Skip to main content

Posts

पहिलं प्रेमपत्र

किरण कडून प्राप्त पहिलं प्रेमपत्र पुढील प्रमाणे आहे Date 17-2-94 *अखंड प्रिती ज्योत* ---------------------------------------- प्रिय मित्र कुमार यांना माझा नमस्कार वि वि चिठ्ठी लिहिण्याचे कारण की मी बरेच दिवसापासून तुम्हाला चिठ्ठीचे उत्तर दिले नाही परंतु आता देणार आहे तुमची चिट्ठी  मला मिळाली वाचून फार आनंद झाला तुम्ही म्हटलं होते की त्याच्यासोबत आहे ती सर्व गोष्ट सर्व खोटी आहे मी त्याच्यासोबत बोलत सुद्धा नाही तुमच्या सोबत सोबत खरं प्रेम करत आहे आपली ही गोष्ट चौघाशिवाय कोणाला माहित नसावी मास्तरला ही गोष्ट कोणी सांगितली हे तुम्ही मला स्पष्ट का सांगत नाही.तुम्ही मला अगोदर सांगितलं होतं काय की मी तुझ्यासोबत प्रेम करणार म्हणून तुम्ही चिठ्ठी मध्ये लिहिले होते की मी गोंधळात पडलो म्हणून तुम्ही कशाच्या गोंधळामध्ये पडले हे मला स्पष्टपणे सांगणे बरं का मी तुम्हाला चिठ्ठीचे उत्तर दिले नाहीत तुम्हाला माझा किती राग आला तुम्ही माझ्यासोबत पंधरा दिवस बोलले नव्हते आणि तुम्ही चिठ्ठीनुसार तर वागले पण नाही की तू मला दिसली नाही तर करमत नाही खरोखरच तुम्ही पोटामधून म्हणत होते की होट...
Recent posts

आजही दूविधेतच----भाग दहा

*आजही दूविधेतच---!*         *भाग दहा*         तब्बल तीन दशकानंतर बालमैत्रिणी विशेषतः पणती आणि सानिया सूर्याच्या संपर्कात आल्यात.पूर्वी पेक्षा अधिक भेटीगाठी व्हायला लागल्यात. एकमेकांच्या घरी येणं-जाणं सुरू झालं.फोनवर संपर्क वाढला. यानिमित्ताने बालपण व शालेय जीवनातील आठवणीला उजाळा मिळाला.विचाराची देवाण-घेवाण व्हायला लागली.पणती आणि सानिया तिच्या मुलीसह सूर्याच्या गावी सुद्धा आल्यात.सूर्याची मुलगी पण सानिया आणि पणतीच्या घरी जाऊन आलीत. एकंदरीत काय तर तीन दशकापासून खंडित झालेलं मैत्री/ बहीण भावाचं नातं पूर्ववत आणि अधिक दृढ व्हायला लागलं.परंतु पणतीच्या मनात किरण विषयी असलेली खदखद सानिया पासून लपून राहिली नाही.सूर्याकिरण यांच्यातील अपयशी प्रेमासाठी काहीअंशी सानियाच जबाबदार असल्याची पणतीची धारणा झाली आहे.पणतीनं तशी जाणीवही सानियाला वारंवार करून दिली.सानियानं सुद्धा आपल्या चुकीची प्रांजळपणे कबुली दिली.पणतीच्या प्रयत्नाची फलश्रुती म्हणजे सूर्याकिरणच्या नियोजित भेटीसाठी पूर्वीप्रमाणे प्रयत्न करणार असल्याचा शब्द सानियानं दिला.काहीह...

आजही अधांतरीच----!!!

