कर्तव्यतत्पर/विद्यार्थीभिमूख
*श्री डी.आर.डेरे सर*
पिंपळखुटा येथील श्रीसंत शंकर महाराज विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री *ज्ञानेश्वर रामकृष्णजी डेरे* हे ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा श्रीसंत शंकर महाराज विद्यामंदिर आणि कनिष्ट महाविद्यालयाचे वतीने सपत्नीक सत्कार शासन व आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन करून संपन्न झाला.
श्री.डेरे सर यांच्या पुढाकाराने तसेच सर्व भक्तांचे प्रयत्न आणि परमहंस श्रीसंत शंकर बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने १९८९ ला पिंपळखुटा या लहानशा गावात *श्री संत शंकर महाराज विद्यामंदिर* या नावाने शाळा सुरू करण्यात आली. सर्वप्रथम ८ वा वर्ग सुरू करून,त्याच नेतृत्व आदरणीय श्री डी.आर.डेरे सर यांच्या कडे सोपविण्यात आले होते.
शाळेचे पहिले मुख्याध्यापक,लिपिक,शिक्षक आणि चपराशी अशा चतुरस्त्र भूमिकेत त्यांनी शैक्षणिक कार्य सुरू केले.त्यावेळी ८ व्या वर्गात केवळ १४ विध्यार्थी प्रवेशित होते.आज त्यांनी लावलेल्या या लहानशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे.सध्या स्थितीत या शाळेत जवळपास ६५० ते ७०० विध्यार्थी शिक्षण घेत आहे.याचे श्रेय श्री डेरे सर यांना जाते.
श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट च्या माध्यमातून श्री संत शंकर महाराज एम.सी.व्ही. सी.तसेच कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालय आणि श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास त्याचा सिहाचा वाटा कुणीच नाकारणार नाही.गावातील तसेच परिसरातील कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये अशी त्यांची कायम भूमिका राहिली व आहे.
सर्व विद्यार्थ्यांत लोकप्रियतेसोबतच सर्वांचे आवडते आणि लाडके असलेल्या सराचा स्वभाव शांत,मितभाषी,निटनिटकेपणा, वक्तशीरपणा, काटकसर,कार्यतत्पर,कोणतेही काम आनंदाने आणि पूर्ण क्षमतेने करून खऱ्या अर्थाने ते सर्वांचे प्रेरणास्रोत ठरले आहे.
शालेय अध्यापन कार्याबरोबरच परीक्षा विभाग,केंद्रसंचालक ,म्हणून त्यांनी लिलया आव्हान पेलले.पर्यावरण प्रेमी असलेल्या डेरे सर यांनी स्वतः झाडे लावून, नित्यक्रमाने रोज ते विध्यार्थ्यांना रोपटे देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करीत असे.शाळेतील अन्य बाबतीतही त्यांनी अत्यंत मोलाचे कार्य केलेले आहे.
शैक्षणिक कार्याबरोबरच अध्यात्म त्याच्या आवडीचे क्षेत्र. धामणगाव रेल्वे येथील वास्तव्यास गेले असता तेथील विद्युत कॉलनीत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन परिसरातील लोकांना एकत्रित करून *श्री संत गजानन महाराज* मूर्ती प्रतिस्थापना आणि मंदिराची उभारणी करण्यास पुढाकार घेतला अन आगळेवेगळ्या वातावरणाची निर्मिती केली.पूर्वी सुनसान असलेल्या त्या कॉलनीत आता दर गुरूवारला सर्व मंडळी एकत्रित येऊन महाप्रसाद सहभोजन करतात.आता तेथे भक्तिमय वातावरण झाले आहे. यासाठी तेथील नागरिक श्री डेरे सर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात.
इतकेच नव्हे तर त्यांना भजन कीर्तनाची आवड आहे.
आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी इतर सहकारी मंडळीना सोबत घेऊन *भजन मंडळ* स्थापन केले.भजनाच्या माध्यमातून सर घरा घरात पोहचले आहे. त्यातही त्यांनी भजन हे सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेतच असावे असा त्यांनी नियम घालून दिला आहे.विशेष म्हणजे ज्या गावात भजन असेल त्या गावात भजनी मंडळी ही स्वमालकीच्या चारचाकी गाडीबरोबरच पेट्रोल खर्चाची जबाबदारी सुद्धा स्वतःच उचलतात हे विशेष!!
अशा निस्वार्थी,निगर्वी प्रामाणिक,कर्तव्यतत्पर श्री डेरे
सर यांच्या कार्याला सलाम आणि त्याच्या पुढील निरामय आयुष्याकरिता कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!!!!
----------------------------------------
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*
*९९७०९९१४६४*
श्री डेरे खरोखर आदर्श शिक्षक आहेत. त्यांच्या कर्याद्वारे प्रत्येक शिक्षकाने प्रेरणा घेऊनआपले पवित्र कार्य उत्कृष्टपणे पार पाडले गेले तर समाजामध्ये आपली प्रतिमा नक्कीच उंचावेल .
ReplyDeleteअगदी बरोबर आहे
Delete