांगू नको.तू जरी माझा विश्वासघात केला असला तरी तू माझ्या लहान भावासारखा आहे.मोठा भाऊ म्हणून तुला कधी सहकार्य करणं कधी नाकारणार नाही.पण माझ्या बाबतीत तू जे काही वागला,माझा विश्वासघात केला,जशी माझे बाबतीत चूक केली आहे तशी चूक भविष्यात इतर कुणा सोबत करू नको.सर्वजण सूर्यासारखे असतीलच असे नाही.हे कायम लक्षात ठेव ".हेमंतने त्यावर कसलीही प्रतिक्रिया न देता सर्व काही मूकपणे ऐकत होता.आता त्याच्यासोबत बोलून काही उपयोग नाही.म्हणून सूर्यानं त्याला नजरेआड होण्यास सांगितलं.हेमंत शेवटपर्यंत काहीच न बोलता तिथून जाण्यास निघाला.सूर्या त्याच्या पाठमोऱ्या प्रतिकृतीकडे बघत राहिला अनं टपकन डोळ्यातील अश्रूचे थेंब अलगदपणे जमिनीवर कोसळले.जे घडायला नको होतं ते सूर्याच्या बाबतीत घडलं.सूर्या पूर्णतः खचला.आता किरण आपल्याला कधीही मिळणार नाही किंवा भेटणार नाही.तिचे प्रेम मिळणार नाही अशी त्याने स्वतःची मानसिकता करवून घेतली.असे असले तरी आयुष्यभर किरणच्या प्रेमाला जपायचं आणि तिच्या प्रति असलेलं प्रेम आयुष्यभर निभवायचं अशी खूणगाठ बांधली आणि तो ही तेथून परतला.
        पुढील काळ हा सूर्यासाठी अधिक खडतळ,संघर्षमय अन आयुष्याची परीक्षा घेणारा राहील.ह्याची त्याला पूर्ण जाणीव होती.तसेच किरणविणा जगणंही त्याला असह्य होत होतं.त्याच्या मनातील वेदना तो स्वतःच सहन करीत होता.कारण त्याच्या प्रेमाची फुलबाग बहऱण्याआधीच कोमेजली होती.हेमंतच्या कपटनीतीमुळे त्याच्या विश्वासाला जबरदस्त तडा बसला होता.त्यामुळे त्याला काय करावं आणि काय करू नये अशी त्याची द्विधास्थिती झाली होती.त्याच्या मनातील घालमेल आणि उदासीनता कुणीच समजू शकत नव्हतं आणि तो त्याच्या भावना कुणाजवळ व्यक्तही करू शकत नव्हता.त्यामुळे तो एकटाच एकांतवासात राहू लागला.कधी नव्हे इतका तो एकाकी पडला.मनातल्या मनात कुढत बसला.कशातच त्याचं मन रमत नव्हतं.किरण विषयी होणारी चर्चाही त्याला सुखानं जगू देत नव्हती.त्याचं संपूर्ण आयुष्य वेठीस धरल होतं.जणू काही आपलं आयुष्यच संपलं की काय अशी त्याची मानसिकता झाली होती.आटोकाट प्रयत्न करूनही त्याचे सर्व प्रयत्न निष्पळ ठरले होते.आता केवळ किरणच्या आठवणीच त्याच्या साथीला होत्या.त्याच आठवणी जपत आयुष्य जगण्याचा निर्धार केला होता.
      हेमंतच्या विश्वासघाताने सूर्याच्या संपूर्ण आयुष्याची वाट लागली.त्याच्या जगण्याचे चक्रही स्थिरालेत.त्यासाठी कारणीभूत असंलेला हेमंत त्याच्या दृष्टीआड जात नव्हता.प्रत्येक क्षण त्याला असह्य वाटू लागला.आज पर्यंत हेमंत जे काही वागत होता ते सर्व काही खोटं होतं हे त्याला अधिक दुःखी करीत असे.नव्हे हेमंतने त्याला दुःखाच्या खाईत लोटण्यास कसलीही कसर सोडली नव्हती.या यातनातून तो सहजासहजी बाहेर पडेल अशी स्थिती नक्कीच नव्हती.स्वतःला सावरनं त्याच्यासाठी अवघड होऊन बसलं होतं.अशा दुविधा स्थितीत हेमंतचा खरपूस समाचार घ्यावा असं त्याला वाटत असलं तरी त्याचं असं वागणं हे किरणसाठीच घातक ठरेल हेही सूर्याला चांगलं ठाऊक होतं.हेमंतलाही हेच अपेक्षित होतं.हेमंतला अशा वागण्याचे कारण प्रेमाने, वेळ प्रसंगी धाकधपट करून विचारणा करावी असं वाटत असलं तरी किरणचा साधाभोळा,सोज्वळ चेहरा दृष्टी पटलावर येत होता.म्हणून शांत आणि संयमी सूर्याला असं काही करण्याचं धाडस झालं नाही.असं वागल्यास किंवा त्याच्याशी व्यवहार केल्यास हेमंतला धाकधपट करण्याचं कारण काय असे लोक विचारू लागल्यास काय उत्तर द्यायचे हा प्रश्न सूर्या समोर येत असे.त्यात किरणसाठी सूर्या अशा प्रकारे वागला आहे ही चर्चा घडवून आणण्यास हेमंत कधीच मागे पुढे पाहणारा नव्हता याची सूर्याला कल्पना होती.त्यात किरणचीच अधिक बदनामी होईल या भीतीपोटी सूर्या हा हेमंतला ठणकावून जाब विचारु शकत नव्हता.हेमंत सूर्याला बदनाम करण्याची कसलीही संधी सोडत नव्हता.कदाचित असे झाल्यास किरण सुद्धा या सर्व प्रकाराला सूर्यालाच कारणीभूत समजेल या समजुतीनं सूर्या असं काही पाऊल उचलत नव्हता.किरणच्या मनात सूर्या जरी नसला तरी सूर्याच्या मनात मात्र किरण कायम घर करून बसली आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...