*आजही अधांतरीच* ----------------------------------------    *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*   *मु.भांबोरा,जि.अमरावती* *मोबा.९९७०९९१४६४* ----------------------------------------       जिल्ह्याच्या ठिकाणावरून गावाकडे परत येत होतो.वाटेतच  दिपाचे गाव लागले.गाडीचा रोख तिच्या गावाकडे वळवून दीपाच्या घरी आलो.तिच्या घराजवळ गाडी थांबताच आणि तिच्या घरात प्रवेश करताच तिला आश्चर्यचा धक्का बसला.कारण तिने वारंवार घरी येण्याचे निमत्रण देऊन सुध्दा तिच्या कडे जाण्याचा योग काही येत नव्हता.अचानक तिच्याकडे जाण्याचा योग आला.आम्ही घरात प्रवेश करताच ती करीत असलेली कामे बाजूला सारून आमचे आगत-स्वागत केले. आदर सत्कार केला.इकडील-तिकडील विचाराच्या देवाणघेवाणीनंतर तिच्या वैभवशाली घराकडे नजर फिरवून अलगदपणे विचारले की,छान संसार थाटला.चांगली प्रगती दिसतेय.तुम्ही तर चांगलाच जम बसविल आहे.शून्यातून विश्व निर्माण करून दाखविले आहे.त्यांची अल्पावधीतील प्रगती पाहून मन भरून आले.तुमच्या कर्तृत्वला दाद द्यावी लागेल.खरोखर तुम्ही ग्रेट आहात.ममतेचा सागर आहात.प्रेमविवाह करणाऱ्यां जोडप्यासाठी खर...

संक्षिप्त--आजही दूविधेतच

*संक्षिप्त* ---- *आजही दुविधेतच* ----  ----------------------------------------        प्रेमात सर्व काही क्षम्य असतं.प्रेमाचा साक्षात्कार झाला की,कोणतेही उद्दिष्ट पूर्णत्वास जाण्यास वेळ लागत नाही.इतकेच काय तर एखाद्या कुकर्मी डाकूचे सुद्धा हृदयपरिवर्तन होऊन त्यांच्या भावी जीवनाला निश्चित आकार मिळण्यास मदत होते.त्यातही आधुनिक वर्तमान युगात प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमाला युवावर्गात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.इतकेच नव्हे तर युवा अवस्थेत ही जीवनाची खरी गरज झाली आहे.पण खऱ्या प्रेमाची माणसाला जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र माणसाच्या कोमल मनात अस्थिरता निर्माण होऊन हृदयाच्या स्पंदनाचा वेग झपाट्याने वाढू लागतो.असाच प्रकार माझ्या जीवनात मला सुद्धा अनुभवाला मिळाला.        मी महाविद्यालयीन जीवन उपभोगले.पण कुणाच्या समोर प्रेमाचा हात पसरला नाही.मित्राचे अनुभव लक्षात घेऊन प्रेमापासून सदा दूर राहण्याचा प्रयत्न केला. इतरांप्रमाणे माझ्याही मनाला भूलविण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या युवावस्थेत प्रेमाची ज्...

भाविकांचे श्रद्धास्थान :- श्री संत शंकर महाराज

*भाविकांचे श्रद्धास्थान*  *श्री संत शंकर महाराज* ---------------------------------------- *स्वाती नरेश इंगळे* *मु.भांबोरा ता.तिवसा* *जि.अमरावती* *मोबाईल-९९७०९९१४६४* ----------------------------------------        महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.संत परंपरेचा वारसा हा  अमरावती जिल्याला सुद्धा लाभलेला आहे.महाभारत काळापासून तर आधुनिक काळापर्यंत अनेक संत/महात्मे याच भूमीत जन्मलेले आहे.अशा या संताच्या भूमीमध्ये पूर्वीचा तिवसा आणि विद्यमान धामणगाव रेल्वे तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळखुटा या लहानशा खेड्यामध्ये श्री संत शंकर महाराज यांचा १९४५ मध्ये गरीब व निरक्षर कुटुंबामध्ये हरितालिका या दिवशी जन्म झालेला आहे. बुधाजी नागपुरे व भागीरथीबाई नागपुरे हे त्यांचे माता-पिता.श्री संत शंकर महाराज हे त्यांचे सातवे रत्न.         बाबाचा जन्म तसा अत्यंत दारिद्र्यमध्ये व्यतीत करणाऱ्या भूमिहीन कुटुंबामध्ये झालेला आहे.त्यातच श्री संत शंकर महाराज त्यांच्या बंधू पैकी सर्वात ज्येष्ठ.गरिबीच्या परिस्थितीमध्ये कुटुंबाला आपला सुद्धा आर्थिक हातभार असावा म्हणू...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...